पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्षाकाठी एकदा वाघ मूळ तेलुगु लेखक : सत्यम् शंकरमंचि अनुवाद : लक्ष्मीनारायण बोल्ली एका भाषेतील साहित्याचा, विशेषतः ललितकृतीचा दुसऱ्या भाषेत रसाळ आणि तरीही प्रामाणिक अनुवाद करणे खूप अवघड आहे. एका कुपीतील अत्तर दुसऱ्या कुपीत ओतण्याइतके. पण भारतासारख्या बहुभाषिक देशात अनुवादित साहित्याला खूप महत्त्व आहे हेही तितकेच खरे. म्हणूनच आपल्या पहिल्या अंकापासून अंतर्नादने अनुवादित साहित्याला मानाचे स्थान दिले. ही एक तेलुगू भाषेतील छोटीशी पण सरस कथा. वाघाच्या वेषात नबीसाहेबाला एकदा पाहायलाच हवं. मोहरमच्या सणात मुलांच्या उत्साहाला आलेलं उधाण जितकं अप्रुपतेचं, तितकंच नबीसाहेबाच्या वाघाचंसुद्धा. लांबवर हलग्यांचा आवाज... डण डण... डण डण... डण डण... शिट्या... टाळ्या... शिट्या... टाळ्या... वाघाच्या वेषात नबीसाहेब रस्त्यावर आला. घरातली कामं सोडून सर्वजण रस्त्यावर दाटीवाटीनं जमले. लहानपोरं भीतीनं मोठ्यांच्या पाठीमागे लपली, हलग्या पुढे पुढे चालल्या, चिक चिक चिक... चिक चिक चिक. आता वाघ चौकात आला. वीरावेशात तो उड्या मारू लागला. एका हातात लालजर्द दस्ती तर दुसऱ्या हातात पिवळंधम्मक लिंबू, हलग्यांच्या खणखणाटात वाघाचा खेळ रंगू लागला. पाहणाऱ्यांच्या रक्तात आवेश संचारू लागला. वाघ डरकाळ्या फोडू लागला. आक्रमकतेनं झेप घेऊ लागला. पंजा पसरून लोकांच्या अंगावर धावून येऊ लागला. लोक सैरावैरा पळू लागले. वाघाला भिऊन वाट देऊ लागले. एखाद्या जगज्जेत्याप्रमाणं छाती काढून नबीसाहेब पुढे चालू लागला. जयजयकाराच्या घोषात, देश जिंकून आलेल्या एखाद्या चक्रवर्तीसारखा तो पुढे सरसावू लागला. दोन्ही बाजूला वाजणाऱ्या हलग्या खचाखच झालेली लोकांची गर्दी शिट्या- टाळ्या पिटत उधळले जाणारे पैसे तो खिशात भरून घेत होता. सारं गाव त्यालाच पाहत होतं. साऱ्या गावातून नबीसाहेब वीरविहार करीत होता. त्याची छाती गर्वाने फुगून गेली. या सगळ्या लोकांपेक्षा मी कोणीतरी मोठा आहे असा भाव त्याच्यात शिरला होता, धन, धान्य, माड्या, इमले असलेल्यांपेक्षा मी कोणीतरी आगळावेगळा आहे, असं सांगणारी त्याची नजर उधळलेले पैसे झेलताना चक्रवर्ती, सामंत, राजे यांच्याकडून शाही खजिना स्वीकारल्याचा आविर्भाव अगदी सूर्य मस्तकावर येईतोपर्यंत वाघ नबीसाहेब १२२ निवडक अंतर्नाद हा वीर, राजा, चक्रवर्ती होत विजयविहार करीत राहिला. बोली केल्याप्रमाणं हलगीवाल्यांना पैसे देऊन आपल्या अंगणात पाय ठेवताना नबीसाहेबाचं रूपच पालटलेलं असायचं. कावरीबावरी नजर इतस्ततः टाकीत, कंबर खचल्यागत, आपल्याच पायात घोटाळत नबी साहेब घरात आला. नबीसाहेबाला आपली बायको अमीनाबी हिची प्रचंड भीती वाटायची, "किती पैसे मिळाले..." आकाश गर्जत अमीनाबी बोलली. ओठ ओलांडून नबीसाहेबांचे शब्द बाहेर येऊ शकले नाहीत. नबीसाहेबाने सारी चिल्लर तिच्या हातात ओतली. "परसात जाऊन रॉकेलनं धुवून घ्या,” अमीनाबी. वाघ शेळी होऊन परसात आला. बायकोनं अंग घासलं नाही, भला शब्द उच्चारला नाही, श्रम केल्याचं कौतुक नाही. तो स्वत:लाच शिव्या हासडू लागला. आतल्या आत आक्रंदू लागला. बायकोच काय, सारं गाव कुठं मला माणूस म्हणून ओळखतंय ? मोलमजुरीसाठीसुद्धा लोक काम देत नाहीत. आठवड्याकाठी, महिन्याकाठी दवंडी पिटायला किंवा ताशा वाजवायला बोलावतात. त्यापलीकडे आपल्याला माणसांतसुद्धा मोजत नाहीत... त्यामुळे गाववाले म्हटले की, नबीसाहेबाचा राग उफाळून यायचा. मोहरमचा एकच दिवस त्याच्या आवडीचा. त्या दिवसातले चार तास म्हणजे त्याचा प्राण त्या एका दिवसाची, त्यातल्या चार तासांची तो वर्षभर वाट पाहायचा, तेवढे चार तास तो वाघ, वीर, जगज्जेता, चक्रवर्ती वर्षाकाठी फक्त एका दिवसाचं आयुष्य त्या दिवसासाठी प्रतीक्षा. गावचे लोकसुद्धा नबीसाहेबाच्या वाघाचीच प्रतीक्षा