पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पण अजून ती पीएच. डी. चं नावही काढत नाही. तिच्या मनात काय आहे कळत नाही. खरं तर तिने पीएच. डी. करण्यात माझाच स्वार्थ आहे असा स्टुडंट मिळायला भाग्य लागतं, आपल्या सोशल सायन्सेसची काय वाताहत होते आहे हे मी तुला सांगायला नको. तुझं बरं आहे. तुला काय, मुंबईसोबत कोलंबियाचे स्टुडंटही मिळतात...' ★ ★ ★ मध्यंतरी तीन चार वर्षं म्हैसूरला जाणं झालं नाही. पण सुचित्रा मात्र आठवत राहिली. कधी जागतिकीकरणावर बोलताना, कधी इपीडब्ल्यूत प्रकाशित झालेले तिचे ( जयंतसह लिहिलेले) दोन शोधनिबंध वाचताना, तर कधी केव्हाही उगाचच... मी माझ्या अभ्यासिकेत काही वाचता वाचता थांबून एखाद्या मुद्द्याचा रवंथ करीत असे. चष्मा कपाळावर, पुस्तक छातीवर आणि मी माझ्या लाडक्या आरामखुर्चीत विसावलेला. अशा वेळी अचानक ती दिसे. म्हैसूरला दिसली तशी, स्वतःत मान तरी कुतूहलाने भारलेली तिची नजर कधी वाटे ती दूर उभी राहून आपल्या सर्व खटाटोपाकडे बघते आहे मिस्कीलपणे, कधी असं करताना डुलकी लागली तर विचारतेय 'प्रेग्नंट पॉज जरा जास्तच लांबला असं नाही वाटत तुम्हांला, सर ? ... ' मध्ये केव्हातरी एका कॉन्फरन्समध्ये जयंत भेटला. इपीडब्ल्यूतल्या पेपर्सबद्दल त्याचं अभिनंदन केलं तर म्हणाला, "हे सारं तिचंच काम, मी दोन रेफरन्स जास्तीचे यकणं आणि एडिट करणं ह्याशिवाय काही केलं नाही. दोन्ही पेपर्स चांगलेच गाजले.” कोठवर आलं?" मी विचारलं. "तिचं पीएच. डी. "कसलं पीएच. डी. अन् कसलं काय? बाई गायब झाल्या त्या उगवल्याच नाहीत. आपली एमफिलची डिग्री घ्यायलाही ती आली नाही. " "कुठे गेली?” "कोणास ठाऊक! बहुधा लग्न करून कुठे गेली असावी.” "पण ही पोरगी तर लग्न करून गायब होणाऱ्यातली नव्हती ना?" "तुला म्हटलं नव्हतं मी खूप मनस्वी मुलगी आहे, काय करेल सांगता येत नाही. " "पण त्यामुळे आपल्या फील्डचं किती नुकसान झालं! एका चांगल्या रीसर्चरला आपण मुकलो. " "अगदी खरं. चांगल्या नाही, उत्तम म्हण." नंतरही मला ती 'दिसत राहिली. नितांत एकांताच्या क्षणी जाणवत राहिली. पण आता ती गप्प गप्प असायची. तिच्या ओठांवर मिस्कील हास्य नव्हतं. तिची नजर आणखी खोलवर बुडलेली असायची. सूर मारून तिच्या डोळ्यात शिरलो तरी तिचा पार लागणार नाही, असं वाटे ती कुठेही असो, सुखात १५२ निवडक अंतर्नाद असो, एवढंच मला वाटत राही. (पक्का निरीश्वरवादी मी, तिच्यासाठी प्रार्थना करतोय की काय? अशी शंकाही माझ्या मनाला अनेकदा शिवून गेली होती. ) ★★★ सोळा ऑगस्ट एकोणीसशे अठ्याण्णव. बँकेत गर्दी असणार हे माहीत होतं, पण जाणंही आवश्यक होतंच, न्यू जर्सीला साऊथ एशियन कॉन्फरन्स होती व त्याला जोडून मी तीन महिने अमेरिकेत इस्ट कोस्टवरच्या तीन विद्यापीठांत राहणार- फिरणार होतो. जवळच्या रुपयांचे डॉलर्स करून घ्यायला हवे होते. विद्यापीठाच्या कामासाठी फोर्टात आलो होतो. ते आटोपून जवळच्याच एका बँकेत शिरलो. चौकशीच्या काउंटरवर गर्दी होती. आपला नंबर केव्हा लागणार हे आजमावत होतो. तेवढ्यात त्याच रांगेत मला 'ती' दिसली. सुचित्रा ? नक्कीच, पण मन ते मानायला तयार नव्हतं. शिवाय हिच्या डोळ्यावर चष्मा होता आणि चेहऱ्यावरचे भाव आणखी गंभीर आता ह्या वयात एखाद्या मुलीला तू 'तीच का?' असं विचारायला काय घाबरायचं? असा विचार करून मी तिच्याजवळ गेलो. तिचं लक्ष नव्हतं. मी 'एक्स्क्यूज मी' म्हणताच भुवया उंचावून तिने माझ्याकडे पाहिलं. ती सुचित्राच होती. त्यानंतर माझ्यासोबत जवळच्या इराण्याच्या हॉटेलात पंधरा मिनिटं चहासोबत मस्का - पाव खाताना ती भयंकर संकोचली होती. मोठ्या कष्टाने तिने तिचा फोन नंबर दिला. मला भेटून तिला आनंद झाला होता हे खरं, पण बरंच काही ती लपवू इच्छित होती व त्याबद्दल मी काही प्रश्न विचारेन म्हणून धास्तावली होती. ★★★ "सर, इतक्या वर्षांनी भेटल्यावर तुम्ही माझी प्रेमाने चौकशी केली, पण त्याबरोबर माझ्या प्रायव्हसीचा आदरही केला. त्यापूर्वीच्या पाच वर्षांबद्दल मी स्वतःहून सांगेपर्यंत तुम्ही मला कधीही त्याबद्दल छेडलं नाही. मला माझ्या कोशातून बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण मला कानकोंडं वाटणार नाही, ह्याचीही काळजी घेतली. तीन वर्षांच्या मुलीला घेऊन मुंबईत नशीब आजमावायला आलेली मी एक एकल पालक, तरुण स्त्री. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, घर, कंदुलीची शाळा सुरुवातीच्या काळात मला जॉब नसताना ट्युशन्स मिळवून देणं, नंतर लेक्चररच्या जागेसाठी अप्लाय करायला सांगणं... प्रत्येक वेळी तुम्ही होता म्हणून सारं काही, सोपं नसलं तरी, शक्य झालं. आता तर विद्यापीठातली नोकरी, माझ्या आवडत्या विषयातलं करियर, माझ्या लाडक्या कंदुलीवर तुम्ही धरलेली छत्रछाया... मी तर कल्पनाही केली नव्हती ह्या साऱ्या गोष्टींची!” “आज काय माझा निरोप समारंभ आहे का?" "काहीतरीच काय बोलता? तुम्हांला निरोप द्यायचा विचार