पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुन्हा ओळखीचा दिसे उंबरा खुळ्या यौवनातील भोळी कथा । घनश्याम वा सुंदरा कायसे इथे नादलेले सडा घालता कुणाची निनावी तरी पावले तशी थांबली चालता चालता... पुढील ओळी स्मरणातून गळून गेल्या आहेत. त्याच्या प्रकाशित संग्रहात ही कविता मला आढळली नाही. पुढे त्याच्या कवितांना 'मौज'ने, 'सत्यकथे'ने उचलून धरले. मंगेशकरांच्या कंठातून ती जगभर रुंजत गेली. त्याची काव्यगायनेही लोकप्रिय होऊ लागली. ठिकठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होत गेले. एखाद्या गाजलेल्या गवयाने मिळवावा तेवद्य याच्या मानधनाचा आकडा वाढत चालला. असे यश कुणाच्याही मस्तकात जाऊन भिनले, तर ते अस्वाभाविक म्हणता येणार नाही. विशेषतः कवितेला दाद देण्याच्या निमित्ताने सत्ताधीश राजकारणाच्या धबडग्यातही आपली रसिकता टिकवून धरल्याचे श्रेय जाहीरपणे मिळवता येऊ लागल्यापासून याची राजदरबातील पत वाढली, सत्तेवर कुणीही असले, तरी याच्या कवितेला दाद देणे त्याला आवडायचे. आणि सत्ताधीश कोणत्याही गटाचा, पक्षाचा असला, तरी याच्याशी त्याची जवळीक प्रस्थापित व्हायची. आणि ओघानेच तत्पूर्वीचे त्याचे हितसंबंध केवळ रद्दच नव्हे, तर त्याज्य ठरायचे, याच्या निष्ठा वरचेवर बदलत गेल्या. त्यामध्ये वैचारिक कारण नसावे, व्यावहारिक असू शकेल. पुष्कळदा त्याच्या निष्ठेचा लंबक एका ध्रुवाकडून पार दुसऱ्या ध्रुवापर्यंत जायचा. त्यामुळे कडव्या डाव्या विचारसरणीकडून पायघोळ व गटप्रचुर काँग्रेसवादाद्वारे मूलतत्त्ववादापर्यंतचा त्याचा प्रवास, त्याच्या आरंभापासूनच्या पाठीराख्यांना वरचेवर चक्रावून टाकत असे. पण नव्याने स्वीकारलेल्या कोणत्याही निष्ठेची समर्थनपूर्वक पाइकी बाकी तो पूर्वीच्याच लढाऊ व आक्रमक आवेशाने करायचा. त्याची ही स्थित्यंतरे विचार प्रेरित असती, तर काही प्रश्न नव्हता. पण ती उदरप्रेरित असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याचे हितचिंतक उद्विग्न होत. पुढे पुढे तारेवरच्या या लक्षवेधक सर्कशींमुळे त्याची कवितेबद्दलची एकाग्रताही शिथिल होणे स्वाभाविक होते. तरीही लेखन थांबलेले नव्हते. त्याचे लेखन हे त्याची स्वतःची व्यावहारिक गरज झालेले होते. रसिकांची गरज आता तेवढीशी उरलेली नव्हती. पण त्याची याला दरकार नव्हती. त्याचे गद्यलेखन आता नियमित, अनियमितपणे चालू झाले. पण हे लेखन म्हणजे त्याच्या नित्याच्या वागण्याबोलण्याची छापील अनुकृती होती. त्यात आत्मशोधाची आविष्कृती नव्हती. त्याने 'गझल' नावाच्या यावनी वृत्ताला सकस मराठी वळण दिले. त्यात यावनी मनोवृत्तीतील निःसंग निधडेपणा होता, बेधडकपणा होता, अवास्तव, अकल्पितपणा होता. क्वचित खोल दर्दही होता. या दर्दामुळेच त्याच्या ओळी जिव्हारी जाऊन झोंबायच्या, खऱ्या रसिकतेला कासावीस करायच्या व रसिकतेचा आव आणणाऱ्या सवंग श्रोत्यांची हुकमी दादही मिळवून जायच्या. अशांची संख्या अर्थातच विपुल होती. या वैपुल्याच्या तालावरच १८४ निवडक अंतर्नाद त्याचे मन दीर्घकाळ झुलत राहिले आणि बिचाया जाईच्या पाकळ्या डुलत्या दवबिंदूच्या अभावी उपाशीच राहिल्या. त्या वैपुल्यातूनच याचा एक संप्रदाय उभा राहिला व गावोगावच्या रचनालुब्ध नवोदितांना घरबसल्या प्रासप्रावीण्याचे धडे देणे, हा याचा आवडता उद्योगच होऊन बसला. परिणामी काही चमकदार व अफलातून कल्पनांच्या साहाय्याने यमकांशी लाडीगोडी करण्यालाच काव्यसाधना मानले जाऊ लागले. अनुकरण हे प्रशस्तीचेच एक रूप असते. त्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत पसरलेली अनुकरणाची लाट ही याची विजययात्राच ठरली. त्यापुढे नवीन कविता त्याच त्या कल्पनांच्या व शब्दावलींच्या आवर्तात सापडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. उर्दू शायरीत प्रेमसाफल्यापेक्षा प्रेमभंगाचीच ओढ आढळते, तशी मराठी कवितेत सार्थकतेऐवजी व्यर्थतेचीच सूक्ते आळवली जाऊ लागली. आपुले मरण आपुल्याची डोळे पाहण्याचा अनुपम सुखसोहळा तुकारामालासुद्धा एकदाच अनुभवायला मिळाला. पण नवथर गझलकारांचा तो हुकमी विषय झाला. आपली अंत्ययात्रा पाहण्याचे, ती आपणच आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचे, मसणातल्या मुडद्यांनी एकमेकांची जात विचारण्याचे एरवी चक्रावून टाकणारे उल्लेख सरावाचे होऊन गेले. मराठी काव्यातील तल्लख उत्प्रेक्षांचा अध्याय समाप्त झाल्यावर ही अकल्पनीय कल्पनाव्यूहाची कारकीर्द नव्या मुखवट्याने चालूच राहिली व भान विसरून मान डोलावणाऱ्या समीक्षेला तिने तोंडघशी पाडले. त्याच्या गद्यलेखनात एक आकर्षक औद्धत्य असे व भिडस्त बोटचेप्यांच्या गर्दीत हा शाब्दिक उर्मटपणा वेगळा उठून दिसत असे. त्यामुळे लोकांचे तो लक्ष वेधून घेई. त्यातील विधानांना त्याच्या दैवी कल्पकतेचे पाणी चढलेले असायचे. शिवाय आपल्याच ओळी आपल्या विधानांना आधार म्हणून श्रुति- वचनांसारख्या अधूनमधून वापरण्याची त्याला खोड आहे ज्याच्यावर तुटून पडायचे, त्या विषयापेक्षा तुटून पडण्याचा याचा आविर्भाव वाचकांच्या लेखी लक्षणीय ठरायचा, पुष्कळदा हे त्याचे लेखन आक्रस्ताळे, त्याच्या वागण्यासारखे अशोभनीय आणि त्याच्या बोलण्यासारखे अर्वाच्यही व्हायचे. पण असे वागणे- बोलणे आवडून घेणारा एखादा खुशामतखोरांचा वर्ग असतोच. तसेच असे लिहिणे मिटक्या मारीत वाचणारा मत्सरग्रस्त विषयवैऱ्यांचा एक उत्सुक गटही त्याला अनायासे उपलब्ध झाला. आज तो अशाच तोंडपुज्यांच्या कैदेत सापडून अगतिक झालेला दिसतो. या गराड्यातील काही लोक निश्चित त्याचे अंधभक्त आहेत, तर बाकीचे हितसाधक व खुशमस्करे आहेत. त्यांच्या प्रासंगिक तोंडपुजेपणामुळे फुलणारी कळी लोप पावल्यानंतर वास्तवाच्या जाणिवेने याचा भ्रमनिरस होत नसेल काय ? या बौद्धिक कोंडमान्यामध्ये त्याचा जीव गुदमरून जात नसेल काय? खुशामतखोरीच्या या कोलाहलात आपले मानसिक एकाकीपण त्याला भयप्रद वाटत नसेल काय ? अलीकडे काही कारण नसताना त्याने आपल्या खऱ्या हितेच्छूंशी वैर धरलेले दिसते. खरे म्हणजे त्याचा हा स्वभाव नाही. जे असेल ते तोंडावर बोलण्याचा त्याचा लौकिक आहे. मागाहून कुरापती काढण्याचा वा कारवाया करण्याचा त्याचा पिंड नाही. सृजनशील प्रतिभावंताने अशा कामात आपली शक्ती व बुद्धी खर्च करू नये, असे