पान:निवडक अंतर्नाद.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परत लघवीचा प्रोग्राम झाला व यावेळी खन्ना माझ्या बाजूला येऊन बसला. खन्ना म्हणजे टिपिकल पंजाबी होता, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, इसरा, सतत जोक सांगणारा, आमची तो करमणूक होता. पण आज तो खूपच शांत होता. मी आपणहून त्याच्याशी काही बोललो नाही. तो आपणहून बोलेल ह्याची जणू मनातून खात्री वाटत होती. "राहुल हल्ली फार चमत्कारिक वागत होता" खन्नाने निरव शांततेत बोलण्यास सुरुवात केली. "म्हणजे?" "हे मी माझ्याच बाबतीत बोलतो आहे, इतरांच्या बाबतीत मला माहिती नाही. आणि गोष्टच अशी आहे की इतरांना मी ती सांगू शकत नाही. आज तू बाहेरचा झाल्यामुळे धाडस करू शकतो.” "मनात ठेवू नकोस. सांगितल्याने बरं वाटेल.” मग काही वेळ शांततेत गेला. खन्ना मनाशी जुळवाजुळव करत असावा, "तू गेल्यावर ह्याची सुरुवात झाली. तू व राहुल एका खोलीत झोपायचा तर आम्ही तिघे दुसऱ्या खोलीत. तू गेल्यावर राहुलला एकटं वाटू नये म्हणून मी त्याच्याबरोबर झोपू लागलो. काही दिवस ठीक गेले. एकदा रात्री मी झोपलेलो असताना मला एकदम जाग आली. बघतो तर राहुल माझ्या पँटच्या चेनशी चाळे करत होता. माझा क्षणभर विश्वास बसला नाही. मला काही कळायच्या आत राहुल समोरच्या भिंतीला स्वतःच्या अंथरुणात जाऊन झोपला. मी एरव्ही झोपताना कधी पँट घालत नाही. लुंगी नेसतो हे माहिती तुला आहे. त्यादिवशी मी पिक्चरहून रात्री उशिरा आलो होतो व जाम थकल्यामुळे तसाच झोपलो होतो. माझा आधी स्वत:वर विश्वास बसला नाही. भास झाला असेल असं वाटलं. मी त्याला याबद्दल काहीच बोललो नाही. नंतर काही दिवस गेले असतील. परत एके रात्री तसाच प्रकार घडला. पण यावेळी माझा स्वतः वर विश्वास होता. मला परत झोपेतून जाग आली होती. यावेळी मी लुंगी नेसली होती. झोपेत लुंगी कधीच जागेवर राहत नाही. ती जागेवर नव्हतीच, सुटलेली होती व राहुलने अंडरवेअरमधून आत ह्यत घातला होता. माझं लिंग तेव्हाही ताठरलेलं दिसलं. मी राहुलला घाबरून विचारलं, 'तुला काय पाहिजे?' 'तू.' 'तू मला आवडतोस खन्ना किती रुबाबदार आहेस.' 'तू मुलगी आहेस?' 'तू फक्त मुलींनाच आवडायला हवास ?' 'अर्थात, ' 'मलाही आवडलास तर काय बिघडेल?' 'आर यू मॅड? तू मुलगा आहेस. तुला मी चालेल?' आवडून 'मला मुलगेच आवडतात. मला तू आवडतोस.' ११४ • निवडक अंतर्नाद कसं "मला त्याच्या बोलण्याची शिसारी आली. राहुल असं काही म्हणेल अथवा करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. "मी म्हटलं, 'तू सोजा राहूल. मुझे ऐसी बातोमे थोडाभी इंटरेस्ट नही है, मुझे लडका सिर्फ दोस्ती के लिए पसंत है बाकी चीजके लिए लडकी, तेरा लडकी को देखके उठता नहीं है क्या?' मी त्याला सरळ विचारलं. "तो गप्प बसला. निराश झाल्यासारखा वाटला. परत आपल्या जागेवर जाऊन झोपला. राहुल जेवढा अपसेट झाला नसेल तेवढा अपसेट मी झालो होतो. राहुलची माझ्या मनात काही इमेज होती ती सर्व इमेज या घटनेमुळे तुटून पडली, राहुलबद्दल असं काही डोक्यातच आलं नव्हतं. मला तो होमो आहे ही कल्पनाच सहन होत नव्हती. काय करावं हेच सुचत नव्हतं. आपल्यापैकी कोणाला त्याने असा त्रास दिला आहे का, हा विचार डोक्यात येत होता. पण कोणाला काही विचारायची सोय नव्हती. राहुलबद्दल आणखी कोणाला काही वाईट समजू नये असंही वाटत होतं.” "राहुलने परत तसा प्रयत्न केला नाही?” " केला पण अस्पष्टसा. एकदा हे दोघेही नसताना परत एकदा प्रयत्न केला, पण परत मी त्याला झिडकारलं. कडक शब्दांत सुनावलं. त्याच्यासाठी हे चांगलं नाही हे समजावून सांगितलं. तो गप्प बसला. गेल्या काही महिन्यांत मात्र त्याने माझा नाद सोडला होता. मी ह्यताशी येत नाही हे त्याच्या लक्षात आलं असावं.” " दुसऱ्या कोणाबरोबर त्याने असं काही केलं असल्याचा संशय आला ?” "नाही. मी नंतर काही तरी कारणाने परत या दोघांच्या रूममध्ये झोपू लागलो. राहुल एकटाच त्या रूममध्ये झोपायचा. " " ह्या गोष्टीचा आणि राहुलच्या आत्महत्येचा काही संबंध असेल असं वाटतं का?” "असेल असं वाटतं. राहुलला नेमकं काय पाहिजे होतं हेच समजत नाही. त्याच्या बॅगेत मुलीचा फोटो बघितला. ती त्याला नको असेल. त्याला मी हवा असेन. मनात तो खूप निराश झाला • असेल. तसं असेल तर मी त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलो असं होईल.” मग खन्ना गप्पच बसला. त्यालाही पुढे काय बोलावं ते समजत नव्हतं. माझ्याही डोक्यात वादळ उठलं होतं. सगळा गुंता होत चालला आहे असं वाटत होतं. राहुलने नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली असेल? अॅम्ब्युलन्स वेगाने चाललेली होती. खन्ना खिडकीवर डोकं ठेवून झोपून गेला. मला मात्र काही सुचत नव्हतं. मी राहुलचा शोध घेत होतो. गुंता सुटला नाही. पण गोध्रा आलं. पहाट झाली होती. राहुलच्या घरात दिवे दिसत होते. अॅम्ब्युलन्स थांबेपर्यंत त्या घरातून कोणीतरी बाहेर आलं व