पान:नित्यनेमावली.pdf/२११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६९

हे इंग्रजी नियत कालिक सुरु करण्यांत आले. आता ते त्रैमासिक ह्मणून निघत आहे. श्रीं गुरुदेवांच्या स्मरणार्थ एक वार्षिक व्याख्यानमालाही सुरु करण्यात आली आहे. त्या मालेतील व्याख्यात्याला अनुदान मिळते आणि ही व्याख्याने ग्रंथरूपाने प्रसिद्ध केली जातात. वेळोवेळी परीसंवादही घडवून आणले जातात आणि त्यावेळी वाचलेंले निबंधही छपून प्रसिद्ध केले जातात. याशिवाय वेळोवेळी प्रवचनें वगैरे कार्यक्रमही होत असतात. आतापर्यंत या संस्थेने ३२ पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. वाचकवर्गाकरता एका ग्रंथालयाची व्यवस्था असून तेथें आता जवळ जवळ दहाहजार ग्रंथ उपलब्ध आहेत. प्रतिवर्षी वैकुंठचतुर्दशीस नामसप्ताहही साजरा होत असतो. त्याच प्रमाणे दरवर्षी श्री गुरुदेवांची पुण्यतिथीही साजरी केली जाते, प्रसंगानुसार इतर पारमार्थीक कार्यक्रमही होत असतात.

 शंभर रुपयें एकदम भरुन, " पाथवे टु गॉड " चें