पान:निवडक अंतर्नाद.pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आठवलं. इथले ते नगरसेवक होते व थोडेफार ओळखीचेही होते. त्यांचं घरही मला माहिती होतं. "कुठल्या पोलिसांच्या ताब्यात आहे बॉडी?” " रेल्वे पोलिसांच्या. " "मी गोसावीला घेऊन जातो व अर्ध्या तासात येतो. तोपर्यंत तुम्ही इथेच बसा, " टपरीच्या बाहेर उभ्या असलेल्या गोसावीला मी बरोबर घेतलं आणि निघालो. सुदैवाने केदारसाहेब घरीच होते. मी त्यांना ओळख सांगितली. त्यांनी मला ओळखलंही. मी त्यांना माझं काम सांगितलं. "काय करायचा तुमचा हा राहुल त्रिवेदी ?” "सर, आम्ही सगळेच रेडिओ ऑफिसरच्या परीक्षेसाठी मुंबईत आलेलो. गेल्या चार वर्षांपासून मी आणि राहुल परीक्षा देत होतो. ह्या परिक्षेचे तीन ग्रुप असतात. एका वेळी एका ग्रुपची परीक्षा द्यायची असे आम्ही दोघेही दोन्ही ग्रुपच्या परीक्षा पास व्हायचो पण शेवटच्या ग्रुपच्या एका पेपरला नापास होत होतो. पुढच्या वेळी परत पहिल्या ग्रुप्सची परीक्षा द्यावी लागते. फक्त उरलेल्या पेपरची परीक्षा देऊन चालत नाही. या प्रकाराला कंटाळून मी शेवटी दुसरी नोकरी धरली. पण राहुलचा प्रयत्न चालूच होता. " "म्हणजे परीक्षेला कंटाळून त्याने आत्महत्या केली तर... " केदार पटकन बोलले. मला त्यांचं आश्चर्य वाटलं. किती पटकन त्यांनी राहुलच्या आत्महत्येवरचा निष्कर्ष काढला होता. मी काहीच बोललो नाही. "हे पोलीस खूप हरामी असतात. मी त्यांना दम देऊन काम करून घेतलं तर पुढे मागे ते कटकटी करतील. तेव्हा त्यांची मागणी आपल्याला मान्य करावीच लागेल.” "तुम्ही यातून सोडवा माझ्या मित्रांना आपण काय पाहिजे तो खर्च करूच." "तू असं कर, माझ्याकडे काही पैसे देऊन ठेव. मी त्यांच्याशी बोलतो, तुझं काम होईल, बॉडी कशी घेऊन जाणार?” "अॅम्ब्युलन्स करावी लागेल. आम्हालाच बॉडी गोधायला घेऊन जावी लागेल, "तू अॅम्ब्युलन्सची सोय कर. तोपर्यंत मी बॉडी मिळवून देतो. " मी केदारांकडे पैसे ठेवले. कालच पगार झाला होता. पगारही अजून फारसा नव्हता. बर्व्यांचे पैसे द्यायचे होते. पण ही वेळ महत्त्वाची होती. मित्रांकडे काय पैसे असायचे याची मला कल्पना होती. मी नुकताच त्यांच्यातून सुटलो होतो. गोधऱ्याला राहुलची बॉडी दिल्यावर त्याच्या वडलांकडे पैसे मागू असाही विचार पटकन मनात येऊन गेला. केदारांकडून निघालो व स्थानिक शिवसेनेच्या शाखेकडे अॅम्ब्युलन्सची चौकशी केली. सुदैवाने त्यांच्याकडे एक दिवसासाठी अॅम्ब्युलन्स मिळू शकत होती. ११० निवडक अंतर्नाद राहुलच्या गावाला डेड बॉडीबरोबर जाण्याची सगळ्यांनीच तयारी दाखवली. माझा तिथे जाण्याचा इरादा नव्हता. माझी एक दिवस रजा लागली असती व मला ते परवडणारं नव्हतं. पण सर्वांचं मत पडलं की मी त्यांच्याबरोबर हवाच. मी यात पुरतो अडकलो आहे ह्याची मला कल्पना आली. माझ्याकडे मित्रांनी मोठेपण देऊन टाकलं होतं. माझी सुटका दिसत नव्हती. मी रडतखडत ते मान्य केलं. केदारांनी खरोखरच काम केलं. बॉडी लगेच मिळाली. अॅम्ब्युलन्स तयार होतीच, खन्ना म्हणाला, "कुछ खा लेते है आठ घंटेका सफर है. सुबह तक पहुँच जाएँगे, रूम मे चलो, कुछ खाना बनाते है.” खन्नाला भूक लागलेली दिसत होती. "बॉडीला आपण जास्त काळ असं ठेवू शकत नाही. नाहीतर वास येईल. परत आठ तास बॉडीबरोबर प्रवास करायचा आहे," मी घाई केली. "त्याची व्यवस्था केली आहे. वास येणार नाही." बद्री बोलला. मग आम्ही रूमवर आलो. डोळसकर म्हणून सद्गृहस्थांचा तो फ्लॅट होता. आम्ही विद्यार्थी म्हणून त्यांनी आम्हाला कमी भाड्यात फ्लॅट वापरण्यासाठी दिला होता. आम्ही सगळे आधी हैद्राबादला रेडिओ ऑफिसरचा कोर्स करत होतो. तेथील कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलची नीटशी सोय नव्हती. त्यामुळे पूर्वी ग्रुप वनची परीक्षा पास होऊनही इथे येऊन माहिमच्या संस्थेत विद्यार्थी म्हणून नाव नोंदवलं होतं व परत पहिल्यापासून आम्ही कोर्स जॉईन केला होता. त्यानंतर परत त्याच परीक्षा शेवटापर्यंत जाणं व परत मागं फिरणं. पण कोर्सनंतर होणारे फायदे आमच्या डोळ्यासमोर दिसत होते. डॉलर्समध्ये पगार, सतत परदेशी भटकंती, एका बंदरावरून दुसऱ्या बंदरावर वेगवेगळं जीवन इथे येणारा प्रत्येक जण भविष्यात आपल्यासाठी सुंदर काहीतरी वाढून ठेवलं आहे असं स्वप्न घेऊन येतो. हा कोर्स करायला लागून चार साडेचार वर्षं झाली तरी मी मी पास होण्याची चिन्हं दिसत नव्हती. मी निश्चितच ढ नव्हतो, पण काहीतरी चुकत होतं हे नक्की. नगरसारख्या ठिकाणी राहून आई • नोकरी करत होती व मला पैसे पाठवत होती हे मला शोभादायक नक्कीच नव्हतं. आयुष्यात मी एकही गोष्ट धडपणे न करता आईला त्रास मात्र देतो अशी भावना निर्माण झाली होती. एक फ्रस्ट्रेशन आलं होतं. आपल्याला नऊ ते पाच नोकरी करायची नाही असं काहीतरी मागेच ठरवलं होतं. पण नशिबात तेच दिसत होतं. परत दुसरं काही करण्यासाठी आईकडे पैसे मागायची लाज वाटत होती. एवढ्या काळात मुंबईला काही मित्र झाले होते. ते म्हणाले, "तू कॉम्प्युटरचा कोर्स कर कोर्सनंतर तुला नोकरी नक्कीच मिळेल. कोर्सचे पैसे सध्या आम्ही देतो. नोकरी लागल्यावर आमचे पैसे परत देऊन टाक. " त्यांचं बोलणं ऐकून मला गहिवरून आलं होतं. एवढे चांगले