पान:निवडक अंतर्नाद.pdf/१०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्य पंकज कुरूलकर “मी क्षणभर ट्रॅकवर थांबलो. हाच तो क्षण. लोकल समोरून येत होती व मी निः स्तब्धपणे ट्रॅकवर उभा होतो. लोकलखाली मरून जावंसं वाटत होतं. कशी कोणास ठाऊक, बाजूला चालणाऱ्या राहुलने माझी ती अवस्था ओळखली होती. त्याने मला धावत जवळ येऊन बाजूला खेचलं व क्षणार्धात लोकल वेगानं निघून गेली होती.” आयुष्याचं काही खरं नसतं हेच खरं. सगळंच अनिश्चित असतं, म्हणजे राहुल त्रिवेदीचं असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. त्याची कधी कल्पनाही केली नव्हती. मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरी आलो. (घर माझं नाही. बर्व्यांचं. मी त्यांचा पेईंगगेस्ट) हातपाय धुतले व दूरदर्शनसमोर बसलो. तेवढ्यात बद्री आला. त्याला बघून मला नवल वाटलं. विरारची खोली सोडून मला सहा महिने होत आले होते व त्यानंतर मी आजच त्याला बघत होतो. दुसऱ्यांचं घर असल्यामुळं तो हळूच चोरट्यासारखा माझ्याजवळ येऊन बसला व म्हणाला, "गडबड हुआ है.” "क्या ?" "राहुल का अॅक्सीडेंट हो गया है. वो सिरीअस है. तुम अभी मेरे साथ चलो.” "किधर?” विरार मे.” "कैसे?” "वो सबकुछ बाद मे बताता हूँ, पहले मेरे साथ चलो.” मी त्याला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. परत कपडे नीट केले व त्याच्याबरोबर बाहेर पडलो. लोकलला नेहमीप्रमाणे तोबा गर्दी होती. त्यामुळे एकमेकांच्या बाजूला उभं राहून निवांतपणे बोलणंही शक्य नव्हतं. दोघंही गर्दीत कुठेतरी उभे राहिलो. त्यामुळे मला त्याला राहुलबद्दल काही विचारता येईना. वसईंनंतर आमचे चेहरे एकमेकांना दिसले व तोपर्यंत विरार जवळ आलं होतं. विरार स्टेशनहून आमची रूम पाच मिनिटांवर होती. कुठल्या हॉस्पिटलमध्ये राहुलला ठेवलं आहे हे बद्रीने मला सांगितलं नव्हतं व मीही विचारलं नव्हतं, उतरल्यावर बद्री म्हणाला, "चाय पियेंगे." "अरे, पण आधी राहुलला बघू ना." माझं न ऐकता त्याने मला आमच्या नेहमीच्या टपरीवर नेले व दोन चा ऑर्डर केले. १०८ निवडक अंतर्नाद चहा येईपर्यंत कसे कोणास ठाऊक, आमचे आणखी दोन रूममेट – गोसावी व खन्नाही - आले. मला आश्चर्यच वाटलं. - "तुला लगेच घेऊन येतो म्हणून ह्याने आम्हाला सांगितलं होतं' गोसावी म्हणाला, तिघांचेही चेहरे फटफटीत दिसत होते. "काय झालं? पटकन सांगत का नाही?" मी वैतागलो होतो. "राहुलने आत्महत्या केली. लोकलखाली येऊन आत्महत्या केली. काल रात्री साडेबाराच्या सुमारास हे घडलं. डेड बॉडी पोलिसांच्या ताब्यात आहे. राहुलच्या पाकिटात तुझं कंपनीचं कार्ड सापडलं. मग ते तुझ्याबद्दल विचारू लागले. तुझ्या कंपनीत जातो म्हणाले होते. मग आम्हीच म्हटलं, कंपनीत जाऊ नका, आम्हीच त्याला बोलावून आणतो!” मला त्यांचं ऐकून काही सुचेचना, राहुल असं काही करू शकतो ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तो एवढं मोठं धाडस कसं करू शकला हेच समजत नव्हतं. साध्या झुरळाला घाबरणारा राहुल; अंगात एवढं धैर्य कुठून आणू शकला? "मी आणि तो नेहमीच्या सवयीप्रमाणे जेवण झाल्यावर रात्री अकरानंतर स्टेशनला फिरायला आलो होतो. इथेच मी सिगरेट घेतली व आम्ही गप्पा मारत उभे होतो. तेवढ्यात राहुल लघवी करून येतो म्हणाला. आपली रेल्वे ट्रॅकवर रात्रीची लघवी करायची सवय तुला माहितीच आहे. मी तो आत्ता परत येईल म्हणून तेथेच उभा राहिलो, प्लॅटफॉर्मवरून विरार लोकल सुटलेली मी बघितली. पण असं काही होईल वाटलंच नव्हतं. ह्या माणसाने समोरून ट्रेन येत आहे बघितल्यावर सरळ उडी मारली. त्याचे दोन तुकडे झाले. ट्रेन थांबलेली व थोडासा गलका झाल्याचं मी बघितलं, मी सहज कुतूहल म्हणून पुढे बघायला गेलो व हे समोर आलं. त्याचा हात व मुंडकं अक्षरशः वेगळं होऊन तुटून पडलं होतं. अजूनही आठवलं की अंगावर शहारे येतात. " गोसावीने बोलता बोलता टेबलखाली मान घातली व तो चक्क रडू लागला, मला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. गोसावी बावीस तेवीस वर्षांचा पोरगा असेल. राहुलच्या शरीराची अशी अवस्था झाल्याची कल्पना केल्यावर माझ्या