पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मन वर्षानुवर्षे मागे गेले आणि पुढे आले. तिला कळले, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर होती ती! नववधूच्या वेषात माहेर सोडतानाची अवस्था पुन्हा साकार झाली. तेव्हा न कळलेले अर्थ आता उमगू लागले बाबुल मोरा नैहर छूटो जाय- खेडवळ, प्रांजल, गोड आवाजात आईला आळवत होती चांदीची कळशी आठवण येते आईची समोर सोप्यामधे दुरडी ग आई माझी आली पाहुणी माझ्या अंबीला दह्यादुधाची आंघुळ ग तान्हं बाळ माझं सोन्याची पाऊलं धुळीमातीत..... निसटते शब्द दुखऱ्या मनाला मलमपट्टी करीत होते. त्या भाबड्या गीतात अंबाबाईची कधी अंब होत होती रेणुकामातेची रेणू! पुढ्यातली अंबाबाई कधी बाळरूपात, तर कधी मातृरूपात जाणवत होती. स्त्रीची सर्व रूपे तिच्यात एकाकार झाली होती. हरवलेले काहीतरी गवसत होते. पण काय हरवले आणि काय गवसले हेच उमगत नव्हते. मनात होती एक श्रांत तृप्ती! शैशव, बाल्य, यौवन, प्रौढावस्था आणि आता.... निश्चितपणे वार्धक्याकडे चाललेला प्रवास... दुवे अस्पष्ट जाणवत होते. डोळ्यांपुढे उलगडत होती.... परतीची वाट! परतीची वाट शहर मागे पडले. डावी- उजवीकडे भरगच्च हिरवीगार शेते. पलीकडे धूसर निळसर डोंगर, पाण्याचे लहानमोठे ओहोळ. आभाळ ढगांनी ओथंबलेले! घनगंभीर ! चाळा म्हणून रेडियोचे बटन दाबले. जुनी गाणी चालू होती. 'स्ट्रीट सिंगर' मधील प्रसिद्ध रचना! स्वर्गीय कुंदनलाल सैगलच्या आवाजातील भैरवीतील ठुमरीने जिवाचा ठाव घेतला बाबुल मोरा नैहर छूटो जाय- अवधचा शेवटचा काव्यवेडा, रसिक नवाब - वाजिद अली शाह! मायभूमीतून हद्दपार झालेला कलकत्त्याजवळील अनोळखी 'मातिया बुर्ज' ला निघालेला – विद्ध झालेल्या नवाबाची वेदना सैगलच्या दर्दभऱ्या आवाजातून भळभळत होती. मन वर्षानुवर्षे मागे गेले आणि पुढे आले. तिला कळले, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर होती ती! नववधूच्या वेषात माहेर सोडतानाची अवस्था पुन्हा साकार झाली. तेव्हा न कळलेले अर्थ आता उमगू लागले बाबुल मोरा नैहर छूटो जाय- तो क्षण जवळ आलाय, अळता लावलेली सुकुमार पावले माहेरघराच्या अंगणाबाहेर उमटू लागली आहेत. मायेच्या सुरक्षित कुशीतले निवांत जीवन बदलू पाहत आहे. जिवाचा जिवलग पलीकडे उभा आहे. जन्मोजन्मीची साथसंगत १४६ निवडक अंतर्नाद करायला पाठीमागे आप्तांच्या नजरा पाणावल्या आहेत चार कहार मिले मोरी डोलिया सजावे मोरा अपना बेगाना छूटो जाय - लाल गाद्यागिर्यांची पालखी! त्याला रेशमी गोंडे कुणातरी वडीलधाऱ्याच्या आधाराने ती पालखीत बसते. झिरझिरीत पडदे सोडण्यात आले आहेत. प्रियजनांच्या वियोगाच्या जाणिवेने पाणावल्या डोळ्यांना सगळे धूसर दिसते आहे. मनःपटलावर आपल्या परक्यांच्या प्रतिमांची सरमिसळ झाली आहे. मायबाप, भाऊबहिणी, सख्यासोबतिणी भातुकलीचे खेळ, भांडणे, रुसणी फुगणी वयात येतानाची वळणे, आडवळणे, उत्कट भावनांची देणीघेणी सगळ्यांनी भोवती फेर धरला आहे! भोयांनी पालखी उचलली आहे. हृदयाची धडधड वाढली आहे. कुठे जायचे आहे? कसा असेल तो अज्ञात प्रदेश ? आणि माझा सोबती?.... कपाळावर घर्मबिंदू जमताहेत, हातांचे ओलसर तळवे आधार शोधताहेत. मनात हुरहुर, निमिषार्धात किती विलक्षण एकाकीपण हे! अंगना तो परबत भया और देहरी भई बिदेस... भोयांनी वाटचाल सुरू केली. मागचा ठाव मागे सुटला. घराचा उंबरठा परका झाला आहे. मायघरापुढचे अंगण दिसेनासे झाले आहे.. जे घर बाबुल आपना मै चली पियाके देस... तो पुढे घोड्यावर स्वार... बंद झरोख्यातूनही त्याचे अस्तित्व जाणवतेय. आधारासाठी जीव आसुसला आहे. तगमग वाढली आहे... सगळ्यांचा निरोप घेऊन प्रियतमाच्या देशाकडे पालखी निघाली आहे! आजूबाजूला सप्तरंगांची उधळण आहे. त्यात न्हाऊन निघाल्यावर दिसतो आहे केवळ प्रकाश एकही रंग नसलेला.... तेजस्वी! सैगलच्या निखळ स्वरातील आर्तता काळजाला भिडली आहे. मनातली बेचैनी डोळ्यांतल्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. कदाचित यात्रा सफल झाली आहे! सर्वदूर सुजल, सुफल, सस्यश्यामल पृथ्वीवर आकाशातून बरसताहेत अमृतधारांचे कुंभ...... तिच्या कणाकणाला अभ्यंगस्नान घालीत! (जानेवारी २०१७)