पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृष्णचूडा मूळ बंगाली कथा: प्रचेत गुप्त अनुवाद : सुमती जोशी 'मला फक्त मौखिक भाषा दिलीय, शारीरिक नाही. ती किती जरुरीची आहे, ते मला आत्ता समजलं. मी तुझ्या शरीराबरोबर कम्युनिकेट करू शकले नाही. इच्छा असूनही मला ते शक्य झालं नाही. " कृष्णचूडा. एक सुंदर तरुणी. पण खरी रोबो. ती प्रेमात पडते तेव्हा... उद्याच्या रोबॉटिक्स युगातील विज्ञानकथा किंवा भविष्यवेधी कथा. ती भयंकर घटना समजली लंच अवरमध्ये कामाचा विलक्षण ताण असूनही इन्स्टिट्युटमधल्या बहुतेक सगळ्या माणसांनी आपली पोटपूजा आटपत आणली होती, तरी डिरेक्टर मणिमय सामंत यांना लंच घ्यावंसं वाटत नव्हतं. त्यांनी फक्त एक वाटी दही मागवलं, तेवढंही त्यांना जाईना, टेन्शन, भयंकर टेन्शन ! दोन रात्री झोप लागली नाही. कालपासून भूकही नाहीशी झाली होती. मणिमय सामंत, रोबॉटिक्स विषयातले पंडित विश्वविख्यात माणूस. 'झेड. एम. पी. टेकनिक' साठी त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय होतं. झेड. एम. पी. टेकनिक वापरल्यामुळे रोबोने कधी हालचाल करावी, ते ठरवता येई. सरळ चालायचं, उड्या मारायच्या की पोहायचं यावर नियंत्रण ठेवता येई. हायड्रॉलिक सिस्टिम, मोटर आणि इलेक्ट्रिक सर्किट्स यांची अदलाबदल करून रोबोला मानवी चेहरा देण्यात ते यशस्वी झाले होते. रोबोच्या आतली शक्ती कमी झाली तर जांभई देऊन आता रोबो आपल्याला सूचना देऊ शकतो. त्यांच्या या संशोधनाचा खूपच बोलबाला झाला होता. माणसाने इतकं टेन्शन घेणं योग्य नाही. मणिमय सामंतांना हे माहीत होतं. ते स्वतःवरच रागवत. त्यांना वाटे, संशोधन करत होतो, तेच ठीक होतं. कशाला मरायला या संशोधन केंद्राचा डिरेक्टर झालो कोणास ठाऊक! मणिमय यांनी त्याच क्षणी ठरवून यकलं, हातातोंडाशी आलेलं प्रदर्शन पार पडलं, की डिरेक्टरपदाचा राजीनामा द्यायचा असलं झेंगट गळ्यात घ्यायचं नाही. रोबोवर काम करत असलो म्हणून काय झालं! ते स्वतः रोबो नव्हते, माणूसच होते! तीन दिवसांनी या इन्स्टिट्युटमध्ये जे प्रदर्शन भरणार होतं, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. प्रतिष्ठानचा मानसन्मान तर होताच, पण आर्थिक बाबीही होत्या. सगळं अपेक्षेनुसार पार पडलं असतं, तर पुढची काही वर्षं फंड मिळवायची चिंता करावी लागली नसती, सखोल अभ्यास आणि जिवापाड मेहनत घेऊन रोबो तयार केले होते. यासाठी देशोदेशीचे पाहुणे येणार होते. त्यात जसे रोबॉटिक्स विषयाचे अभ्यासक, इतर वैज्ञानिक होते, तसे अनेक बड्याबड्या कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा होते. रोबो पसंत पडला, तर १६२ निवडक अंतर्नाद ऑर्डर्स मिळणार होत्या. ज्यांना संपूर्ण रोबो खरेदी करणं जमलं नसतं, त्यांनी कदाचित वायर्सचं सर्किट, डायग्रॅम किंवा सॉफ्टवेअर यांपैकी काहीतरी खरेदी केलं असतं. नेमक्या त्याच वेळी मणिमय सामंत यांच्याकडे ती बातमी येऊन थडकली. डॉक्टर सुफल सरकार यांनी इंटरकॉमवरून ही बातमी सांगितली. बातमी ऐकल्यावर काही क्षणांसाठी त्यांचं डोकं अगदी सुत्र झालं. आपल्या पोटात आग पडल्याची मणिमयना अचानक जाणीव झाली. त्यांनी चमचाभर दही खाल्लं. अतिशय टेन्शन असताना त्यावर आणखी टेन्शन येऊन आदळलं तर असं होतं का ? नाहीशी झालेली भूक दुप्पट जोराने डोकं वर काढते का ? मणिमयना ठाऊक नव्हतं. ही घटनाच अशी होती, की सगळं सोडून देऊन डॉक्टर सुफल सरकार धावत लॅबोरेटरीत गेले. गेल्या काही दिवसांपासून 'आर थ्री.' मॉडेलच्या सेन्सरमध्ये बिघाड झाला होता. हा रोबो आलजिब्रा, जॉमेट्री, कॅल्क्युलस यांतली अवघड, गुंतागुंतीची सूत्रं झरझर सांगत असे; पण बिघाड झाल्यामुळे साधे पाढे म्हणतानाही तो अडखळू लागला. १९ चा पाढा म्हणताना शहात्तरपाशी येऊन अडखळला थांबला. पाहुण्यांसमोर असं झालं, तर ते जिव्हारी लागेल असं अपयश ठरलं असतं. त्याशिवाय प्रदर्शनात 'आर थ्री' मॉडेलला 'प्रोफेसर' म्हणून प्रदर्शित करायचं ठरलं होतं. अगदी युनिव्हर्सिटीच्या स्तरावर शिकवणारा प्रोफेसर, त्याच्या 'प्रोग्रॅमिंग' मधलं सिलॅबस बदललं की झालं. तसा विचार केला तर आर. थ्री. हे प्रदर्शनातलं महत्त्वाचं मॉडेल होतं. त्यात अचानक झालेल्या बदलामुळे सुफल सरकार अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं. डिरेक्टरनाही याची कुणकुण लागली होती. म्हणून तर त्यांनी सुफल सरकार यांना बोलावून घेतलं. "डॉक्टर सरकार, मी ऐकलंय ते खरं आहे का? आर. थ्री. रोबोमध्ये थोडा बिघाड झालाय का?” मान खाली घालत डॉक्टर सरकार म्हणाले, "हो सर, खरं आहे. तो कठीण प्रॉब्लेम्स छान सोडवतोय, पण सोपी आकडेमोड करताना चुकतोय. "