पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"आज पहिल्यांदाच आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत ह्याचा मनापासून आनंद झाला मला, " सुचित्रा म्हणाली. मी गप्प होतो. "तुम्हांला माहीत आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम करता ही गोष्ट स्वीकारायला माझं मन तयार नव्हतं. निदान हा माणूस तरी माझा मित्र म्हणून राहू दे, अशी प्रार्थना मी करत असे. माझ्या बाबतीत असं इतक्यांदा घडलंय... पुरुष माझ्या संपर्कात येतात. काही काळ मित्रासारखे वागतात, मग काय बिनसतं कोण जाणे! पण त्यांना 'मित्र' हे पद पुरेसं वाटत नाही. त्यांना प्रियकरच व्हायचं असतं. किंवा असंही असेल की आधीपासून ते माझ्या प्रेमात असतात, त्यांना मला ते सांगण्याची हिम्मत होत नसते, म्हणून माझ्या जवळ येण्यासाठी ते मित्र असल्याचं भासवतात व संधी मिळताच आपल्या प्रेमाची घोषणा करतात, मी मनात म्हणते - ये बंदा भी गया काम से! तुम्ही माझे एकमेव फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड होता व आहात. मला भीती होती तुम्हांला मी हरवून बसेन याची. आता नाही तसं वाटत..." ★ ★ ★ "सुचू, तुझं एकटेपण तू कसं पेलतेस ? एकटेपण तरी ठीक; आपल्याला त्याच्यासोबत समझौता करता येतो. पण आता आपल्यासोबत कोणी आहे हे कळल्यावर त्याच्यापासून दूर राहणं किती कठीण असतं! आपलं असं अर्धमुर्धं प्रेम, भेटूनही न भेटणं, कित्येक तास सोबत घालवूनही मनातले दोन शब्दही बोलता न येणणं... कधी तू इतकी सुंदर दिसतेस की तुझ्यावर सारं सारं कुर्बान करून टाकावं, तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करावा असं वाटतं, कधी कधी तू इतकी व्हल्नरेबल वाटतेस, की तुझ्याभोवती छातीचा कोट करून राहावं असं वाटतं आणि हे असं काही करता येत नाही म्हटल्यावर जिवाची इतकी तगमग होते... तू तर तरुण आहेस, माझ्यापेक्षा २२ वर्षांनी लहान, पुन्हा आयुष्य इतक्या गंभीरपणे घेणारी. काय होत असेल तुझं?" "काऽऽही होत नाही. मी मजेत राहते. बघताय ना तुम्ही ? तुम्ही भेटल्यावर तर आता आयुष्य गमतीने घ्यायचा प्रयत्नही करायला लागले आहे. आयुष्य काही अगदी बेइमान निघालं नाही. त्यानेच तर तुमची साथ दिली, तुम्ही इतक्या गोष्टी शिकवल्या माझ्या आवडत्या विषयाकडे आयुष्यात पुन्हा वळता आलं, त्यात स्वतःची जागा निर्माण करता आली. बस झालं..." "हे बघ, रोजच आपण स्वतःची अशी समजूत घालत असतो. तू म्हणतेस त्याबद्दल काही वाद नाही. जे काही मिळालं त्याबद्दल कृतज्ञता आहेच, पण जे नाही मिळालं, किंवा आपण जे प्रयत्नपूर्वक नाकारलं, त्याचं काय ? शरीर-मनाला भाजून काढणारी तलखी तू अनुभवली नाहीस, असं म्हणू नकोस. मध्ये आपण उडिपीला इन्स्पेक्शनसाठी गेलो होतो. आपली सोय अगदी आजूबाजूच्या खोल्यांमध्ये केली होती. रात्री जेवल्यावर आपण लाउंजमध्ये कितीतरी वेळ बोलत बसलो होतो. कसल्या कसल्या आठवणी येत होत्या आपल्याला मला आठवतंय, तेव्हाच तू पहिल्यांदा मला तुझ्या १५४ निवडक अंतर्नाद आणि गिरीशच्या सपशेल फसलेल्या लग्नाबद्दल सविस्तर सांगितलं होतंस. घरच्यांचं दडपण, इमोशनल ब्लॅकमेलिंग, कॅनडातला तो लांबच लांब हिवाळा, त्यात तुला आलेलं डिप्रेशन, मनाला स्पर्शही न करणारे शारीरिक संबंध, कंदुलीच्या जन्माच्या वेळी जाणवलेली असहायता व एकाकीपण, लग्न तोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यावर माहेरच्यांनी फिरवलेली पाठ... आपल्याला त्या दिवशी एकमेकांना सोडवत नव्हतं. आपण दोघांनीही त्या रात्री आपापल्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला नव्हता. रात्रभर तू जागी होतीस हे माहीत आहे मला..." " "हो ना, पण शेजारच्या खोलीत तुम्हीही जागे आह्यत, आपण दोघंही मनात आलं तर एकमेकांकडे जाऊ शकतो आणि परस्परांचा त्या त्या क्षणाचा जो काही निर्णय असेल त्याचा आपण दोघंही सन्मान करू, हा केवढा मोठा दिलासा होता माझ्यासाठी त्या रात्री व त्यानंतरही... तुम्ही जे आता म्हणाला, की तुम्हांला माझ्यावर कधी प्रेमाचा वर्षाव करावासा वाटतो, तर कधी मला खूप जपावंसं वाटतं, ते त्या त्या क्षणी पोहचलंय ना माझ्यापर्यंत! आणखी काय हवं ? निदान मलातरी हे पुरेसं वाटतं. आणि तुम्ही समजता तितकी मी आता तरुण कुठे राहिलेय? ४७ पूर्ण झालीत, मेनोपॉजची चिन्हं दिसायला लागलीत, आता काही मी पूर्वीसारखी सुंदर दिसणार नाही, मग तुम्हांला आणखी कोणा distractingly beautiful मुलीला शोधावं लागेल!” "शोधायला कशाला हवं ? distractingly beautiful मुली स्वतःहून माझ्या वाटेवर, आय मीन माझ्या आयुष्यात येतात..." "वाट पहा! मला तुमची real intentions कळायला पाच वर्षं जावी लागली. तोवर कोण कोणाच्या वाटेत पुन्हा पुन्ह्य येत होतं?” “अरेरे, आता इतकी उमेदवारी करण्यासाठी शक्तीही उरली नाही!” “शिवाय डोक्यावरचे केसही गेले! सर, तुम्ही खरंच पूर्वी, म्हणजे डोक्यावर भरपूर केस असताना, किती रुबाबदार दिसत होता! अगदी कोलंबियाच्या तुमच्या विद्यार्थिनी जेनिफर, रमोला, सुझान त्यासुद्धा मरायच्या तुमच्यावर त्या दिवसांत. " - “अच्छा? तूही माझ्या स्टुडंट्सचा बराच ट्रॅक ठेवलेला दिसतोय...' 22 “अर्थात! खास मॅडमनी ही जबाबदारी सोपवलीय माझ्यावर.' >> "बाप रे! मग तुझ्यापासून आता सावध राहायला हवं. पण सावूने ह्य लोण्याचा गोळा ह्या मांजराच्या संरक्षणाखाली का काय ठेवला?” "म्हणे लोण्याचा गोळा! अंगावर थोडंफार मांस असतं तर म्हणताही आलं असतं कुणाला बरं वाटावं म्हणून!"