पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/112

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेश्यांचं शल्य जपणारे : डॉ. गिरीश कुलकर्णी

 ज्यांनी तारुण्याची सळसळ आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत अनुभवली असेल, त्यांना त्या अल्लड, गाढव वयातील (गद्धे पंचविशी) धमाल कधी भूतकाळात नेऊन सुखावते, तर कधी एखाद्या हळव्या कोपऱ्याची सल आजही अस्वस्थ करायला भाग पाडते, असं आठवल्यावाचून राहणार नाही...ते वयच वेडे असतं. लाथ मारीन तिथं पाणी काढीन...याची टोपी उडव...त्याची फिरकी घे... 'डोक्यात आलं की, शिंगावर घेतलं' असा तो 'झट सोच, पट कर' असा काळ!अशा काळात एकदा एक तरुणांचं टोळकं ठरवतं...आज आपला वर्ग मित्र आहे ना त्याच्या घरी...वस्तीवर जायचं... जवानी का जोश अनुभवायचा...हा काळ १९८७-८८ चा...ती वस्ती असते अर्थातच वेश्यांची...गल्ली शोधत ते मित्राचं घर हडकून काढतात. आज आम्ही ऐश करायला आलोय म्हणून फर्मावतात...मित्र खजील...मित्र असतील कॉलेजमध्ये ...त्यांनी घरात, गल्लीत गिऱ्हाईक म्हणून यावं, असं त्यानं कधी कल्पिलेलं नव्हतं...काय करू काय नको...त्याला काहीच सुचेना...मित्र म्हणून स्वागत करायचं की, जिवावर उठलेले म्हणून हुसकावून लावायचं...तो फक्त इतकंच म्हणाला, 'मित्रांनो, तुम्ही आलात यात तुमचा काहीच दोष नाही...असेलच तर वयाचा...पण मी तुम्हास एकच सुचवेन...इथल्या प्रत्येक बाई-मुलीच्या जागी तुम्ही तुमची आई-बहीण पाहा.' पुढे तो बोलू शकला नाही आणि अंधाराच्या गल्लीत चालता झाला...त्या मित्रात गिरीश कुलकर्णी होता...त्याचा अपवाद वगळता अन्य मित्रांनी त्या संवादानंतरही कोठीवाली शोधलीच...गिरीशला त्यानं, त्या वाक्यानं जे अस्वस्थ केलं...ती अश्वत्थाम्याची

निराळं जग निराळी माणसं/१११