पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अल्सेशिअनच्या रूपानं यमदूतच दिसत आहे. आता अल्सेशिअनला काही तरी वास येऊ लागला असावा. तो जमिनीला सरपटून वास घेत घेत बांसवाड्याकडे येऊ लागला. जणू एखादा बाणच सर्रकन येऊ लागला सुमेसरच्या विचारशक्तीला तो पळाला. ह्यतातल्या चपला कुठेतरी पडल्या. क्षणात तो बांसवाडा ओलांडून पायवाटेला लागला होता. पण त्याच क्षणांत अल्सेशिअनलादेखील सगळं काही कळून चुकलं. वेगानं धावत तो सुमेसरच्या दिशेनं येऊ लागला आणि काही क्षणांतच त्याच्यापासून चार पावलांवर येऊन ठेपला. सुमेसरची नसन्नस थिजून गेली. दुसऱ्या क्षणीच सुमेसरची तंगडी त्याच्या जबड्यात असेल आणि पाठीवर पहारेकऱ्यांच्या काठ्यांचा वर्षाव. तेवढ्या क्षणातच त्याला हेही दिसलं की अल्सेशिअनच्या जोडीनं ललनवापण धावत येत होता. त्याची तेल पाजलेली लाठी हवेत चमकत होती. आधी अल्सेशिअन त्याच्या मांसाचा लचका तोडतोय की आधी ललनवाची काठी त्याची कवटी भेदत्येय... जिवाच्या आकांताने सुमेसर पळत होता. इकडे अल्सेशिअननं त्याच्या अंगात आपले दात घुसवण्यासाठी हवेत उडी घेतली आणि तिकडे ललनवाची काठी दोनदा बरसली... सडाक् सडाक्... जबरदस्त प्रहाराचे सपकारे चहूकडं घुमले पूरबा डेऱ्यातील झोपड्यांमधून स्त्री-पुरुष बाहेर येऊन गोळा झाले होते आणि पलीकडे खाटांवरून उठून बसलेले पहारेकरीपण पळत इकडेच येऊ लागले होते. डेऱ्यापासून वीसएक पावलांवर अल्सेशिअन विव्हळत पडला होता. पहारेकरी याची सुसंगती लावायचा प्रयत्न करत होते. सुमेसर धापा टाकत रामायणबाबा आणि बलेसरच्या कानाला लागला. "या काही भारतीयांना पाश्चिमात्य देशांमधली 'कल्चर' ही संकल्पना एतद्देशीय भाषांमध्ये आणावीशी वाटली. बांगलाभाषकांनी त्यासाठी 'कृष्टि' हा शब्द वापरून मूळची शेतीच्या मशागतीची लक्षणा कायम राखण्याचा प्रयत्न केला. रवींद्रनाथ ठाकूर यांना हा शब्द फारसा पसंत पडला नव्हता. त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातील संस्कृतचे प्राध्यापक आणि गाढे अभ्यासक डॉ. प. ल. वैद्य यांच्याकडे विचारणा केली. वैद्यांनी त्यांना सांगितले, की मराठीमध्ये इतिहासकार आणि विचारवंत विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी घडवलेला 'संस्कृती' हा शब्द लोकांना समाधानकारक वाटल्याने रुळला आहे. रवींद्रनाथांना हा शब्द आवडला, त्यांनी तो जसाच्या तसा वापरला आणि तो एक अखिल भारतीय पातळीवर सामायिक शब्द म्हणून रुळण्याचा मार्ग मोकळा केला. ललनवानंच मारलं अल्सेशिअनला, माझ्या मागं लागला म्हणून. आणि आता एकटक तो ललनवाकडे पाहत उभा राहिला ज्याच्या काठीच्या दोन फटक्यांनीच अल्सेशिअन धराशायी झाला होता. 'कल्चर' या शब्दाचे सरधोपट भाषांतर न करता राजवाड्यांच्या प्रतिभेने त्याच्या अर्थातील एक धागा उचलून आकाशात हा कोण नवा तारा डेऱ्यातील झोपड्यांना थंडावा देणारा ! " - आवला होता ? पूरबा काय सूर्य, काय चंद्र, काय इतर तारे आतापर्यंत सगळ्यांनी पूरबा डेऱ्यावर आगच ओकली आहे का ललनवा आपल्या बापाच्या पापाचं प्रायश्चित करत होता? त्यानं बलेसरकाकाचा हात जोरानं दाबला. संस्कृती • तेवढ्यात जोगिंदर मिसिर पण आपल्या भाऊबंदांसह येऊन दाखल झाले. कुणी तरी धावत जाऊन त्यांना सगळं सांगितलं होतं. जमिनीवर तडफडणाऱ्या आपल्या अल्सेशिअनला पाहून ते तांबडेलाल झाले. "कोणी मारलं त्याला?” ते गरजले. "मी मारलं मालक! हा वेडा होऊन माझ्या मागं लागला होता, मी मारलं नसतं तर हा मला घायाळ करणार होता." ललनवानं पुढे होऊन नम्र स्वरात उत्तर दिलं. "तू खोटं बोलतोस. हा पागल नव्हता झालेला, अरे हरामजाद्यांनो, तोंड काय पाहतां? तो जिवंत आहे अजून घेऊन चला त्याला बक्सरच्या मोठ्या दवाखान्यात. आणि तू ललनवा माझ्या नजरेसमोरून आधी दूर हो." • जोगिंदर मिसिरनी गर्जना केली. आदेश प्रमाण मानून ललनवा पाऊलवाट धरून आपल्या ठिकाणाकडे जाऊ लागला. पूरबा डेऱ्यातले तमाम झोपडीवासी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत राहिले. रामायणबाबा आणि बलेसरकाकाच्या डोळ्यांतून त्याच्यासाठी स्नेह आणि आशीर्वाद पाझरू लागले. (दिवाळी १९९९) त्यासाठी आपल्याकडील संस्कार ही परंपरेतील सर्वज्ञात संकल्पना उचलली. संस्कारांनी सिद्ध होते ती संस्कृती, मग ते संस्कार बरे असतील किंवा वाईट असतील, जाणिवेतील किंवा नेणिवेतील असतील आणि स्वकीय असतील किंवा परकीय असतील. संस्कार म्हणजे व्यक्तीला जो परिसराचा, विशेषतः मानवी परिसराचा अनुभव येतो, त्या अनुभवाचे व्यक्तीवर उमटलेले ठसे, असे हे संस्काराचे ठसे कधी संचित रूपात टिकतात, कधी लोप पावतात, तर कधी कालांतराने स्थितिस्थापित होतात असे भारतीय परंपरा मानते. संस्कृती म्हणजे अशा संस्कारांचे भांडार, राजवाड्यांच्या योजकतेमुळे संस्कृती हा शब्द, कल्चर या •शब्दापेक्षा अधिक अर्थघन असा, आपल्या हाती आला. 'कल्चर' साठी संस्कृती या शब्दाचा वापर हे सर्जनशील भाषांतराचे सुंदर उदाहरण आहे. अशोक केळकर ( ऑक्टोबर २००३) निवडक अंतर्नाद १२१