पान:निवडक अंतर्नाद.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो मसाल्याचा डबा घे बरं इकडे.” आणि तिथेच स्टुलावर बसून ती पायाला लावायला हळदीचा लेप तयार करू लागली. त्याच रात्री मध्येच मला जाग आली, तेव्हा मी तिथूनच पाहिलं. खिडकीतून स्वयंपाकघरात प्रकाश येत होता. आणि त्या दुधाळ उजेडात आई खिडकीशी उभी होती. एकदम सहज, स्वयंपाकघरात बसून राहणाऱ्या आईबद्दलची ही कथा वाचली, आणि मला फार पूर्वी वाचलेली एक इंग्रजी कथा आठवली. योगायोगाची गंमत वाटली; कारण त्या इंग्रजी कथेचा अन् या हिंदी कथेचा गाभा एकच होता स्वयंपाकघरात बसून राहणे आणि एकटे बसून असणे. दोन्ही कथांत हे महत्त्वाचे साम्य होतेच, शिवाय आणखी सारखेपणाचे काही मुद्दे होते. दोन्ही कथांत हकीकत सांगणारा किशोरवयीन मुलगा होता. दोन्ही कथांत या निवेदकाला कमालीचे आश्चर्य आणि कुतूहल असते. दोन्ही कथांत एकटेपण होते आणि स्वयंपाकघरातलेच ते एकटेपण... बसून असणे... दोन कथांत फरक असा होता, की इंग्रजी कथेत निवेदकाचे वडील स्वयंपाकघरात रात्री (रात्रभर) एकटेच बसून असतात आणि हिंदी कथेत आई. दोन्ही कथांमध्ये मुले तेच विचारतात- 'तू / तुम्ही झोपायला का नाही जात ? काय करतेस / करता इथे बसून ?' दोन्ही कथांत या प्रश्नांना स्पष्ट अशी उत्तरे नसतात, दोन्ही कथा दीड हजार शब्दसंख्येपर्यंतच्या लघुकथा. 'माय फादर सिट्स इन द डार्क' ही ती जेरोम वाईडमन (१९१३-१९९८) या अमेरिकन लेखकाची कथा या लेखकाने कादंबरी, कथा आणि नाटके लिहिली. १९६० मध्ये त्यांना नाट्यलेखनाबद्दल पुलित्झर पुरस्कार मिळाला. कथेतला निवेदक पोरगा, कुण्या निमित्ताने रात्री केव्हाही तो स्वयंपाकघरात जात असतो. स्वयंपाकघरात अंधारात बसून असतात त्याचे बाबा तोंडात चिरूट सावकाश धूम्रपान चालू असते त्यांचे स्वस्थ खुर्चीत बसून अंधारात नजर लावून बसलेले बाबा; एकटक नजर लावून बसलेले. पोराला आश्चर्य वाटते. तो विचारतो, “Why don't you go to bed, Pa?" हिंदी कथेतसुद्धा मुलगा विचारतो, "तुम इतनी रात में क्या कर रही हो? क्या सोई नहीं?" 'तू जा, झोप; दोन्ही कथांत, या प्रश्नांना उत्तर असते येतोच/येतेच.' वा जखमेची सरळ. पायाला कसली मुरड पडल्याची जाणीवसुद्धा तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. ती खिडकीतून दूरवर पाहत होती. कदाचित आकाशातला चंद्र, कदाचित झाडी... किंवा कदाचित काहीच नाही. मग ती सावकाश वळली आणि स्टुलावर बसली. भिंतीला डोकं टेकवून तिने डोळे मिटले. कथा जसजशा पुढे जातात, तसतसा वाचणाराही तसाच अस्वस्थ ह्येत जातो – त्याचे कुतूहल वाढत जाते. तेच प्रसंग, तशीच उत्तरे... कथा पुढे जातात. एका कथेतले बाबा, दुसऱ्या कथेतली आई. स्वयंपाकघरात बसून असणारे, वावरणारे, त्यांचे ते एकटेपण, हिंदी कथेचा अनुवाद आपण वाचला आहे. इंग्रजी कथेबद्दल विस्ताराने पाहू या. कथेतला हा निवेदक मुलगा आपल्या बाबांची ही सवय सुरुवातीलाच सांगतो. ती विचित्र सवय. रात्री हा जेव्हा स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी जातो, तेव्हा त्यांच्यात असे संवाद होतात. "बाबा?" "तुम्ही झोपायला का नाही जात बाबा ?” “जातो...” पण ते बसून असतात. मी झोपायला जातो, झोपून जातो; पण ते मला खात्री असते, बाबा तिथेच बसून आहेत अंधारात. चिरूट तोंडात धरून, झुरके घेत बसलेले बाबा. घरी आई असते, त्याची बहीण असते, लहान भाऊ असतो. रात्री आवराआवर करून सगळे झोपायला जातात, आईसुद्धा बाबांचा निरोप घेऊन झोपायला जाते. हा निवेदक काहीतरी वाचत असतो. त्याला माहीत असते. मध्येच जेव्हा तो उठून जातो, आणि पाहतो - बाबा बसून असतात अंधारात. मुलाला कुतूहल वाटते, काळजी वाटते, कधी बाबांच्या संक्षेपाने उत्तर देण्याच्या सवयीचा रागसुद्धा येतो. आपल्यालासुद्धा एक गूढ कुतूहल वाटत असतेच. एकदा पोरगा बाबांना विचारतो - "तुम्ही झोपायला का जात नाही बाबा?” “जातो आता," ते म्हणाले, "माझी वाट पाहू नको.” "पण तुम्ही कितीतरी तासांपासून बसून आहात, काय झालंय - कशाचा विचार करीत आहात एवढा ?” "काही नाही रे बेटा." ते म्हणतात, "काही नाही, मी निवांत आहे, बस काही नाही. " निवडक अंतर्नाद १७१