पान:निवडक अंतर्नाद.pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंगावरही शहारा आला होता. गोसावीची अवस्था मी समजू शकत होतो. मी त्याच्या पाठीवरून हलकासा हात फिरवला, शेवटी मी त्याच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठा होतो. "उसको पुलिसने जोरसे दो झापड मारा" खन्ना म्हणाला. "क्यों?" "पुलिसने बोला की तेरे दोस्तको तुने धक्का देके मारा होगा. कुछ दुश्मनी होगी, बादमे मोटरमन और प्लॅटफॉर्म के लोगोने बताया की वो खुद ट्रेनके सामने आया था, किसीने उसे धक्का देते हुओ देखा नही !” खन्नाच्याही डोळ्यात बोलता बोलता पाणी आलं. वातावरणात चमत्कारिक शांतता पसरली. थोड्या वेळाने गोसावीच बोलला, “मी त्याला धक्का देऊ शकेन का? मी त्याची खूप चेष्टा करायचो. आपल्या सर्वांमध्ये मोठा तूच होता. त्यानंतर राहुल, पण अगदी सोवळा सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही या सदरात मोडणारा, सिगरेट नाही. दारू नाही. पोरीबाळी नाही. एकदम सज्जन कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही; मग त्याची चेष्टा नाही करणार तर काय करणार! कधी रूममध्ये ब्लू फिल्म लावली तर आतल्या खोलीत जाऊन झोपणार त्याच्या भिंतीवर स्टेफी ग्राफऐवजी राम-कृष्णाच्या तसबिरी लावणार! मग मी तरी कसा गप्प बसणार?” राहुलची ही आठवण निघाल्याने त्याला आता परत बरं वाटत असावं. "काल काही विशेष घडलं का? राहुल सगळ्यांशी कसा बोलत होता? तुम्ही त्याला काही बोललात का? तो नाराज वगैरे होता का? आत्महत्येच्या संदर्भात काही बोलला होता का?" "विशेष काहीच घडलं नाही ह्याचंच आश्चर्य वाटतं आहे. आमच्यापैकी कोणाशीही त्याचं भांडण झालं नाही. एरवीही तो आमच्याशी कमीच बोलायचा. आम्ही त्याला लहान वाटत असू. तू दादरला राहायला गेल्यावर दोन तीन महिने इकडे फिरकला नाहीस, तेव्हा तो म्हणाला होता की, 'राघव तो बड़ा आदमी हो गया. नौकरी मिल गयी तो अपनेको भूल गया.' " "मी त्याला या रविवारी भेटणारच होतो. त्याचा मला ऑफिसमध्ये फोन आला होता. अजून दोन दिवसांनी मीच विरारला येतो, म्हणालो होतो. तेवढ्यात तो असं काही करेल असं वाटलं असतं तर आधीच आलो असतो. " "आम्हाला तर त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती, खन्नाला नेहमीप्रमाणे त्याच्याकडून शंभर रुपये उधार हवे होते. ते त्याने लगेच काढून दिले. त्याने थोडाफार अभ्यासही केला. बाकीचा वेळ गाणंबिणं ऐकत बसला होता. पूजाही केली. काही बिघडलं आहे असं वाटलंच नाही. शेवटपर्यंत त्याने कल्पनाही येऊ दिली नाही. " "मग तो अपघात कशावरून नाही ? आत्महत्याच कशावरून? तंद्रीत तो ट्रॅक ओलांडून जात नव्हता कशावरून?” "शक्यच नाही. ट्रॅक ओलांडण्याचा प्रश्नच येत नाही. आपण लघवी नेहमी सर्व्हिस ट्रॅकवर करतो. लोकल ट्रॅकपर्यंत जायचा प्रश्नच येत नाही आणि लोकल येताना दिसल्यावर त्याने अंग झोकून दिल्याचं मोटरमननेच सांगितलं. " "बॉडी कुठं आहे?” "पोस्टमार्टम झालं आणि नंतर बॉडी पोलिसांच्या ताब्यात आहे.' " "त्याच्या घरी कळवलंत?" "कळवलं, पण आमची चूक झाली. आम्ही गोधऱ्याला फोन केला. त्याच्या वडलांना तो वारला म्हणून कळवलं आणि बॉडी घेऊन येतो आहे म्हणून कळवलं. पण आता पोलीस बॉडी ताब्यातच देत नाही आहेत. घरच्यांना बोलवा म्हणताहेत. " "तू फोनवरून राहुल वारल्याचं कळवलंस की आत्महत्या केल्याचं कळवलंस?" "म्हणजे तसं आत्महत्या केल्याचंच कळवलं. आमची जरा चूकच झाली. असं कळवायला नको होतं. " गोसावीला त्याची चूक लक्षात आली होती. "ओह गॉड! हे ऐकल्यावर त्याच्या वडलांना काही झालं तर ? असं कधी कळवतात का? मला सांगताना कशी बरोबर अक्कल सुचली?" "आपल्याला काहीच सुचत नाही बुवा, असा प्रसंग आयुष्यात कधी आपल्यावर आला नव्हता. आपण मॅड झालो आहोत. बॉडी आपल्याला बघवत नाही. आत्तापर्यंत आपल्यात असलेला मित्र असा कसा जाऊ शकतो यार? काय दुःख होतं त्याला? आम्ही त्याच्या एवढे जवळ होतो पण त्याला आपल्याला काहीच सांगावसं वाटलं नाही? आम्ही एवढे परके होतो? आपण जवळ राहतो म्हणजे काय? आपण एकमेकांना कितपत ओळखतो? आजपर्यंत आपण नुसतेच खुशालचेंडू होतो. आता कशाचाच अर्थ समजत नाही!” गोसावी परत रडू लागला. रडता रडता तो उठून बाहेर गेला. " “उसको सुबहसे उल्टी हो रहा है. कुछ समझमे नहीं आता.' खन्नाचाही चेहरा भेदरलेला होता. "पोस्टमार्टम झाल्यावर त्या डॉक्टरला म्हणालो की ते धड आणि हात एकत्र दिसेल असं थोडंफार तरी शिवून टाका. तर त्यांनी कायदा सांगितला की जेवढं शरीर उसवलं, तेवढंच शिवायचं असतं. आता त्या शरीराचे तीन तुकडे गोधऱ्याला घेऊन जायचे तर पोलिस म्हणतात तुम्ही त्याचे कोण? बॉडीची ही परस्पर विल्हेवाट लावणार नाही कशावरून? बॉडी त्याच्या वडिलांच्याच हातात देणार कशावरून? नातेवाईकाने येऊन ओळख पटवून बॉडी ताब्यात घ्यायची असते.” खन्नाने मराठी बोलण्यात चांगलीच सुधारणा केलेली दिसत होती. शेवटी त्यालाही मुंबईत येऊन तीन वर्षं झाली होतीच. “हमारे साथ पुलिसमें चलो. बॉडीको लेते है और गोध्रा चलते है." मी त्याचाच विचार करत होतो. पोलीस सरळपणे बॉडी ताब्यात देतील असं वाटत नव्हतं. राहुलच्या वडलांना परत गोधऱ्याला फोन करण्यात अर्थ नव्हता. मला केदारांचं नाव निवडक अंतर्नाद १०९