पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. आनंद गोखले म्हणतात, "बेडेकरांबद्दल माझ्या वडिलांना पूर्वीपासूनच खूप आकर्षण होतं. याचं कारण बहुधा बेडेकरांचं सिनेसृष्टीचं ज्ञान आणि त्या क्षेत्रात जायची वडिलांची लहानपणापासूनची इच्छा हे असावं. पुढे इंटरला नापास झाल्यामुळे घरच्यांनी वडिलांना फर्ग्युसनमधून काढलं व मुंबईला पाठवलं. तिथे ते अभ्यासात रमले. पदवी परीक्षेत सुवर्णपदक मिळवून अमेरिकेस गेले. नंतर मग आयुष्याला वेगळंच वळण लागलं. पण बेडेकरांविषयी एक सुप्त आकर्षण मनात राहिलंच. "मागे मुंबईत हिंदू कॉलनीत राजा शिवाजी विद्यालयात भरलेल्या साहित्य संमेलनाचे बेडेकर अध्यक्ष होते. एरव्ही अशा कार्यक्रमांना कधीही हजर न राहाणारे वडील केवळ बेडेकरांचं भाषण ऐकण्यासाठी म्हणून संमेलनाला गेले. लांब कुठेतरी कोपऱ्यात उभे राहिले. त्यांना शोधत शोधत मी त्यांच्यापाशी गेलो. पण बेडेकरांचं भाषण संपताच त्यांना भेटण्यासाठी वगैरे न थांबता, ‘निघतो मी आता एवढं मला सांगून वडील तिथून बाहेर पडले. दोघांची भेट होणं सहज शक्य असूनही राहूनच गेलं. " अयशस्वी ठरलं, 'बेडेकरी मसाला' म्हणून त्याची संभावना झाली. माझ्यासारख्या अनेकांचा अपेक्षाभंग झाला. पुढे कधीतरी बेडेकरांची निवांत भेट झाली तेव्हा स्वप्नभंगाची ही व्यथा मी बोलून दाखवली. 'लाखाराणी' बद्दल बेडेकर बोलले नाहीत. 'तुलासुद्धा ते पिक्चर पसंत पडलं नाही, समजलं नाही?' अशा आशयाच्या छटा त्यांच्या चेहऱ्यावर तरळल्याच्या मला भास झाला. 'शेजारी' संबंधी मात्र बरंच काही म्हणाले. शांतारामबापूनाच त्यांनी चॅलेज दिला होता. एखादी कथाकल्पना सांग, पटली तर पाचेक दिवसांत संपूर्ण पटकथा तयार करून देतो म्हणून दामले आणि फत्तेलाल या आपल्या भागीदारांच्या अतूट मैत्रीबद्दल शांतारामबापूंना अप्रूप होतं. तोच कथाविषय. त्यावरून बनविलेला 'शेजारी'... माझं समाधान झालं. पण बेडेकर आपली शल्यं सांगतच राहिले. माझा प्रिय मित्र राजा नेने याचा प्रभात सोडताना बेडकरांशी बेबनाव झाला होता, असं ऐकलं होतं. राजामुळे मला बेडेकरांच्याबद्दल किल्मिष वाटत होतं. ते हेरून बेडेकरांनी प्रभातच्या हितासाठी राजाबरोबर सहकार्य करण्यासाठी केलेल्या खटपटीची हकीगत सांगितली. राजाने ठरवलेल्या भैय्या ठेंगडीऐवजी बेडेकरांना मान्य असलेला चंद्रमोहनच रामशास्त्री म्हणून सुयोग्य ठरला असता, त्यावेळी सगळेच अहंभावाने वागत होते हेही लक्षात आलं. तरी पण बेडेकरांनी 'रामशास्त्री' ला आपलं नाव चिकटवू न देता... जसं 'रणांगण'च्या प्रथमावृत्तीवर.... "चित्रपटाच्या बाबतीत माझं असंच होतं आहे..." बेडेकर एकदा म्हणाले, .'नारद- नारदी' चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन नव्याण्णव टक्के माझं. पण श्रेय मात्र प्रकट करता आलं नाही. 'रामशास्त्री' चं प्रकरण तुम्हाला माहीत आहेच... 'अमर भूपाळी' ची पटकथा पूर्णपणे माझीच. मीच संवादासाठी मूळ लेखकाला बोलावलं... चित्रपटधंद्याचं असंच तिरपागडं आहे.." " मी ऐकत राहिलो. 'वासुदेव बळवंत' हा थोड्या भांडवलात व असंख्य अडचणींत तयार झालेला अतिशय सुंदर, सबकुछ बेडेकर बोलपट, त्याबाबत, आपल्या यशाबद्दल ते का बरं बोलत नव्हते? "तरी पण 'चूल आणि मूल मला फारसा आवडला नाही. 'पहिला पाळणा' फार आवडला, पण सुरुवातीचा सीन एका इंग्रजी चित्रपटावरून सुचला असं तुम्ही पद्यावलीच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे, त्याने विरस झाला.” मी अपेक्षाभंगाचं चऱ्हाट चालू ठेवलं. '... 'चूल आणि मूल'ची कल्पनाही अशी इंग्रजी कथेवरून डोक्यात आली... मला कुणी उद्युक्त केल्याशिवाय, काहीतरी कल्पना- योजना पुढे मांडल्याशिवाय लिहायला बळच येत नाही... मी आपण होऊन, उत्स्फूर्तपणे लेखनाची बैठक मांडीत नाही. काहीतरी निमित्त घडावं लागतं, कुणी तरी भरीला घालावं लागतं...” मी चमकलो. चक्रावून गेलो. स्फूर्तीचा झटका, अवकाशातून येणारा अनुभूतीचा स्पर्श, काळजात उगवणारी कलाकल्पना, निर्मितीचं गूढ, प्रतिभेच्या परीसाचा चमत्कार, आकृतिबंधाचा साक्षात्कार, कलाकाराच्या दैवी गुणाचं गारुड... आजवर सर्जनशील कलाकृतीबद्दल ऐकलेलं, वाचलेलं, मानलेलं हा माणूस मोडून टाकीत होता. मला एक कणवत् कल्पना द्या, मी त्यावर कथानकाचा कुतुबमिनार उभा करीन असं म्हणता होता, एखादं चित्र, एखादा चॅलेंज आणि याच्या हातून त्यावर दृष्ट लागण्यासारखं चित्रपट - नाटक साकार होत होतं. माझं कुतूहल तीव्र झालं. एका वेगळ्या वादळी व्यक्तिमत्त्वाला, निराळ्याच रसायनाने बनलेल्या प्रतिभावंताला, मी पाहात होतो. - चित्रपटाचं माध्यम नाहीतरी धेडगुजरीच आहे. संकर साधणारी कला – नाटक कादंबरीसारखी ती शुद्ध, एका हाती असलेली नाही. नाट्यप्रयोगसुद्धा सामूहिकरीत्या सिद्ध होतो. पण नाट्यलेखन... "मी आणि हरी मोटे आगगाडीने चाललो होतो -" बेडेकरांनी एकदा सांगितलं, "वाटेत एका स्टेशनावर हरीने नाटकाचं एक चोपडं खरेदी केलं. गाडीत बसल्या बसल्या मी ते चाळलं नि भिकार वाटून बाहेर भिरकावून दिलं. रागावलेल्या हरीला बजावून म्हटलं की केवढा चांगला पौरोणिक विषय फुकट घालवलाय त्या नाटकात या विषयावर किती वेगळ्या तऱ्हेने लिहिता येईल. मी लिहितो! म्हणून 'ब्रह्मकुमारी' लिहिलं.” मी परत चक्रावून जाण्याऐवजी सावध झालो. प्रतिभेच्या दिव्य निवडक अंतर्नाद १७९