पान:निवडक अंतर्नाद.pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथेच्या अनुषंगाने प्रश्न उत्तरांचे एक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनही आहे. ते वाचून व बघून मला एक महत्त्वाचा मुद्दा कळला. ही कथा मला 'तेवढी' का जाणवली नाही, त्याचे कारण समजले. निवेदकाचे बाबा, निवेदकाचे आजोबा - ते कुटुंब तिकडे ऑस्ट्रियात होते. युद्ध किंवा अन्य समस्यांमुळे त्यांना देश सोडावा लागला... आता आजोबा नाहीत, बाबा इथे आहेत, त्यांचे सगळे कुटुंब इथे इथल्या देशात सुरक्षित अशा वातावरणात आहेत. बाबांच्या मनात मात्र तीच अस्थिर, अस्वस्थ करणारी आठवण असेल, मायदेशाची, ते दिवस... त्यांच्या वडिलांच्या आठवणी आता या वयात त्यांना तीव्रतेने येत असतील.... असेच असावे. मला तसे युद्धाचे वाताहतीचे अनुभव ना कधी आले, ना कधी पाहिले. त्यामुळे मला निवेदकाच्या बाबांच्या वेदना जाणवल्या नसाव्यात का? किंवा या संदर्भामुळे ही कथा एवढी गाजली असावी का? हिंदी कथेत तर मी म्हटले, तशी शेवटी काही गती आली नाही - ना आईच्या तशा राहण्याचा उलगडा होत. मग त्या 'कस्तुरी' चे काय? ही कथा' होऊ शकते का.... याचे उत्तर कथेचे अभ्यासक व्यवस्थित देऊ शकतील. माझ्यासारख्या वाचकाला कथेबद्दल सांगण्यासाठी उपमा- प्रतिमांचा आधार घ्यावा लागतो. मला हिंदी कथेतली ही आई एका नितळ, संथ आणि निर्मळ प्रवाहासारखी वाटते. सतत प्रवाही आणि सांस्कृतिक समूडीसाठी अतनाद फेब्रुवारी २०११ रुपये ३५ फेब्रुवारी २०११, कुसुमाग्रज (छायाचित्र : ल. म. कडू) कार्यरत राहणारे एका स्त्रीचे ते व्यक्तिमत्त्व, (ही उपमा जेव्हा मी कुमार अंबूज यांना सांगितली, तेव्हा त्यांनी 'हिंदुस्थानी स्त्री !' अशी त्यात दुरुस्ती केली!) त्याउलट, जीवनप्रवाहात भोवरा यावा, माणूस त्या भोवऱ्यात फिरत राहावा, तसे त्या इंग्रजी कथेतले बाबा हिंदी कथेत एक सुरेख असे व्यक्तिमत्त्व उभे केलेले आहे आणि गोष्ट सांगावी तशी ती हकिकत सांगितलेली आहे हिंदी कथा आणि इंग्रजी कथा या दोन्हींत असलेले आणखी एक साम्य सांगायचे राहिले - दोन्ही कथांत स्वयंपाकघरात एक खिडकी आहे. रस्त्यावरच्या दिव्याचा मंद असा छाया प्रकाश त्यातून येतो आणि स्वयंपाकघरातले वातावरण अधिकच गूढ होत जाते, ते इंग्रजी कथेमध्ये (“The dim shadow of light that comes through the window from the street lamp only makes the room seem darker.) आणि 'मां रसोई में रहती है कथेमध्ये निवेदक सांगत असतो - . खिडकी से रसोई में रोशनी आ रही थी और उस दूधिया रोशनी में मां खिडकी पर खड़ी थी। एकदम सीधी, तनी हुई।... वह खिडकी के पार देख रही थी। शायद चांद, शायद पेड । शायद कुछ नहीं... दोन्ही कथांतल्या मुख्य पात्रांच्या एकटेपणाच्या अशा वेगवेगळ्या तऱ्हा... (दिवाळी २०१८) सांस्कृतिकवी आनंद attive Ost! रुपये ४५ ऑगस्ट २०११ (चित्रकार मुक्ता अवचट) निवडक अंतर्नाद १७३