पान:निवडक अंतर्नाद.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"बोंबलू नको... आग नाई लागली कुठं काई... धुपटं केलं म्या घरात... मच्छर मारायसाठी!" तो तिच्या कानात धुसफुसला. तसा तिने धडपडा केला. जोरजोरात मान हलवीत त्याचा तोंडावरचा ह्यत बाजूला केला. ठसकत उसकत उठून बसली. “तुमी कावून जागी हा आतालोक? निमी रात झाली आसल !” असं म्हणून तिने जांभई दिली. अंग खाजवलं. "हे मच्छर ! याह्यच्या मायमी ! झोपच येवू देत नव्हते! लय खेव देतात याह्यच्या मायमी!” त्याचं बोलणं ऐकलं आणि तिचं हसू उसळून आलं. "कावून हासा लागली?" त्याने गोंधळून विचारलं, "तुमची इब्लिस शिवी आयकुन हासाय आलं. डासायची माय कुठंच सापडावं तुमाले आता ?” "पोरायलेबी तसंच फोडून काढत व्हते. आंगावरबी ठेवत नाही अवलाद !” असं म्हणून त्याने पोरांच्या अंगावरचं नेटकं केलं. ती दार उघडून अंगणात गेली. अन् बाहेर पाय टाकल्याबरोबर जोरात ओरडली. “कावं काय झालं?” त्याने ओरडून विचारलं. "महाया पायाले वळवळ लागलं. काय सरप हाये का कया हाये कोणाले माईत ?” ती भेदरल्या आवाजात म्हणाली. "काई भिवू नको... हिंमत धर! बेंडकी हाये ती. म्याच पायाखाली चेंढून मारली. पाय धुवून येजो घरात, सम्दं बेंदाड लागलं आशीन पायाले!” ती पाय धुवून घरात आली. घरात धूर दायळला होता. त्याला मच्छर कमी झाल्यासारखे वाटत होते पण धुराने दम कोंडला गेला होता. "इझवू का आता चूल? मच्छर कमी झाले आता..." "मच्छर कमी झाले. पण पुन्हा येतातच धुपट कमी झाल्यावर " "मग का रातभर जागी राह्यता का काय आता?" "ह्योच ह्येल हाये आता... झोपच नाई येऊन राह्यली. आंगास हे मच्छरं डसतात... त माह्या मनालेबी दुसरे घोर मच्छरावाणी झोंबतात... डोक्स दुखवतात!” "कोन्ते घोर करून राह्यले आता? डोक्सं देऊ का तुमचं दाबून?" ती त्याच्याजवळ गोधडीत येऊन बसली. त्याचं डोकं दाबल्यासारखं कराय लागली, पण त्याने तिचे हात धरून अडवलं. "काय कपल गरम झालं तुमचं! सन-सन कराय लागलं!” "माह्या मस्तकात त्या ह्यब्रीटाच्या वावराचा कीडा घुसेल हाये ! ते वावर याद आलं की भयाण उदास वाटाय लागते. करमतच नाई! तुमी झोपता पण माह्या वाट्याची रात झोपमोडी होऊन मोडून जाती!" असं तो म्हणाला, तशी ती गंभीर झाली. १०२ निवडक अंतर्नाद "हावं न! किती पतलं निंगलं आगाईत! आता सालभर कोणती जवरी खावावं? निदान जवारी तरी घरची पाह्यजेल!” अंगास मच्छर झोंबाय लागले. ती चापटा माराय लागली. "त्या बळीराजा कृषीसेवा केंद्रावाल्यानं सम्दी आपली उधडून लावली. मायले त्याच्या... काळ्या मायशी बेमानी केली. " अंगावर डास चावला. त्याला जोरात चापट मारली, बळीराजा कृषीसेवा केंद्रावाल्यास मारल्यासारखी डास रगडला. हात रक्ताळला. डास मेला होता. "त्या मेल्याचं कधी बरं व्हनार नाई. या पापाचे भोग त्याले सात जल्म भोगावं लागतान, हळकळा लागल्यान त्याले!” “आवं, त्याले आपून शिव्या - सराप देऊन राह्यलो. पण त्याच्यावाणी सुखी कोणीच नाई. आपल्या सम्द्या गावात! उडदा- मुंगाचा अन् कापसाचा धंदा करते सिझनवर दुप्पटं भावानं इकते त्यो माल... दणकावून नफा कमावते. मॅटेडोर घेते. व्हीडीओ घेते. सम्द बेमानी करून चालू हाये. काळ्या मायशी बेमानी! काळ्या मायच्या लेकरायशी बेमानी!” "त्या पऱ्हाटीचं तरी तसं नाई व्हायले पाह्यजे. तेबी जर बोगस आसलं तं आटपलच आपलं पोरीचं लगन पक्क केलं. दिवाळी झाल्यावर हुंडा द्यायचा. लगन करायचं, अन् ते सम्दं कापसाच्या भरोशावर... कापूस नाई झाला तं जहर खायाचंच काम हाये आपल्याले.” असं ती म्हणाली, तर तिचे डोळे आपोआप पोरीवर गेले. त्याचेही गेले. उजवायचं ठरलेली पोरगी शांत, अंगावर गुरफुटून झोपली होती. तिला पाहून तिच्या मनात आलं... ... आजूक दोन-चार सालं अशी शांत झोपंल एकदा लगन होऊन पोरं- सोरं झाले की तिच्या नशिबात आपल्या वाणीच भवाडे येणार. संसाराची काळजी... झोपमोडी... "तुमी म्हणत कावून नाई त्या मुडद्याले ?” "कोणाले?” त्यानं अंगावरचे डास मारत विचारलं. "त्याच कृषी सेवा केंद्रावाल्या सुभाष शेठले!” "तुले वाटते म्या त्याले म्हन्ल नसंल का? दररोज त्याले महन्तो... तुमचं बी खराब व्हतं. बी खराब व्हतं. वावर पतलं निंगलं त म्हन्ते; त्याले मी काय करू ? बी वरूनच तसं खराब आलं. म्या का घरी केलं!” "काल वावरातल्या बायका त्याच्याच गप्पा सांगत व्हत्या. " "काय?" "सुभाष शेटनं घरची खायची जवारी थैल्यात मिसळून इकली म्हणून... कंपनीच्या पाच किलोच्या उडदाच्या थैलीतबी त्यानं दोन किलो रेती मिसळली. आपल्या मन नदीची काळी रेती देली उडदाच्या थैलीत मिसळून अन् आसली बियाणं काढून घरच्या वावरात पेरलं. सोयऱ्या धायऱ्याले देलं.” "तसं कसं करील त्यो? आपून त शिलबंद घेतल्या न थैल्या त्याच्याकून?"