पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मारून पाहावी म्हणून आले. त्यांना पाहून बरं नाही का? - एवढंच विचारलं, तर म्हणाले ह्या विषयावर बोलूच नकोस. तुम्हीच सांगा आता... " - "मी बाई काय बोलणार? आपल्या लाडक्या स्टुडंटला जर ते काही सांगत नसतील तर बायको म्हणजे किस झाड की पत्ती..." "असं बिलकुल नाही मॅडम, सर सगळ्यांना सांगतात - माझी गृहिणी, सखी, सचिव सर्व सर्व म्हणजे माझी पत्नी आणि आम्ही बघतोय ना रोज तुम्ही किती करता त्यांचं.” "ते खरंय ग. पण ह्यांचा हट्टी स्वभाव... तुला तर माहीतच आहे. आता इतके आजारी आहेत; पण म्हणतात, की मला आपटेंच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायचं नाही. " "आपटे म्हणजे ते हार्ट स्पेशालिस्ट ? पण त्यांच्याकडे अॅडमिट कशासाठी व्हायचं?” "घ्या, म्हणजे तुला काहीच माहीत नाही तर... त्याचं काय झालं. त्या दिवशी एकादशी होती, म्हणजे माझा उपवास, सकाळी सकाळी मी नीताशी स्काइपवर बोलत होते. नीता म्हणजे माझी आतेबहीण आहे ना सोलापूरची, तिच्या नणंदेची मुलगी. ती असते शिकागोला, ती कसली तरी इंजिनियर आहे आणि तिचा नवरा डॉक्टर, तिला नं, १०-१५ दिवसांतून एकदा तरी माझ्याशी बोलल्याशिवाय चैन नाही पडत. एकवेळ सख्ख्या आईला सांगणार नाही ती गोष्ट, ती माझ्याशी शेअर करते. म्हणते, तुम्ही म्हणजे ना... " "तुम्ही सरांच्या तब्येतीबद्दल काही सांगत होता ना?" "अग, तेच तर सांगते. मी अशी स्काइपवर बोलण्यात मग्न. तर ह्यांनी मला जोरजोराने हाका मारल्या. मी म्हटलं, ह्यांची ती जुनी सवय, प्रत्येक गोष्टीसाठी सावित्री हवी. तर मी केलं थोडा वेळ दुर्लक्ष, तर ह्यांच्या आणखी मोठ्या मोठ्याने हाका. अगदी सात समुद्रापलीकडे त्या नीताच्या कानावर तीच घाबरली न् म्हणाली 'सावूमामी, तुम्ही आधी मामांकडे बघा ते कधीच अशा हाका मारत नाहीत.' मग मी स्काइप अर्धवट यकलं आणि आले बेडरूममध्ये, तर काय ? ह्यांचा चेहरा घामाने चिंब आणि ह्यताने छाती दाबताहेत. मी विचारलं काय झालं? तर म्हणतात कसे - तुला आता वेळ मिळाला का? आता ह्यांना बरं नाही असं स्वप्न पडलं होतं का मला?” "तेच तर म्हणतोय मी आयुष्याच्या अशा कोणत्या अडनिड्या वळणावर आणून ठेवलंय मला तुझ्या ईश्वराने ?” "माझा ईश्वर तुमच्या पाठीशी आहे, म्हणून तर ठीक चाललंय तुमचं...' "खरंय, नाही तर आजच्या काळात माझ्यासारख्या अश्रद्ध, नास्तिक माणसाचं तुमच्यासारख्या श्रद्धावान माणसांनी काय केलं असतं सांगता येत नाही. " "झाले तुमचे टोमणे सुरू ? सुचित्रा, तूच बघ कसे वागतात हे माझ्याशी...' २२ "मॅडम, चलते मी, सर, अठ्ठावीस डिसेंबरच्या सेमिनारला तुम्ही येणार नाही असं तुम्ही कळवलं असलं, तरी तुमचा पेपर तयार असला, तर आम्ही तो साया डेलिगेट्सना सर्क्युलेट करू असा पद्मनाभन सरांचा निरोप होता, मला कळवा काय ते...' [22] ★ ★ ★ 'माय डियर सुचित्रा, पद्मनाभनला काय उत्तर द्यायचं हे मी तुझ्यावरच सोडतो. मला नाही वाटत माझ्या सध्याच्या अवस्थेत मी नवीन काही लिखाण करू शकेन म्हणून... पण माझ्या जुन्या लिखाणात ह्या सेमिनारसाठी काही रेलेव्हंट आहे असं वाटलं, तर दे त्याला पाठवून, पण ते पूर्वीचं आहे हे स्पष्ट कर; उगाच नंतर गोंधळ नकोत, तो बॅकग्राऊंड पेपर म्हणून सर्क्युलेट करायचा की माझ्या वतीने तू तो प्रेझेंट करायचा हेही त्यालाच ठरवू दे. परवाच गुलजारसाहेबांची एक कविता वाचनात आली. तिच्यात ते म्हणतात - ये कैसी उम्र में आकर मिली हो तुम! बहुत जी चाहता है फिर से बो दूँ अपनी आँखें तुम्हारे ढेर सारे चेहरे उगाऊँ और बुलाऊँ बारिशों को बहुत जी है कि फुर्सत हो, तसब्बुर हो तसब्बुर में थोड़ी बागवानी हो! पुढची कहाणी सगळी आपल्याला माहीत असलेलीच आहे. त्यांच्या माझ्या गोष्टीत फरक एवढाच आहे, की त्यांना 'ती' आयुष्याच्या अगदी पुढच्या टप्प्यावर खूप उशिराने भेटली, मला 'ती' भेटून बावीस वर्षं उलटून गेलीत. पण मूळ प्रश्न अजून तसाच आहे. भेटायचं होतंच तर अशा अडनिड्या वळणावर का भेटलीस तू मला? सर' 'आदरणीय सर, तुमच्या आदेशानुसार मी तुमचे जुने 'दप्तर' तपासून त्यांतला एक पेपर निवडला, बाबरी मशीद पडल्यावर लगेचच झालेल्या ICHR कॉन्फरन्समध्ये तुम्ही वाचलेला Re Reading Babarnama : Some Reflections हा पेपर निवडून मी तो पद्मनाभन सरांकडे पाठवला. Writing and Rewriting of History: Role of Ideas and Ideologies ह्या सेमिनारच्या विषयाशी तो खूपच सुसंगत आहे त्यावर झालेली चर्चाही लोकांच्या अजून स्मरणात आहे ह्या पार्श्वभूमीवर मूळ पेपरचं पुनर्वाचन सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरू शकेल. इथे माझं काम संपलं. मी तो पेपर तुमच्या वतीने वाचण्याची जबाबदारी घेणार नाही. माझी ती पात्रता नाही. शिवाय मीही सेमिनारला जाणार नाही. तुझे सर कुठे आहेत? ह्या विविधार्थी प्रश्नाला उत्तरं देत बसण्याची माझी इच्छा नाही व मानसिक तयारीही. होप यू अंडरस्टॅंड • सुचित्रा' - निवडक अंतर्नाद १४९