पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'ते का?' 'डोंगरावर झाडं लावायची म्हणून. ' 'मग?' 'त्या पोरांची झिंबड उडालेली. आरोळ्या मारत होती. हातात लिवलेल्या पाट्या, खोरी, फावडी, कुदळ, खुरपी नाचवत होती. शेरडं बावरली, त्यांची पळापळ झाली. पोरांनीसुद्धा मग उगाच कालवा केला. 'भुंडी- भुंडी' म्हणून तिला खडं मारलं. तशी ती मागं फिरली, हरणासारखी चौखूर उधळली.... 'मी फुडं. पोरगी शेरडामागून तिनं भुंडीला थोपवलं, तशी ती सगळ्या शेरडांत घुसली, असं वाटलं, मग निघालो, पण बोकड सारखा थांबत होता. मागं मागं वळून बघत होता. त्याला एकदा दोनदा हाकलला तरी फुडं जायचा थांबायचा, सारखा मागं बघायचा. ' 'असं का?' 'कळपात भुंडी नाही हे त्याला बराबर कळलं होतं, म्हणून तो हलायला तयार नव्हता. शाळेची पोरं गेल्यावर मी सगळी शेरडं एके जागी गोळा केली. मोजली तर एक कमी माझ्याकडं भुंड्या शेळ्या दोन हायत. पण एकच दिसत होती. तेव्हा लक्षात आलं, थोरली भुंडी दिसत नाहीय.' 'मग शोधाशोध चालू केली काय?' 'भुंडी शेळी मोठी आहे ना?' 'हो, गाभण हाय.' म्हातारीचा सूर काळजीचा. 'गाभण शेळी हरवली!' 'तशी हरवणार नाय, पण कोणीतरी धरली असंल.' पोरीच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. म्हणाली – 'आज्ये, भुंडी आपल्याला शोधत असेल काय?' मी म्हटलं, 'असेल असेल. तुम्ही तिला शोधताय आणि ती तुम्हांला, सारखी चुकामूक होत असणार, त्यामुळं गाठभेट होत नाहीय. ' म्हातारी निराश, दोन्ही गुडघे जवळ घेऊन, त्याभोवती हातांची मिठी घालून बसलेली. जवळच नेहमीचं घमेलं. त्यात एक छपाटी आणि पोत्याची घडी, 'कोणी तरी भुंडीला धरली असणार. लई शाणी हाय ती. अशी चुकायची नाय. लहानगी करडं चुकत्यात त्यांवर ध्यान ठेवावं लागतंय. पण भुंडी कशी ?..... १३८ निवडक अंतर्नाद 'आता काय करणार?' तिनं कपाळाला हात लावला. स्वतःशीच बडबडली, 'गाभण होती. दोन करडं झाली असती. मग दोन शेरडं घालवली असती. पाच महिन्यांची हाय. आता कधीबी भुंडी विणार...' 'घालवली असती म्हणजे?' 'खाटकाला अिकायची. ' 'का?' 'दुसऱ्याचं कर्ज फेडायला नगं?' 'खाटीक किती देणार?' 'सात-आठ हजार' 'शेळीची किंमत एवढी आहे?' 'हो. अन् रोकडा पैसा मिळतो. ' 'अन् बोकडाला?' 'दहा तरी मिळणारच.' 'तुझ्याकडं बाबरी बोकड नाही?' 'त्यो लई महाग.' 'तो असता तर?' 'चाळीस हजार मिळाले असते. ' 'तुझ्याकडं वीस-पंचवीस शेरडं आहेत. उस्मानाबादी का असेनात, पण तू लक्षाधीशच आहेस. नाही का?' तिला कळलं न कळलं. म्हणाली- 'दिवस शेरडांमागं जातो. पोराला कधी म्हटलं, तू शेरडं घेऊन जा, तर नाही म्हणतो, ' 'तो काय करतो?' 'वाजवायला जातो. बेंजो आहे त्याचा... आता मला जमत