पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शोधावं लागतं हे तुमचं म्हणणं मला मान्य आहे आणि म्हणून माझा काहीच आग्रह नाही. छातीतून निघणाऱ्या जीवघेण्या वेदनेवर किंवा इसीजीच्या नागमोडी रेषांवर स्वार होऊन जेव्हा तो प्रश्न तुमच्यासमोर येईल, तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं हे तुमचं तुम्हांलाच ठरवावं लागेल. मला आडवाटेला गाठून जेव्हा हा प्रश्न माझी जगण्याची वाट अडवेल, तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं हे मात्र आता मला कळलं आहे, एवढंच सांगते. "आयुष्याच्या अशा अडनिड्या वळणावर आपण का भेटलो एकमेकांना?' असं मला कोणी विचारलं तर मी सांगेन, की आतापर्यंत माझ्या आयुष्यात माझ्या हातून जे काही चांगलं, खरंखुरं, निखळ असं घडलं असेल, त्याचं बक्षीस, जे मला ह्याच जन्मात मिळायला हवं (कारण पुनर्जन्माची कल्पना कितीही रोमँटिक असली, तरी तिच्यावर माझा विश्वास नाही ) ते मला प्रेमाच्या रूपाने मिळायला हवं होतं, म्हणून आयुष्याच्या ह्या अडनिड्या नव्हे तर अतिशय सुंदर वळणावर मला अरविंद भेटले, आम्ही एकमेकांचे झालो व तसे होऊनही अंतनदि २००८ २० जुलै २००८ (चित्रकार दत्तात्रय पाडेकर) मुक्त राहिलो आणि हातात हात घेऊन चालत राहिलो इथवर, आयुष्याच्या मृत्यूच्या मॅडमच्या, तुमच्या कोणाच्याही डोळ्याला डोळा भिडवून हे सांगायला मला भीती किंवा संकोच नाही वाटणार. "तुम्हांला एकांताच्या गुहेत जाऊन बसायचं असेल तर जरूर बसा. पण माझ्या अस्तित्वाशिवाय तुमच्या एकांताला अर्थ नाही, हेही ध्यानात ठेवा. तुम्हांला नेमकी कशाची भीती वाटते हे शोधा. कारण आपल्याला अवघड वाटणाऱ्या उत्तरापर्यंत इतर लोक सहजच पोहचले असतात. स्वतःशी संवाद साधण्यासाठी थोडा अवकाश हवा असेल तुम्हांला, तर तो अर्थपूर्ण अवकाश - pregnant pause- तुम्ही अवश्य घ्या. अडनिड्या वळणाविषयीचा तुम्हांला अवघड वाटणारा प्रश्न बाहेरून न येता तुमच्याच काळजातून येतो आहे आणि त्याला उत्तरही तिथूनच मिळणार आहे, हे मी तुम्हांला सांगायला हवं अरविंद ? मी वाट पाहतेय पुढच्या वळणावर तुमची. बाय!!” (ऑगस्ट २०१७) सांस्कृती ०० अंतनाद जून २०१० रुपये ३० १२ जून २०१०... पु. ल. देशपांडे यांचा दहावा स्मृतिदिन... विनम्र अभिवादन! जून २०१०, 'गुळाचा गणपती' चित्रपटात पु. ल. देशपांडे त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त (चित्रकार मनोजकुमार सकळे) निवडक अंतर्नाद १५७