पान:नित्यनेमावली.pdf/२१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७१

साधकांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य पहिल्यापासूनच व्यवस्थितपणें चालू होते. परंतु त्यांच्या प्रकृतीच्या अनानुकूलतेमुळे ते या कार्यातून १९७७ साली निवृत्त झाले. व त्यांचे मे १९८२ साली निधन झाले. त्यानंतर श्री बाबासाहेव संगोराम यांची अध्यक्ष पदी निवड झाली. नोहेंबर १९८३ मध्ये त्यांचेही निधन झाले व आता श्री जगन्नाथराव परुळेकर हे या संस्थेचें अध्यक्ष आहेत, आणि त्यांचे मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. या संस्थेमार्फत आपल्या पारमार्थिक तत्त्वज्ञानाचा प्रसार सर्व जगभर होईल असे श्री. गुरुदेव ह्मणत असत. साक्षात्कारी संतांचे शब्द यथाकाल खरे होणारच, अशा धारणेनुसार संस्थेचे कार्य चालू आहे.

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोड़ी |
न लगे मुक्ती धनसंपदा । संतसंग दे गा सदा ॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी |