पान:निवडक अंतर्नाद.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भरपाई सदानंद देशमुख ग्रामीण भागात राहणाऱ्या एका साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या प्रतिभेचा प्रारंभीच्या काळातील रसरशीत कथाविष्कार एका सामान्य गरीब शेतकऱ्याची खोटी बियाणे विकणाऱ्या व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक आणि त्या अन्यायामुळे पेटून उठलेल्या त्या शेतकऱ्याची स्वाभाविक संतप्त प्रतिक्रिया मुखर करणारा. डोळ्यातली झोप पार उडून गेली होती. मध्यरात्र झाली होती. सारं गाव काळोखाच्या विळख्यात सुस्तावलं होतं. पावसाळी वातावरण बाहेर आभाळ गच्च मेघांनी भरून आलं होतं. पण पाऊस काही कोसळत नव्हता. त्याच्यानं एक गडदपण दाटून आलं होतं. आवळून धरल्यासारखं वाटत होतं. शेजारच्या घरातला सत्तर वर्षांचा म्हातारा मधूनच खोकायचा, खोकायचा आणि मधूनच एक भेसूर आवाज काढायचा, तो पितळी परातीवर खिळा घासावा, तसा काळोखाला, शांत वातावरणाला ओरखडा घेतल्यासारखा वाटायचा आणि उदास उदास करायचा. अशा या मध्यरात्रीच्या थरकापी माहोलात विठोबा गवारे कसमसत होता. गोधडीवर नुस्तानुस्ता घोळत पडला होता. अर्धवट जळून तळमळणाऱ्या माणसासारखा झाला होता. मोड करायची वाट पाहणारं हायब्रीडचं शेत आठवत होतं. सारखं सारखं डोळ्यापुढं येत होतं. आणि त्याच्या मनाची आग फुंकणीने चूल फुंकल्यासारखी आतल्या आत भडकत होती, मोड... मोड.. मोड... कष्टानं पेरल्या हायब्रीडच्या शेताची मोड, कर्ज काढून खत आणलं... महागडं बियाणं पेरलं. आशा केली... आवंदाच्या साली भरपूर, महामूर ज्वारी घ्यायची. पण तिचा सगळा चिंधीचोळा झाला. .... या बळीराजा कृषीसेवा केंद्रवाल्या सुभाष झोऱ्यानं त्यो केला... साल्याचं कडकन नल्डं फोडाय पाह्यजे... वाघानं शिकारीचं फोडल्यावाणी... खतम करून यकाय पाह्यजे हरामखोराले... पण त्याले खतम करून टाकावं, त मंग माघारी आपल्या बायकोचं कसं व्हावं? पोरायचं कसं व्हावं? आपून बसू जेलात जाऊन... अन् लहान लहान पोरंसोरं फिरतान याच्या त्याच्या दारोदार... साला हा संसार म्हणजे निरानाम पायखुटी हाये आपली, पायखुटी घातल्या ढोराले गंजगंज इकडी तिकडी पळावं वाटते. पण साधत नाई. तशीच आपलीबी गत... डोळ्यातली झोप खोबाल्या झाली. मनात भरून आल्या आभाळासारखी चिंता दाटाळून आली होती. आणि टकटक डोळ्यांनी भुईला पाठ देऊन तो टिनाच्या नळ्या पाहात होता. या सगळ्या धुराने धुरकटून काळ्याभोर झाल्या होत्या, झिरो १०० निवडक अंतर्नाद लाइटाच्या उजेडात विचित्र तळमळल्यासारख्या भासत होत्या... ....साला आपलाबी जलम ह्या काळवंडल्या टिनावाणीच झाला, काई खरं नाई राह्यलं. घरात रोज चूल पेटती, धुपट कोंडल्या घरात गुरमळते अन् टिनावर जाऊन झोंबते. तिथंच टिनावर त्याचं किटण तयार होते. तसंच आपल्या मनाचंबी, मनात चूल पेटते. चिंतेचं, उदासीचं धुपट आतल्या आत किरण व्हते. अन् उदासीचा गंज मनावर चढते. या गंजानंच आपला जलम काळवंडून चाल्ला... सम्दा जुना जुनाट झाला, कानावर एक डास गुंऽगुंगऽऽ कराय लागला तसा त्याने तळहाताचा फटकारा मारला. पण त्याच्याच गालफडावर थापड झोंबली, कासावीस झाला. लगेच खालच्या उघड्या पोटरीवर दोन डास कचाकच चावले. पुन्हा जोर खाऊन तिथं थापड्या मारल्या... झोंबल्या. मनातल्या मनात कातावून गेला. .... साली ही मच्छराची जात म्हंजी महान हरामी जात, झोंबून डसल्यावर अंगाची आग व्हती तवाच समजते की मच्छर डसला. नाईत मंग कानाशी गुंऽगुंगऽऽ आवाज व्हते, तवाच समजते की कानाशी मच्छर आला. कानावर ह्यणाय जावावं; त पळून दुसरीकडं डसतात, डसल्या जागेवर माराय वावं तं भिडून तिसऱ्याच जागी डसतात. या पावसाळ्याच्या तोंडीत हरामी लय लय जेरीस आणतात, पुन्हांदा कानाशी मच्छर गाणं म्हणायला लागले. तसा तो उठूनच बसला. उभा झाला. बटण दाबून मोठा लाइट लावला. पलीकडे भिंतीशेजारी बायको झोपली होती. तिचा एक हात मळक्या चादरीतून बाहेर आला होता. अन् त्या उघड्या हातावर तारांवर पाखरं बसावीत तसे ओळीत डास बसले होते. मासात सोंडी खूपसून रक्त ओद्ययचं काम करीत होते. ते पाहून विठोबा गवारे कासावीस झाला. बायकोच्या हातावरचे डास पाहून त्याचा जीव कासावीस झाला, डास उठवून लावायला त्याने तिच्या हातावर चटाचटा चापा मारल्या तर रक्तानं फुगून गेलेले डास पोटातून फुटले. अन् त्याच्या तळहातावर सगळं रक्त लागलं, हात लालभडक झाला. बायकोची झोपमोड झाली अन् ती दचकून उठली. जवळ त्याला बसलेलं पाहून संतापली.