पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिलना-जुलना आप कहेंगे वैसा हो जाएगा, सिर्फ वो रिपोर्ट बदलके बुढीको अभी के अभी छोड़ दो.” इन्स्पेक्टरने हवालदाराला सांगितलं तसं बाजूच्या खोलीत बसवलेल्या शेवंताक्काजवळ इसाक गेला. "आका, आप जावो अभी " शेवंताक्का सगळं ऐकत होती, बघत होती, पण तिच्या मेंदूपर्यंत काय पोचत नव्हतं. त्यात पोलीस स्टेशनमध्ये आणल्या- आणल्या दोन-तीन पोलिसांच्या काठ्यांनी हात धुऊन घेतलेले. शेवंताक्काची चोळी पाठीवर आणि दंडावर फाटलेली, चोळीच्या आत काठीच्या मारहाणीचे हिरवे निळे वळ कळसूत्री बाहुलीसारखी शेवंताक्का उठली. कसल्याशा तंद्रीत बांद्रा पोलीस स्टेशनच्या बाहेर आली. नेहमीसारखीच माणसांची ही झुंबड आणि गर्दी. तिला ते नवं वाटलं. बया बया बया बया कसली म्हणायची ही गर्दी ? आरं देवा, कसली म्हणायची ही जत्रा ? जोतिबाची का अंबाबाईची? आनी मला कशी कळली नसंल? येवढ्या लांबनं जोतिबा आनी आंबाबाई हिकडं आलंत म्हणायचं व्हय? हळूहळू शांताक्का जत्रेत मिसळली. मानखुर्द स्टेशनवरून शेवंताक्का उलटं चालत गोवंडीकडे निघाली. रेल्वे रूळाच्या कडेकडेने. रेल्वे बंद झालेल्या सगळं चिडीचूप. माणूस-काणूस कोणच नाही. तिचं चालणं वाढायला लागलं तसा तसा उजेड पळायला लागला. सावल्यांनी लांब देंगा टाकायला सुरुवात केली. शुद्धबधिर झालेली शेवंताक्का ठणकत्या अंगानं झोपडीत शिरली. सवयीनं तिनं चिमणी पेटवली. ट्रंक खेचली जातं जवळ ओढलं. एक जुनरं होतं, ते ट्रंकेत टाकावं म्हणून ट्रंक उघडली. आत भावाचा - यशवंताचा - आणि आईंचा फोटो. कसल्या फौजेत गेला कुणास दक्कल, गोळी लागली आणि खाली पडला म्हणं, दादाऽऽ तू गेल्याचं आणि आईबी हबाकली बघ, कसली फौज आणि कशाचं काय रं दादा? तुलाबी लेकीसाठी जगावं आसं वाटलं न्हाई व्हय गं आई? सगळी कशी सोडून गेल्यासा? आई, हे तुझ जातं, तुजी याद म्हनून जपून ठेवलं. चाळवाल्या हासायच्या फिदीफिदी, 'कसली घाटीण म्हनायची ही, जातं कसलं आणती मुंबईत?' आई तू ओव्या म्हनत दळलेल्या तू पिठाच्या कापसासारख्या भाकरी खाल्लयात न्हवं गं मी. आजून तोंडाला पानी सुटतं बघ. कसली भाकर आणि कसला तुकडा. सगळाच शेणकाला की ग बाई, गोंदणारी बाई दारात आली. बाबा म्हनाला, "गोंदीव तिच्या हातावर आमच्या शेवंताच्या गोऱ्या गोऱ्यापान हातावर हिरवी गोंदण उठून दिसायला पायजे, चल गोंदीव - 'शेवंता जानू फराकटें - लाखात एक माझी पोरगी, जिथं जाईल तिथं राजवाडा होईल. लक्ष्मी पाणी भरंल. ले गुणाची लेक माझी." आता कसला राजवाडा आनी कसल पानी? गटाराच्या पान्याकडंला झोपडं माझं, बाबा, तू तरी असा कसा न सांगता गेलास? गावात शिमग्याचा सण. सगळी बेस आनंदात, "आज पोळी, उद्या नळी, बामण मेला संध्याकाळी.” शिपायाची सोगं काढत, बोंबा मारत गल्लीगल्लीमधनं पोरं फिरतेली. तंवर एक पोरगं बोंबा मारत आलं. "आरं छातीत कळ येऊन जानूतात्या म्हसोबाच्या पारावरनं धाड्दिशी खाली पडला," तुज्या बाजूने बोंब मारायला कोन हुतं बाबा? आमाला तर तार काय मिळाली न्हाई, सदोबाचं टपाल मिळालं तवा आठ दिवस व्हऊन गेल्यालं. दारू पिऊन- पिऊन धनाजीराव आठ दिवसासाठी दवाखान्यात झोपलेला. बाबा, माझी माहेरची शेवटची फांदीबी तोडलीस, कुणाचा त्यो रस्ता आनी कुठलं कुनाचं गाव? चारी बाजूंनी पुसत गेलं बघ, बाबा तुज्या लेकीचं नाव, येळधाडीसारखा पोलीसफोर्स गोवंडीजवळ घुसला. सोबत राज्य राखीव दलाचे पोलीस डोक्यावर हेल्मेट, एका हातात लोखंडाची जाळी, दुसऱ्या हातात काठी. एका आड एक मध्येच बंदुकधारी शिपाई, रेल्वे पोलीस, महानगरपालिकेची लटांबर, असा मोठा जामानिमा, बुलडोझर, पोक्लेन्स, डंपर, घमेली, फावडी एवढं सगळं सामान, झोपड्या नि झोपड्या खाली झालेल्या लोकलसेवा कुर्ल्यालाच बंद करून ठेवलेली, रूळांच्या दोन्ही बाजूंनी लागून सगळ्या झोपड्या. सहायक पोलीस आयुक्त रंजन देसाईंनं खूण केली की लगेच पोलीस सावध होणार एकदम ताठ लाठ्या उगारणार, बंदुका रोखणार, वॉर्ड ऑफिसर देवांग गांधीनं खूण केली की लगेच दोन्ही बाजूंनी दोन बुलडोझर धडधडायला लागणार बघता बघता झोपड्या भुईसपाट होणार, नगरसेवक बनसोडेनं खूण केली की इतका वेळ गप्प असलेल्या बायका बुलडोझरच्या पुढे आडव्या पडणार. मोक्याच्या ठिकाणी दबा धरलेल्या पोरांच्या ह्यतातनं दगडांचा वर्षाव होणार, वार्ड ऑफिसर देवांग गांधीनं ध्वनिक्षेपक हातात घेतला - "उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे रुळालगतच्या पन्नास फुटांपर्यंतच्या झोपड्या जमीनदोस्त करावयाचे आदेश आहेत. आम्ही तुम्हांला वेळेवर नोटिसा दिलेल्याच आहेत. कृपया शांतता राखून सहकार्य द्या." देवांग गांधीला काल रात्रीच आयुक्तांनी बोलावलं होतं. "उद्याच्या मोहिमेत काही फट राहता कामा नये. खुद्द सी. एम. चे आदेश आहेत, जरा जरी हलगर्जी केलीस तर तुझी त्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची फाईल वर काढीन. लगेच सस्पेंड होशील." आता दगडांच्या वर्षावात चिंध्या झाल्या तरी चालतील, मागे हटायचं नाही. देवांग गांधीनं स्टाफला खूण केली. निवडक अंतर्नाद १२९