पान:निवडक अंतर्नाद.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तसाच लपक-झपक चालत चालत गावात परतून आला. सूर्य उगवला होता. पण ढगांचा जोर होता. त्याच्यानं अडप झडप दिसत होता. गावातले लोक टमरेलं घेऊन पांदवाटेकडे जात होते. घरी येताना दारापुढे बेडूक दिसला. रात्री पायाखाली चिवंदा करून मारलेला... त्याला मुंग्या लागल्या होत्या... आसेच ठेसाय पाह्यजे सम्दे... का आपल्यालेच ठेसून राह्यलं म्हणावं कोणी? आपूनच तं हावोत सुभाष शेठ झोऱ्याच्या पायाखालच्या बेंडकी वाणी....एकदम केविलवाणी... आपली बायको बेंडकी अन् पोरं बेंडक्यायले पिल्ल ! टुणूक टुणूक उड्या मारायच्या. अन् कोण्यातरी अजगराच्या दाभाडात जाऊन फसायचं. नाईतं खेटराखाली चिवंदा व्हायचं. ....साले आपले खेटरबी वावरात राह्यले कानू आज... नाई... वावरात नाई... पांदणवाटेतल्या झुडुपाखाली पण कोणी नेणार नाई... कोण पाह्यणार हाये तिथी लगी मुद्दाम वाकून? आणू दुपारून वावरात गेलो की. "कुठी गेले व्हते रामपाह्यरीच? चहाबी घेतला नाई... चहा देवू का? उकळेलच हाये भगुण्यात...." "हाव! दे!" "कुठे गेले व्हते तुमी ?” "गेलो व्हतो वावरात...' "कसं काय हाये हाब्रीट?” “काई खरं नाई त्याचं..." " "त्या मुडद्याच्या घरी कावून जात ना? दे म्हणा आमचे पैसे भरून, पावून पैसे घ्यावं त्याच्याकून... आपली नुकसान भरपाई .... असं म्हणून ती आत गेली. चहाची कानतुटकी कपबशी भरून आली. लाल गुळमट पाणी, ते कुणाचं तरी रक्त प्यावा तसा प्यायला लागला. भुरके माराय लागला. मनात विचार आला... जे होईल त्ये होवो ! आज खाडानिवाडा करायचाच... आता भिवून जमायचं नाई... चांगली धौस द्यायची त्याले... " चहा पिवून झाल्यावर तट्कन उठून उभा झाला, "येतोच जावान सुभाष झोऱ्याच्या घरून... " म्हणत पायउचल झाला. सुभाष झोरे बैठकीच्या खोलीत बसून पेपर वाचत होता. समोरच्या टेबलावर कलर टीव्ही सुरू होता. टीव्हीपुढच्या सोफ्यावर, कॉटवर, खुर्च्यावर त्याची बायको अन् पोरं पोरी बसलेल्या होत्या. टीव्हीवर गाणं सुरू होतं. सगळे मन लावून पाहत होते. तिकीट काढून बसावं तसे पाहत होते. सुभाष झोरेचे डोळेही तिकडेच, पेपर फक्त हाती धरलेला. एका हातात चहाचा कप. घोट घोट घेत होता. समोर उघडी नागडी लंगोटी लावलेली नटी नाचत होती. गोरीपान चामडी होती. एकदा इकडून, एकदा तिकडून असं चारी बाजूनी आपलं अंग हलवून दाखवत होती. मध्येच पाठीवर झोपून, मग हात खाली घेऊन जाडी भरली छाती वर उचलत होती. गाणं म्हणत होती. नट तिच्या मागे धावपळ १०४ निवडक अंतर्नाद करत होता. मध्येच कवळून उचलत होता. मिठी मारून, गालावर, मानेवर अन् कुठेकुठे कुत्र्यासारखं हुंगून चाटल्यासारखं करत होता. दारात उभा राहून विठोबा गवारे सगळं पाहत होता. समोर पाठमोया बसलेल्यापैकी कोणालाच त्याची जाणीव नाही. सगळे गाणे पाहण्यात मग्न! विठोबा गवारेलाही क्षणभर भुरळ घातल्यासारखी झाली. तोही पाहत राहिला. तर एकदम डोळ्यापुढे ज्वारीचं शेत आलं. पातळ निघलेलं. शिट्या वाजाय लागल्या. डोकं भणकल्यासारखं झालं आणि तो कासावीस झाला. "राम राम हो सुभाषराव..." त्याच्या नकळत जोराने ओरडला. त्याच्या आवाजाने पाठमोरा बसलेला सुभाष झोरे एकदम दचकला. मागे वळून पाहिलं तर दारात विठोबा गवारे, रागच आला. मस्तकावर आठ्या उमटल्या. “कारे बावा? काय हाये ?” "नेमकाच वावरातून आलो. त्ये हाब्रेटाचं रान... सम्द पातळ फटक निंगल.... चार आणे निंगल... अन् बारा आणे बरबाद झालं..." बोलताना लक्षात आलं. छताखाली पंखा गरगरत होता. भिडून झप-झप हवा सोडत होता. साल्याच्या पोरास मच्छर डसायचं काम नाई... आपल्या पोरायच्या अंगावर सम्द्या गुथाच गुथा! आपल्याले कशाचा पंखा? आपुन तसेच आंग खाजवू खाजवू झोपा... आपल्या पैशाच्या नफ्यावर हे हवा खाऊन राह्यले... " "आरे पण त्याले मी काय करू? कितीदा सांगतलं तुले म्या? म्या का घरी तयार केलं का ते बियाणं? कंपनीतूनच तसं आलं.... "कंपनीतून नवतं आलं... तुमीच भेसळ करून देलं..." "काय बकवास करा लागला आशी? तुले शरम वाटती का नाई काई ?” सुभाष झोरे भडकला. "शरम तुमाले कराय पाह्यजे...” अशी त्यांची बडबड सुरू झाली. तसे टीव्ही पाहणारे अस्वस्थ झाले. रागाने मागे वळून पहायला लागले. "अहो, इथी बडबड नका करू! गाणे आयकुदा सुखानं..." "आरे तुमच्या बापानं मले दुखात यकलं... अन् तुम्ही काय गाणे आईकता ते सुखानं!" विठोबा गवारेचा आवाज त्याच्याच नकळत असा चढला. “चाल... चाल... मी सांगतो तुले समजावून सम्दं... आपून दुकानात बसू पोरायले तरास नको..." • असं म्हणून सुभाष झोरे उठला, या हॉलमधून एक दार कृषी सेवा केंद्रात उघडत होतं. ते उघडून दुकानात आला. इकडून रस्त्यावर उघडणारं दार आतून उघडलं. बाहेरचा रस्ता आतून मोकळा दिसाय लागला. विठोबा गवारेही दुकानात आला. "काय भण- भण लावली पाह्यटी पाह्यटी? कावून टकुरं उठवाय लागला तू?” खुर्चीवर बसत सुभाष झोरे म्हणाला. "टकुरं उठवत व्हतो इतक्या दिवस... पण आता फोल्ड्याबगर नाई सोडणार " विठोबा गवारेच्या आवाजात त्याच्याच नकळत अशी जरब