पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणजे हा सारा 'शिकारखाना' गुण्यागोविंदाने, हसतमुखानी चालविताना त्यांना काय करावे लागले असेल ते समजावे म्हणून. आमचे वडील ५५ साली गेले. आधीसुद्धा देवदत्तांना घरात सर्वाधिक मान होता, पण आता आम्हां सर्वांना ते वडिलांच्या ठिकाणी झाले. आम्ही काही भाऊ-बहिणी तर शाळा-कॉलेजात. त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी यांच्यावर आली. लग्नाची जबाबदारी नव्हती, कारण अगदी लहानपणापासून आई वडिलांनी आम्हां सर्वांना छान समजावून दिले होते - "तुम्हांला हवं ते सर्व शिक्षण देण्याची जबाबदारी आमची; पण तुमच्या लग्नाशी आमचा संबंध काय ? वाटलं तर करा? नको वाटलं तर नका करू ! ज्याच्याशी करावंसं वाटतं त्याच्याशी करा! फक्त नोंदणी पद्धतीने करा!” आता लग्नानंतर उभयतांनी देवाला नमस्कार करावा की करू नये याबद्दल या दोघांच्यात दुमत असणार; पण ते आम्हांला न कळण्याची काळजीपण त्यांनी घेतली असणार! मॅट्रिकला संबंध मुंबई इलाख्यात त्यात कराची, कारवार, अहमदाबाद हेदेखील होते सर्वप्रथम आलेल्या देवदत्तांनी, जाणीवपूर्वक व्रत म्हणून अध्यापनाचे क्षेत्र निवडले होते. पण आमच्या आई-वडिलांप्रमाणेच, त्यांनीही अभ्यास करा असे आम्हांला कधी सांगितले नाही. हवा तर करा, नाहीतर खेळा, मला एस.एस.सी.ला ४७ टक्के मार्क मिळाले. नरेंद्रला ४८ टक्के! त्यामुळे तो माझ्यापेक्षा हुशार आहे आणि आम्ही दोघे मिळून दादांच्याहून टक्केवारीत पुढे आहोत असे तो सांगतो. 'अं. नि. स. 'च्या चळवळीमुळे विषय कसा मांडावा हे त्याला चांगले समजते! सांगायचा मुद्दा वेगळा. या अशा बहीण-भावंडांचे खटले आनंदाने, गुण्यागोविंदाने, हसतमुखाने, आपल्या तुटपुंज्या वेतनात चालवणे फार कठीण असणार, आमच्या सुमनवहिनी एम. ए. ला इंग्रजी व समाजशास्त्र असे दोन विषय घेऊन मुंबई विद्यापीठात प्रथम श्रेणीत पहिल्या आल्या होत्या. त्यातून बटूंड रसेल वगैरे मंडळींच्यावर त्यांनी मराठीत पुस्तके लिहिलेली. वडील निवृत्त न्यायाधीश, बहिणीचे यजमान आय. सी. आय. सी. आय. बँकेचे चेअरमन त्यांचे नाव सुरेश नाडकर्णी, वहिनींनी लहानपणी कधी स्वयंपाकघर पाहिलेले नाही. पण एका घरात एकाच व्यक्तीने नोकरी करावी या दादांच्या मताला मान देत त्यांनी खूप काळ नोकरी केली नाही. मी आणि नरेंद्र खायला वाघ, पैजेने चपात्या खाणाऱ्या आमच्यासाठी दोन्ही वेळेला प्रत्येकी दह्य चपात्या लाटणाऱ्या वहिनींचा चेहरा समोर आला की, माझ्या आणि नरेंद्रच्या दोघांच्याही पोटातील भूक आज मरते. देवदत्तांची सर्व भावंडांशी फार छान मैत्री होती; पण खरी गट्टी किंवा अगदी गुळखोबरे होते ते फक्त 'श्री. अ.' यांच्याशी ! श्री. अ. म्हणजे प्रयोग परिवाराचे व्हेन्चरानंद. त्याचे नाव श्रीपाद, पण घरीदारी त्याला मुकुंद म्हणत. श्रीपाद या नावाने शाळेतील मुले चिडविण्याचा धोका आहे हे ज्ञान त्याला शाळेत जाण्यापूर्वीच आले. तो वयाच्या ७८व्या वर्षी आसाममधून शेतकऱ्यांच्या बरोबर हिंडताना विषारी डास चावून तडकाफडकी गेला, म्हणजे तो गेला तेव्हा दादा ८२ वर्षांचे असणार, पण त्या वयातही मुकुंद आणि दादा शाळेतून परत आलेले दोन भाऊ वर्गात आज आपण कोणते अवघड गणित सोडवले, कुणाची कशी चेष्टामस्करी केली, पुण्यातल्या एका प्रख्यात सार्वजनिक गणपतीसमोरची सत्यनारायणाची पूजा फर्ग्युसनचे प्राचार्य व त्यांची धर्मपत्नी यांनी घालावी अशी प्रथा असल्याचे देवदत्त दाभोळकरांना सांगण्यात आले. त्यांनी प्रथेचा आदर केला - मात्र पूजा हरिजन विद्यार्थ्याने मांडावी असा आग्रह दादांनी धरला व तो मंदिराने मान्य केला. कोणता नवा मित्र मिळविला हे जेवढ्या उत्साहाने सांगतात तशा उत्साहाने एकमेकांशी बोलत असत. आणि हे बोलणेसुद्धा तासन्तास, आणि भेट झाली नाही तर फोनवर हेच एवढ्या वेळेचे दळण! ते दोघे बोलावयास बसले की, मी आणि नरेंद्र अवाक् होऊन हसत असू. आणि केवळ आम्ही दोघे नव्हे, तर मुकुंदाची तीन मुलेदेखील हेच करत. मुकुंदाला 'जमनालाल बजाज पारितोषिक मिळाले, त्यावेळी दादाना झालेला आनंद अवर्णनीय होता. पण हेही काही खरे नव्हे. मुकुंदने कुठलाही नवा विचार किंवा प्रयोग सांगितला की, या आपल्या भावाला अजून 'नोबेल पारितोषिक' कसे मिळाले नाही असा आनंद व आश्चर्यमिश्रित भाव दादांच्या चेहऱ्यावर असे. आणि दादांनी आपल्याला एवढे मानलेय म्हणजे 'नोबेल पारितोषिक' किंवा जगातील कुठलेही पारितोषिक यापुढे फालतू आहे, ही ऐट मुकुंदाच्या चेहऱ्यावर! नरेंद्र व नरसिंह यांचा जसा 'शंकराचार्य-मंडनमी ' वाद असे, तसा वाद दादांशी फक्त माझा दुसरा भाऊ चारुदत्त घालत असे किंवा त्याला कुणालाही शिंगावर घ्यायलाच आवडायचे. आमच्या घरातील दादांच्या समोरचा वैचारिक ह्याकार कोणत्या टोकाला पोचत असे हे नीटपणे सांगायचे असेल तर चारुदत्त आणि मुकुंद यांचे उदाहरण देता येईल. चारुदत्तने वयाच्या चोविसाव्या वर्षी, १९५४ साली ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना 'महाराष्ट्रातील दुष्काळ व त्यावरील उपाययोजना' असे एक पुस्तक लिहिले होते, त्यावेळी ते प्राज्ञ पाठशाळेने प्रसिद्ध केले होते. महाराष्ट्रातील शेतीत 'उतरत्या नफ्याचा नियम' (Law of diminishing return) कार्यरत आहे, शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित न्याय्य भाव दिला तर महाराष्ट्रातील दुष्काळ लगेच संपेल हे त्याने शरद जोशींचे शेतकरी आंदोलन सुरू होण्याच्या २५ वर्षे आधी सांगितले होते! शेतकरी आंदोलन निवडक अंतर्नाद १९५