पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केशवसुतांची तुतारी किंवा बालकवींची फुलराणी म्हणजे मराठी काव्यजगातली उत्तुंग शिखरे. पण उत्तुंग शिखरांइतक्याच छोट्या छोट्या टेकड्याही कधी कधी मनाला भुरळ पाडतात. प्रतिभेच्या अवचित झालेल्या परीसस्पशनि अशा छोट्या छोट्या टेकड्याही कधी कधी उजळून निघालेल्या असतात. काही जुन्या, तुलनेने कमी प्रसिद्ध, पण सुंदर कवितांची दखल घेणारे, वाचकांची वाङ्मयीन अभिरूची समृद्ध करणारे सदर. हे सदर अडीच वर्ष चालले. असे एकूण २५ रसग्रहणपर लेख शान्ताबाईंनी लिहिले. त्यांतील हे तीन लेख. अंतरिक्ष फिरलो पण... अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी गेली न उदासी! लागले न हाताला काही अविनाशी काही अविनाशी! क्षितिज चरणांचे दिसते रे दूर दिसते रे दूर घेऊन मी चालू कसा भरलेला ऊर भरलेला ऊर जरि वाटे जड़ कळले तळ कळला नाही तळ कळला नाही! जड म्हणते 'माझा तू' क्षितिज म्हणे 'नाही' क्षितिज म्हणे 'नाही अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी गेली न उदासी! अंतरिक्ष फिरलो पण... शान्ता ज. शेळके १८ निवडक अंतर्नाद - म. म. देशपांडे काही कवी सातत्याने भरपूर लिहितात. ते मोठे असतात आणि त्यांच्या अविरत चाललेल्या लेखनातून 'कवी' म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास पावताना दिसते. ते रसिकांच्या मनावर ठसते आणि त्यातून त्यांची एक निश्चित प्रतिमा आकारास येते. कुसुमाग्रज, इंदिरा, बा. भ. बोरकर, अनिल, नारायण सुर्वे ही अलीकडच्या काळातली याची काही उदाहरणे. जुन्या काळात विपुल काव्यरचना करणारे भा. रा. तांबे यांचाही यात समावेश करता येईल. या कवींनी वैपुल्याने कविता लिहिली आणि काव्य म्हणूनही ती उत्तम आहे, असे रसिकांना जाणवले. मुख्य म्हणजे या कवींच्या काव्यावर त्यांची स्वतःची ● अशी ठसठशीत मुद्रा आहे. इतकी स्पष्ट, की कवितेखाली त्यांचे नाव जरी नसले तरी केवळ कवितेच्या शब्दकळेवरून, तिच्या तोंडवळ्यावरून ती अनिलांची की बोरकरांची, तांब्यांची की कुसुमाग्रजांची हे आपण सहज ओळखू शकतो. इतकी त्या त्या कवीची पृथगात्मता त्यांच्या काव्याला लाभलेली असते, मधल्या कालखंडातल्या इतर काही कवींचीही नावे या संदर्भात आपणास आठवतील. याउलट काही कवी अगदी मोजके लेखन करतात, ते अतिशय कसदार, अस्सल असते. सातत्याने लिहिणाऱ्या कवींना रसिकांचा जो भरघोस प्रतिसाद लाभतो, त्यांच्या नावांना साहित्यात जी प्रतिष्ठा मिळते, तसले काही या मोजके लेखन करणाऱ्या कवींच्या वाट्याला येत नाही. पुढच्या पिढीला कदाचित त्यांनी नीटशी ओळखही राहत नाही. वैपुल्याने आणि सातत्याने काव्यलेखन करणाऱ्या कवीच्या वाट्याला येणारी लोकप्रियता त्यांना मिळत नाही. परंतु त्यांनी जे मोजके लेखन केलेले असते, ते साहित्यप्रेमी रसिकांच्या, चोखंदळ समीक्षकांच्या मनात आपल्यापुरते एक महत्त्वाचे स्थान मिळवून राहिलेले असते. म. म. देशपांडे हे असे मोजके पण अतिशय सत्त्वशील आणि कसदार लेखन करणारे कवी आहेत. त्यांचा वनफूल हा काव्यसंग्रह एकोणीसशे पासष्ट साली मौज प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झाला. त्यातही मोजक्याच कविता आहेत. पण या कविता