पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृष्णचूडा फुरंगटली. गाल फुगवत म्हणाली, "तुम्हाला माझी अडचण होणार असली तर...” तातडीने सिंचन म्हणाला, "हे बघ काय ते! पुन्हा रागावलीस? बरं बाई. चल माझ्याबरोबर ' " सिंचनने घर उघडलं. हवेसाठी बेडरूमची खिडकी उघडली. तळ्यावरून येणारा गार वारा खोलीत घुसला. खिडकीपाशी कृष्णचूडाचं (कृष्णचूडा म्हणजे गुलमोहोर) झाड फुललं होतं. लालेलाल दिसत होतं. कृष्णचूडेचे केस वाऱ्यावर उडत होते. ह्यताने केस सारखे करत ती उद्गारली, "ब्युटीफुल !” त्यानंतर मात्र सिंचन स्वतःला अडवू शकला नाही. त्याने तिच्या गालावर अलगद आपले हात ठेवले. ओठ तिच्या चेहऱ्यापाशी आणले. तिने झटकन बाजूला व्हायचा प्रयत्न केला, पण ती हलू शकली नाही. सिंचन आपले ओठ तिच्या पापण्यांवर, कपाळावर टेकवू लागला. ती त्याला अडवू लागली. आपल्या हातानी सिंचनचं तोंड दूर सारायचा तिने विचार केला. तोपर्यंत सिंचनचे हात तिच्या छातीवर विसावले होते. बोटं काम करू लागली होती. वेगाने बाजूला सरकताना तिचं डोकं खिडकीच्या ग्रीलवर आपटलं. मान वळवून कृष्णचूडा इकडे तिकडे पाहू लागली. सिंचन आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवू लागला. कधी जमलं, कधी नाही. त्याच वेळी एक हात तिच्या पाठीवर टेकवून दुसऱ्या हाताने तिच्या टॉपची बटणं शोधू लागला. बेधुंद अवस्था! तारुण्याचा उन्मा ! मधाळ नजरेने तिच्याकडे पाह्यत पुटपुटत होता, "कृष्णचूडा! माझी कृष्णचूडा!.... कृष्णचूडा झटक्यासरशी बाजूला झाली. तिने आपली सुटका करून घेतली. टॉप सारखा करत म्हणाली, "मी जाते... >> "काय झालं?" चकित होत सिंचनने विचारलं. "काही झालं नाही. पण मी चालले. " "सॉरी कृष्णचूडा, अचानक काय झालं तुला?" सिंचन तिला शांतवायचा प्रयत्न करू लागला. "काम डाऊन, कृष्णचूडा. इट्स ओ. के. आय अॅम सॉरी. मी सांगतोय ना, माझी चूक झाली. " "मला परत जाऊ दे, प्लीज, " स्वतःच्या केसावरून हात फिरवता फिरवता सिंचन म्हणाला, "मीही निघतो आता पण अचानक झालं तरी काय तुला?" कृष्णचूडाने उत्तर दिलं नाही. सिंचनला गोंधळलेल्या मन:स्थितीत ठेवून ती बाहेर पडली. लिफ्टमधून खाली आली. हतवाक झालेला सिंचन पाठोपाठ खाली आला आणि तिला शोधू लागला. गेली कुठे इतक्यात? बघता बघता दिसेनाशी झाली? यापुढे रागवायचं नाही, सिंचनने ठरवून टाकलं. आपल्या प्रेमिकेचं चुंबन घ्यायचाही अधिकार नव्हता का त्याला? शारीरिक स्पर्श, बटणं काढायचा प्रयत्न... हे जरा वावगं झालं... पण अशा धुंद अवस्थेत सगळ्या हालचाली ठरवून, तोलूनमापून करता येतात का? त्यात समजुती-गैरसमजुती चा प्रश्न येतोच कुठे? त्यानंतरची त्यांची ही आजची भेट कॉफीचा मग बाजूला सारून तो म्हणाला, "तुला काय म्हणायचंय, ते मला खरंच समजत नाहीय. तुला वाटत असलं की मी जरा जास्तच सलगी केली, तर मी तुझी क्षमा मागतो. आय अॅम सॉरी, " त्याच्या नजरेत आपली नजर मिळवत तिने मंदस्मित केलं. म्हणाली, "तुला सॉरी म्हणायची गरज नाही. मीच सॉरी म्हणायला हवं. सॉरी सिंचन, मला अनेक कोडी सोडवता येत असली, तरी काही कोडी माझ्या आवाक्याच्या बाहेर असतात. मी ती सोडवू शकत नाही. तू मला विसरून जा." सिंचन आर्ततेने म्हणाला, "असं का म्हणतेयस तू? तुला वेड लागलंय का? आर यू मॅड? पराचा कावळा..." कपाळावरची बट मागे सारत कृष्णचूडा म्हणाली, "तुझ्यासाठी ती छोटी गोष्ट असली, तरी माझ्यासाठी नाही. मला फक्त मौखिक भाषा दिलीय, शारीरिक नाही. ती किती जरुरीची आहे, ते मला आत्ता समजलं, मी तुझ्या शरीराबरोबर कम्युनिकेट करू शकले नाही. इच्छा असूनही मला ते शक्य झालं नाही. " "म्हणजे?" कृष्णचूडा काहीतरी बोलणार होती. पण गप्प झाली. फक्त "हाय" म्हणाली. ती दमली असावी. सिंचन हताश होऊन बसून राहिला. कॉफीचं बिल देऊन झाल्यावर ती म्हणाली, "तू मला एक टॅक्सी मिळवून देशील का? मला खूप झोप येतेय.” "देईन." मिस्किलपणे ती म्हणाली, "टॅक्सीचं भाडं द्यावं लागेल तुला, देशील ना?" बाहेर पडल्यावर तिने आपली गुलाबी छत्री उघडून डोक्यावर धरली. सिंचन तिच्याबरोबर चालू लागला. म्हणाला, "तू पुन्हा एकदा विचार करशील का कृष्णचूडा ?" कृष्णचूडा तोंड फिरवत म्हणाली, "नाही जमणार, जी क्षमता मला दिलेली नाही, त्याचा विचार मी करू शकत नाही." पहाटे पहाटे के. सिक्स मॉडेल सापडलं. इन्स्टिट्युटच्या गेटला टेकून डोळे मिटून ती बसली होती. झोपाळलेल्या अवस्थेत तिचे एअर मसल्स, सेन्सर्स, हायड्रॉलिक सिस्टिम यांपैकी एकही घटक काम करत नव्हता. बघितल्याबरोबर लक्षात येत होतं, या मॉडेलचा इनबिल्ट चार्ज संपलाय, बातमी समजल्याबरोबर मणिमय सामंत धावले. (दिवाळी २०१८) निवडक अंतर्नाद १६७