या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना.

 प्रस्तुत पुस्तकांत श्रीभाऊराव महाराज उमदीकर यांच्या सांप्रदायांत प्रचलित असलेला भजनक्रम दिला आहे. प्रथम रात्रौ म्हणणेचें भजन व नंतर काकडआरती अशी योजना केली आहे. काकडआरतीनंतर "पंचसमासी" नामक एक पांच समासांचें प्रकरण, त्यांच्या शिष्यांपैकी गणपति पवार नामक एका सोळा वर्षाच्या मुलाने केलेले, दिलें आहे. नंतर त्यांच्या शिष्यवर्गांपैकीं मंडळीनीं केलेली चारच पदें दिली आहेत. प्रस्तुत पुस्तक सांप्रदायांतील मंडळीसच विशेषेकरून उपयोगी पडण्याजोगे आहे. बहुजनसमाजास सर्व दृष्टींनीं पसंत पडेल अशा प्रकारचें एक विस्तृत पुस्तक करण्याचा विचार होता; परंतु कांहीं कारणामुळे तो लांबणीवर टाकणे भाग पडले. सदर पुस्तक प्रसिद्ध करण्याचा योग जुळून आल्यास त्यांत पुष्कळ चांगला मजकूर येण्याजोगा आहे. प्रस्तुत पुस्तकांची किंमत थोडी ठेवणें जरूर असल्यानें भजनांतील पुष्कळ आरत्या, अष्टकें, भारुडें गाळावी लागली आहेत. हा सर्व मजकूर व शिवाय महाराजांच्या संग्रही असलेल्या असंख्य अनुभविक पदांचा व अभंगांचा सांठा व तसेच महाराजांनी पाठविलेलीं कांहीं महत्त्वाचीं पत्रे, तसेंच सांप्रदायाचा समूळ इतिहास, महाराजांचें विस्तृत चरित्र इत्यादि मजकूर पुढील पुस्तकावर लोटणें जरूर आहे. शिवाय त्यांच्या