पान:नित्यनेमावली.pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८

१९६२ नंतर हा हुकुम झाला. त्यानंतर लगेच सांगली येथें श्रीमंत राजेंसाहेबांचे वाड्यावरच या ट्रस्टींची पहिली, सभा झाली आणि श्रीमंतांचे सुचनेवरून श्री. तुळपुळे यांना चेअरमन व श्री. परुळेकर याना सेक्रेटरी नेमण्यात आले.

 या ट्रस्टनीं त्यानंतर कामास लगेच सुरवात केली. एप्रिल १९६४ मध्ये "गुरुदेव मंदिर" या इमारतीचा पाया नामदार बी. डी. जत्ती ( भारताचे भूतपूर्व उपाध्यक्ष ) यांच्या हस्ते घालण्यात आला. इमारत पूर्ण झाल्यावर तारीख ८-१२-१९६५ रोजी त्यावेळचे भारताचे अध्यक्ष कै. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले. या भव्य व सुंदर इमारतीमध्ये गुरुदेवांच्या पादुकांची स्थापना केली आहे. साधकांच्याकरता राहण्यास खोल्या आहेत आणि प्रवचनें, व्याख्या कीर्तने वगैरे कार्यक्रमाकरता मोठा हॉलही आहे. संस्थेच्या उद्देशास अनुसरुन लगेच १९६६ साली " पाथवे टु गॉड " (Pathway to God )