पान:निवडक अंतर्नाद.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मित्र मिळणं भाग्याची गोष्ट होती, मी मित्रांकडून पैसे घेऊन कॉम्प्युटरचा कोर्स केला व मला खरोखर नोकरीही मिळाली. मी ह्या मित्रांपासून वेगळा झालो. "आज कोणाची पाळी आहे स्वयंपाकाची ?" "राहुलची होती, " बद्री बोलला. "हरकत नाही. त्याच्यापुढची पाळी माझी होती, मी करतो रे स्वयंपाक, नाहीतरी राहुलला आता धरायचं नाही आहे.” बद्रीला बोलताना परत भरून येत होतं. बद्रीने स्वयंपाक सुरू केला. मी राहुलची खोली बघू लागलो. काही महिन्यांपूर्वी मी त्याच्याबरोबर ह्याच खोलीत झोपत होतो. राहुल फार शिस्तीचा, नीटनेटका होता. त्याच्या भिंतीला त्याचं सामान नीटनेटकेपणाने लावलेलं होतं. गादी, सुटकेस, अभ्यासाची पुस्तकं. देवाच्या तसबिरी. त्याच्या समोरची भिंत माझी होती. मी गेल्यावर ह्या लोकांनी दुसरा कोणी पार्टनर घेतला नव्हता. त्यांना त्यामुळे जास्त भाडं भरावं लागत होतं. "राहुलला घरून काही परेशानी आहे असं कधी वाटलं का? कधी तुमच्याशी तसं बोलला?" मी त्याच्या सुटकेसला हात लावत गोसावीला विचारलं. "तसं विशेष कधी बोलला नाही. पण त्याला घरून लग्न करण्याबद्दल सांगितलं असावं, तो घरचा किती श्रीमंत होता हे तुला माहिती आहेच. त्याला रेडिओ ऑफिसर बनण्याची अवदसा कुठून सुचली कोणास ठाऊक. घरी एवढी मोठी शेती. तेलाचा व्यापार, हा नुसता घरी बसला असता तरी चाललं असतं. एकदा तो बोलला होता की घरचे म्हणतात, जेवढे पैसे नोकरीत मिळतील तेवढे काही न करण्यासाठी देतो पण घरी बैस, पण त्याला स्वतःच्या हिमतीवर पुढे यायचं होतं. त्याला लग्नाबद्दल विचारलं तर पटकन नाही म्हणाला. त्यामुळे घरचे वैतागले होते. गुजराती लोकांमध्ये लवकर लग्न करतात. हा एव्हाना दोन मुलांचा बाप असायला पाहिजे होता. " "तेच त्याचं दुःख असावं. तुला आठवतं, कलकत्त्याहून जो आपली ओरल घेणारा आला होता त्यानेच आपले थीअरीचे पेपर तपासल्याचं कळलं होतं. मी त्याचा पत्ता मिळवून कलकत्त्याला पत्र पाठवलं होतं व विचारलं होतं की मला कुठल्या हिशेबाने नापास करता आहात? पण त्यानं उत्तर दिलं नाही. मग मी कोर्सच सोडायचं ठरवलं. राहुललाही तसं वाटत होतं. पण अपयशी होऊन त्याला घरी जाण्याची हिंमत नव्हती. म्हणूनही त्याने आत्महत्या केली असेल.” "पण मग अशी मधेच का? आता काही रिझल्ट लागलेला नव्हता, उलट परीक्षा जवळ आलेली आहे म्हणून तो नेहमीप्रमाणे अभ्यास करत होता. मग त्याच्या डोक्यात आत्महत्या करण्याचं एकदम का यावं?" गोसावीने रास्त प्रश्न विचारला. माझ्याकडेही त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. किंबहुना मी तेच शोधत होतो. बोलता बोलता राहुलची सुटकेस उघडण्याचा प्रयत्न करत होतो. पण सुटकेस लॉक केलेली होती, "राहुल सुटकेस कधी बंद ठेवायचा नाही. यामधे तो काही महत्त्वाचं ठेवायचा? तुमच्यापासून लपवून वगैरे ?” “असं उघडपणे तरी वाटलं नाही. तू गेल्यापासून तो तसा एकटा असायचा, हे मात्र खरं आहे. 22 "आपण सुटकेस उघडून बघायची? नाहीतरी तो कायमचा गेलाच!” "कशाला? त्याचं सर्व सामान त्याच्या गावी पोचतं करू, मग त्याच्या आईवडलांना काय करायचं ते बघून घेतील.” "कदाचित यात तो काहीतरी ठेवत असेल. त्याने आत्महत्या का केली हे तुला शोधावंसं वाटत नाही?” "शोधून काय मिळणार आहे? डोक्याला त्रास होईल.” “आपल्यातील एकाला आत्महत्या का करावीशी वाटली हे तुला शोधावंसं वाटत नाही? मी माझ्या जबाबदारीवर कुलूप तोडतो." मी म्हटलं, मला गोसावीचा रागच आला. कुलूप तोडणं माझ्यासाठी अवघड नव्हतं. मी ह्यडाचा इंजिनिअर होतो. पटकन कुलूप तोडलं. बॅग व्यवस्थित लावलेली दिसत होती. राहुलचे कपडे त्यात व्यवस्थित लावून ठेवलेले दिसत होते. एक दोन अध्यात्माची पुस्तकंही दिसत होती. जणू तो आता गावाला चालला आहे किंवा गावाहून येत आहे अशा पद्धतीने सर्व लावून ठेवलेलं होतं. "राहुल गावाला जाणार आहे, असं काही बोलला होता?” "त्याला गावाहून पत्र आलं होतं. पण तो गावाला जायचं काही बोलला नव्हता!" मग मी परत बॅग शोधू लागलो, पैशाचं पाकिट दिसलं. त्याच्यात बरेच पैसे दिसत होते. "आपला पैशाचा प्रॉब्लेम मिटला, राहुल जातानाही बरेच पैसे ठेवून गेला आहे!" कोणी काही बोललं नाही. मी काही नोटा काढून चवक माझ्या खिशात ठेवल्या तळाशी एक लिफाफा होता, तो उघडल्यावर आत एक पत्र व मुलीचा फोटो दिसला, मुलगी खानदानी गुजराती दिसत होती. पत्र गुजरातीत लिहिलेलं होतं. राहुलच्या सहवासात राहून गुजराती साधारण कळू शकत होतं. पत्र वडलांनी लिहिलं होतं. 'फोटोतली मुलगी पसंत केली आहे तिच्याशी लग्न पक्कं करत आहोत. तुझ्या पसंतीची अपेक्षा आहे. एकदा येऊन तिला बघून जा.' वगैरे लिहिलं होतं. राहुल गावाला जायची तयारी करत असावा, मग मधेच त्याला हे का सुचावं? मी बॅग बंद केली. बद्रीचं जेवण तयार झालं होतं. मलाही भूक लागली होती. मित्राने आत्महत्या केली असूनही आम्ही सगळेच व्यवस्थित जेवलो. परत रात्रीचा प्रवास करायचा होता. अॅम्ब्युलन्समध्ये आम्ही बसलो. बॉडी मागे. ड्रायव्हर शेजारी मित्रांनी मला बसायला सांगितलं. या तिघांपैकी एक जण आलटून पालटून माझ्या बाजूला बसणार होता. दोघे जण मागे बॉडीबरोबर. निवडक अंतर्नाद १११