पान:निवडक अंतर्नाद.pdf/१७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बेल्ट किंवा मोजे नाहीतर घड्याळ कुठे आहे माझं, तर आपली अपेक्षा असते, की ती बाहेर येईल. पण ती स्वयंपाकघरातूनच सगळं काही सांगेल. दाराच्या मागे खिळ्याला पहा, नाहीतर कोपऱ्यात झाडूपाशी पत्र किंवा तिथे उशीच्या खाली. तिच्या आवडीचं कोणतं गाणं रेडिओवर लागलं असेल तर ती तिथूनच सांगेल, "रेडिओचा आवाज थोडा मोठा कर, इथे स्वैपाकघरात ऐकायला येत नाहीये.” सुटीचा दिवस होता. दुपारच्या दीडच्या सुमारास मी जेवण करून आराम करायला बैठकीत आलो. लहान भाऊ क्रिकेट मॅच खेळायला गेला होता. साडेतीन वाजता उठून पाहिलं, तर आईं स्वयंपाकघरात बसून तांदूळ निवडत बसली होती, मी तिच्या गळ्यात पडलो आणि हट्टाने म्हणू लागलो, "हे काय ग! दिवसरात्र काम न् काम! काही न काही करत असतेस कधी पीठ तर कधी पाणी तर कधी दूध, कधी हे गरम कर, कधी ते थंड कर, कधी हे भर, कधी निवड तर कधी पाखड ! काही काम नसेल तर नारळ खवत रहातेस नाहीतर मसाल्याचे डबे बदलत असतेस, स्वैपाकपाणी तर चालूच असतं, भाजी निवडून तर त्याचा ढीग लावून बसतेस. आता हे तांदूळ घेऊन बसलीस, पेपर वाचणं, पत्र लिहिणं हेसुद्धा इथेच. मला हे सगळं काही आवडत नाही बघ, मोलकरीण भांडी घासते, तेव्हाही तू इथेच असतेस. तुझ्या खोलीत जाऊन तू आराम का नाही करत ? बाबांची अन् तुझी खोली आहे, ती नावापुरती ! मग तू बैठकीततरी आराम करीत जा...” "तुला नाही कळायचं ते. ही सगळी कामं आधीच करून ठेवावी लागतात. एकाच वेळी कुणी कसं काय भात भाजी - वरण करू शकणार सांग ! जेव्हा भूक लागते, तेव्हा ती एकदम भूक लागलेली असते. मोलकरणीशी बोलत असते, तिला काही उरलं-सुरलं देत असते. कधी तिला चहा करून द्यावा लागतो. अशी बारकी सारकी कामं करावीच लागतात, ही कोण करणार ? आणि मी तर आमच्या खोलीतच झोपते की रे, कीत बसणं, लवंडणं मला बिलकूल नाही आवडत. तिथे एवढी वर्दळ असते, की दोन मिनिटांचा आरामसुद्धा होत नाही. माझं काम स्वैपाकघरातच असतं, इथेच मला बरं वाटतं पा.” माझ्या डोक्यावरून हात फिरवीत, समजावीत तिने मला सविस्तर सांगितलं. या वयातही आईचे केस कसे काळे अन् लांबसडक आहेत ! ती अशा तऱ्हेने बोलते, की मी चार-पाच वर्षांचा मुलगा आहे आणि मला काही समजत नाही. प्रत्येक वेळेस मला वाटतं, की खरंच मी आईसमोर लहानच आहे, अजाण बालकासारखा, एकदा संध्याकाळी मी पाहिलं, तर स्टूल भिंतीशी ठेवलं आहे, त्यावर आई बसली आहे. तिच्या मांडीवर ताट आहे, त्यात दूधी सोलून ठेवलेला आणि तिथेच चाकूसुद्धा ठेवलेला. डोकं भिंतीला टेकवून आई झोपली होती! एक गाढ अशी विश्रांती तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होती आणि दीर्घ श्वास चालू होता. आईला १७० निवडक अंतर्नाद जागं करावं का कसं या विचारात मी थोडावेळ उभा होतो, परतून जात होतो, आणि एवढ्यात जागं होऊन आईने विचारलं, "काय रे, काय पाहिजे?” आईकडे लक्षपूर्वक पाहात मी म्हटलं, "आई, तू किती थकून जातेस, पण इथेच इथेच बसून रहातेस! तुझ्या खोलीत जाऊन का बरं आराम करीत नाहीस? बघ, तू आत्ता इथे थकून झोपली होतीस!" - "नाही रे, मी झोपली नव्हते. कधी कधी मला असं भिंतीला टेकून बसून रहायला छान वाटतं. मी मुळीच थकलेली नाहीय, काय-काय पाहिजे तुला?" “आजकाल बायका काय काय काम करतात! तू कधी कधी बाहेर जाऊन येत जा ना! इथे या पिंजऱ्यात बसून काय असतेस?" मी मोठ्या तळमळीने तिला सांगू लागलो. “मी फिरून येत असते, तू लक्ष देत नाहीस. सगळीकडे जाते, तिकडे बाहेर बागेतसुद्धा तुम्ही जेव्हा घरी नसता, तेव्हा मी बरीच फिरत असते. कितीतरी वेळा मी दूर गेले आहे...' तिचा आवाज, स्वयंपाकघरातल्या गव्हाच्या टाकीतून यावा तसा येत होता. १) मला तिचं काही बोलणं समजू लागलं, काही नाही. मग ती हसून सांगू लागली, "सुरुवातीला मी अस्वस्थ व्हायचे. मात्र आता मला घरचं काम करायलाच चांगलं वाटतं बघ, घरातच एवढं चालणं- फिरणं होतं, कुठे वेगळं जायची गरजच वाटत नाही. मी माझ्या आईवर गेलेय, असं म्हणतात! तिलासुद्धा हेच सगळं आवडायचं.” "तुला मुलगी असती, तर तिलासुद्धा तू असंच बनवलं असतंस.” "सगळ्यांना सगळे मिळून बनवत असतात. आम्ही सगळे मुलीसुद्धा अशाच तऱ्हेनं बनत जातात. पण आजच्या जमान्याचं काय सांगावं! ती वेगळीसुद्धा झाली असती!” आई खूश होती का उदास का नाराज, काही कळत नव्हतं. मी मुकाट्याने माझ्या खोलीत गेलो. थोड्या वेळाने, स्वयंपाकघरासमोरून गेलो. पाहिलं, तर आई किचन ओट्यावर चढून कसला तरी डबा काढायच्या प्रयत्नात आहे. “आता मात्र हद्द झाली आई तुझी! मी घरी आहे ना? मला सांग, काय उचलायचं आहे?" मी तिच्यावर ओरडलोच. “दिवसभर कितीतरी वेळा अशा वस्तू उचलाव्या, ठेवाव्या लागतात, किती वेळा तुला सांगायचं?” मग ती ओट्यावरून खाली उतरली ती जवळपास उडी मारावी तशी. आणि एकदमच आपल्या डाव्या पायाची टाच हाती धरून वेदनेने कण्हू लागली. मी तिला सांभाळून तिथेच स्टुलावर बसवलं. सांगू लागली, "मला वाटतं, मुरगळलाय..." "हो, अशा तऱ्हेने उतरलीस तर दुसरं काय होणार? मी केलं नसतं का हे काम ?” "थोडं मुडपलं असेल, पाय तिरपा झाला. चालायचंच, चल,