या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिष्यांनी केलेलीं पुष्कळच पदें आहेत, तीं सर्वं पुढील पुस्तकांतच घालणें जरूर आहे. हा योग केव्हां जुळून येईल तेव्हां येवो! तूर्त पूर्णचंद्राचा आल्हाद चंद्रकलेतच मानून घेणें भाग आहे.

 श्रीभाऊरावमहाराज यांची परंपरा रेवणनाथ (ज्यांस रेवण- सिद्ध असेंही म्हणतात ) यांपासून आली आहे. नवनाथांची नांवें एका संस्कृत श्लोकांत दिली आहेत, तो श्लोक असा :-

गोरक्षजालंदरचर्पटाश्च | अभंगकानीफम छिदराद्याः ।
चौरंगिरेवाण च भर्तुसंज्ञा | भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धा ॥ ४ ॥

 संस्कृतज्ञ लोकांस या श्लोकांत कांहीं दोष आढळतील; परंतु श्लोककर्त्याचा उद्देश नवनाथांची नांवें एकत्र ग्रथित करणे एवढाच असल्याने त्यांतील दोष पाहणें इष्ट होणार नाहीं. असो. "नवनाथ- भक्तिसार " नामक ग्रंथांत रेवणसिद्धाचे चरित्र ३४, ३५, ३६ या अध्यायांत दिले आहे रेवणनाथ हें नांव पडण्यांचें कारण असें दिलें आहे : -

पूर्वी अठयायंशी सहस्र ऋषी । जाले आहेत विधिवीर्यासी ।
त्याच समयीं रेत महीसी । रेवातीरीं पडियेले ॥ १७ ।।
रेवातीरीं तेही रेवेंत | रेत पडले अकस्मात |
चमस नारायण संचार करोनी त्यांत । देहधारी मिरवला ॥ १८ ॥

 रेवणनाथ कृषिकर्म करीत असतां त्यास श्रीदत्ताची भेट कशी झाली, दत्तांनीं पूर्ण अनुग्रह न करता केवळ महिमा सिद्धि कशी दिली,