पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येणार येणार म्हणत संकट चालून आलंच. थोडं तरी थोपवू, थोपवण्याचं नाटक तर करू, म्हणत नगरसेवक बनसोडे पुढे गेला ए.सी.पी. देसाईंना नमस्कार केला. खोटं हसून म्हणाला, व्हायचाय. "साहेब पंच्याण्णव पूर्वीच्या आणि नंतरच्या ह्य फैसला सरसकट सगळ्या झोपड्या कशाला तोडता मायबाप ? तो वटहुकूम निघेपर्यंत थांबलं तर चालणार नाही का मेहेरबान?" ए.सी. पी. रंजन देसाईनं बनसोडेचा अंदाज घेतला. त्याला खालीवर निरखलं. पहाटेच पोलीस उपायुक्तांनी देसाईला बंगल्यावर बोलावून घेतलं होतं. "सी. एम. चे आदेश आहेत. पाळायला पाहिजेत. हलगर्जीपणा केलास तर सरळ गडचिरोलीला बदली. इथला मुंबईचा मलिदा तर जाईलच, परत त्या जंगलात जाऊन नक्षलवाद्यांबरोबर गांडमारी करायला लागेल ती वेगळी. काय सांगतोय ते समजून जा. फार वरनं शिजलंय सगळं आणि दुसरं देसाई. तुझ्या त्या गुडराई चांदी प्रकरणातलं संशयास्पद वागणं गृहमंत्रालयापर्यंत पोचलंय. जरा जपून, नाहीतर उद्याच्या एसटीनं बायकापोरांसह परभणीला पोचशील.” देसाईच्या कपाळावरची शीर उडाली. "ए बनसोडेऽऽ” घोगरा आवाज फुटला. एकदम एकेरीवर? बनसोडे समजला काहीतरी बिनसलंय. जरा जपून राहावं. "बनसोडे, फायनल सांगतो तुला. कुणालाही भडकवू नको, आजचा दिवस आवरून धर, लै डोस्कं फिरलंय आपलं. हयगय करणार नाही. एकेकाच्या गांडीत गोळी घालीन भेंचोद” बनसोडे वरमला त्यातनं धीर करून म्हणाला, "बायकांचं एक ठीक आहे साहेब, तरुण पोरांचा काय भरोसा ? कसं आवरायचं सांगा ना साहेब?" "बनसोडे, एकाही पोराच्या एका जरी हातातनं दगड बाहेर आला, तर आज रात्रभर तुला लॉकअपमध्ये बंद करून तुझ्या गांडीत मी थर्ड डिग्रीचा खुट्टा मारीन भडव्या. काय ते समजून जा. शाना बन, " बनसोडे हिरमुसला. आज आपली डाळ काही शिजत नाही. त्याने सिग्नल दिला तसे रहिवाशी हळूहळू मागे सरकायला लागले. देवांग गांधीने हात वर करून ऑर्डर सोडली. "स्टार्ट..." " बुलडोझर घरघरू लागले, घमिल्या, फावड्यांचा खणखणाट बाढू लागला. पोकलन आणि डंपर हालू लागले, माणसांचा गलबला, धुळीचा गलका, सगळं एक व्हायला लागलं. "भाभी, वो आका को कभीका छुड़ा दिया इसाकशेठने, वो उधरकी साईडसे झोपडेमे गई लगता है" मघाचं पोरगं तशा गर्दीतसुद्धा आयेशाबीच्या कानाला लागलं, तसं तिचं काळीज लक्कन हललं. "या अल्ला!” आयेशाबी बनसोडेकडे रडू भेकू लागली. अगोदरच १३० निवडक अंतर्नाद ए.सी. पी. ने त्याचा पापड केला होता. बनसोडेची सटकली. "तू तर मरच, परत मला पण घाल त्या बुलडोझरखाली. पागल हो गई है तू? रेड अलर्ट है उनको, कोई भी सामने आयेगा तो गोली मारेंगे. जरा चुप बैठ और मुझे सोचने दे.” आयेशाबीच्या अंगाचं पाणी झालं. "इतक्या वरसांची दोस्ती. शेजारीण आपली, कधी बिचारी कुणाबद्दल वाईट बोलली नाही. नेक औरत, भगवानने सुनी नहीं होगी उसकी, फिर भी सच्ची औरत अपने साथ बड़े बेहेन जैसा बर्ताव किया." आयेशाबी मूर्च्छा येऊन खाली कोसळली. शेवंताक्कानं ह्यताला येईल तेवढी माती, छोटे-मोठे दगड जात्यात टाकले. भरडू लागली. बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर जातं घरघरू लागलं. मातीला परत माती करून बाहेर सांडू लागलं, चिमणी विझायला आलेली शेवंताक्काच्या विझत्या डोळ्यांच्या मिणमिणत्या पणत्या तेवढ्या तेवत असलेल्या, यंत्रा-माणसांचा गलका जवळ येत होता. बुलडोझर अधिक हिंस्त्रपणे घरघरत होता. पुढे पुढे सरकत जवळ येणारी टोळधाड शेवंताक्काला काहीच कळत नव्हतं. शुद्धबधिर शेवंताक्का एकाग्रपणे जातं ओढीत होती. जात्यात माती टाकत होती, डोळे पुशीत होती. चाक ओळीत होती. बंधू येईल ग, नेईल माहेरपणाला गौरी-गणपतीच्या सणाला कुठल्या रानात तुला कसली गोळी लागली म्हनायची रे बंधुराजा? कधी याचास तू? गौरी-गणपती आलं न्हवं तोंडावर? तू आलास की मी काय हे जुनेरं नेसणार हाय व्हय रे दादा? ले भारीतलं पाताळ आन बघ मला. शालू भरजरी भावजय देईल ल्यायाला गौरी-गणपतीच्या सणाला, मी एवढ्या लांब मुंबईला, तुम्हांला तरी सारखं कुठनं जमनार, वर्षातनं एकदाच होणार माझं म्हायारपन, आईला आनी बाबालाबी घे संगद सगळी एकदम माझ्या दारात आलासा म्हंजे माझा जीवबी तेवढाच हलका. गाडी घुंगराची येईल ग न्यायाला गौरी-गणपतीच्या सणाला बंधू येईल ग नेईल माहेरपणाला गौरी-गणपतीच्या सणाला, चिमणी विझलेली. छप्पर डुगडुगू लागलेलं. अंधाराचा जबडा वासत चाललेला शेवंताक्काचा आवाज भिजत भिजत चाललेला. बुलडोझरचं चाक पुढे-पुढे सरकलेलं. बुलडोझरचं पातं आणि शेवंताक्काचं जातं. दोन्हींची घरघर चालूच. (दिवाळी २००० ) (रेखाटने : प्रकाश कोळी)