पान:निवडक अंतर्नाद.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमळी हसून म्हणायची, 'नाही, नाही, पडून गप्पा मारायला खरी मजा येते.' सुनंदा गेल्यावर ती नेहमी म्हणायची, सुनंदाला मी समजले होते, इतकी मी कुणाला कळलेच नव्हते. ' 'कळलं' हा तिचा खास उच्चार, कुणा आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या माणसाबाबत विषय असला, तरी तिचा शेरा, त्याला नं, आपला समाज कळ्ळाच नाही.' तोही शेरा तेवढ्यापुरताच. लोणचं लावून भात खाणं, म्हणजे तिच्या सुखाचा कळसच. साधा भात, पण ती थोडं काहीतरी लावून असा चवदार करायची की बस्स. तिच्या एकटीच्या संसारात सगळाच स्वयंपाक आटोपशीर असला, तरी तिच्या ह्यताला चव होती. एकदा तिने उमाताईंकडे 'कोळाचे पोहे' करून आम्हां सगळ्यांना खाऊ घातले. वेगळाच पदार्थ, चव म्हणाल तर अहाहाच! रास्ता पेठेतल्या खोलीत गेलं, की कधी त्या पांघरूण जोडून पांघरून घेत आणि वाचत बसलेल्या असत. मी म्हणालो, 'अहो, बाहेर कुठं थंडी आहे? त्यात आत्ता दुपारचे अकरा बारा वाजताहेत.' ती हसून म्हणाली, 'मला असं पांघरूण घेऊन वाचायला आवडतं.' नेहमी काही ना काही वाचत असे. बहुधा इंग्लिश पुस्तकं, साहित्यावर, कुठल्या पुस्तकावर किंवा लेखकावर आम्ही क्वचित बोलत असू. तरी गप्पा घमासान, बरं, आमच्यात समान धागा काय असावा, तर वरकरणी काही नाही. मला तिची कित्येक मतं पटायची नाहीत. आमचे लिहिण्याचे प्रकारही अलग अलगच, तरी आवडण्यासारखं भरपूर होतं. तिचा मनस्वी स्वभाव आवडायचा ती तिच्या साठीनंतर भेटली तरी ती कधी साडीत दिसली नाही. घरात घालायचे गाऊन मात्र तऱ्हेतऱ्हेचे. त्यावरून मी थट्टा करायचो. कधी ती टी-शर्ट पँटही घालायची, सुमित्रा - सुनीलने तिची प्रदीर्घ मुलाखत चित्रित केलीय, त्यात ती टी-शर्ट व पँटमध्ये दिसली. साहित्याच्या एवढ्या कल्पना उच्च अनेक आघाडीचे लेखक त्यांनी नापास केलेले. पण हिंदी सिनेमे फार आवडायचे. तेही कुठलेही. दुपारी जवळच्या अपोलो टॉकीजच्या बकाल शोला तिकीट काढताना पाहिलंय, अमिताभ बच्चन आवडता. त्याचा प्रत्येक सिनेमा जाऊन बघणार, पण त्यातही तिरपागडी अट अशी, की तो 'त्यांच्या' अपोलोला लागला असला तरच पाहायचा तसाच अलीकडचा आवडता लेखक हॅरी पॉटर, मराठी सीरियल पाहणं तिला आवडायचं. त्यावेळी कुणी आलं असलं, तरी सांगायची, 'मी आत जाते. माझी अमक्या सीरियलची वेळ झालीय.' उमाताईंकडे राहायला गेल्या, तरी तिथेही तेच. मला ती भेटली उतारवयात तिची अनेक आजारपणं चालू असायची प्रकृती तोळामासा, तिला मी कधी माझ्या मित्र डॉक्टरांकडे नेलंय, अगदी माझ्या स्कूटरवर मागे बसवून, तरी ती यायची. आधी कमलताई म्हणायचो, नंतर कधी कमळी म्हणू लागलो, ते कळलंच नाही. ती म्हणायची, 'अशोक (शहाणे) आणि तू या दोघांनाच 'कमळी' म्हणण्याचा अधिकार' दुर्गा भागवत त्यांचं आदरस्थान, कमळी म्हणायची, 'दुर्गाताईंना माझी काळजी म्हणायच्या, कमळे तुझं कसं होणार? रा. भा. पाटणकर आणि ती अहमदाबादला एकत्र शिकवायला होते. त्यांनी 'कमल देसाईंचे कथाविश्व' असं पुस्तकच लिहिलंय. रा. भा. म्हणजे केवढे विद्वान! त्यांच्या 'सौंदर्यमीमांसा' या पायाभूत ग्रंथास केवढी मान्यता मिळालेली! त्यांनी कमलताईंच्या लेखनावर असं लेखन करावं, हा केवढा बहुमान, पण कमळी तिच्या साहित्याविषयी चकार शब्द काढत नसे. कधीतरी तिची स्त्रीवादी म्हणा किंवा मनुष्य म्हणून रग मी पाहिलीय. लहानपण, तरुणपणाविषयी सांगत होती. म्हणाली, 'आम्ही बहिणी काळ्या होतो, म्हणून त्या सगळ्यांनी आम्हांला तुच्छ समजावं? काळं असणं हा काही गुन्हा आहे? का आम्हांला त्यावरून लोकांनी येचावं?' तिच्या बोलण्यात तिच्या दिवंगत थोरल्या बहिणीविषयी बरंच यायचं. त्यांच्या घराच्या खटल्याविषयी की वादाविषयी यायचं. कधी विषण्ण होऊन म्हणत असे, 'मला ना, आता मरायचं आहे' मी कारण विचारता, म्हणे, 'मला कंयळा आला आहे.' मी म्हणायचो, 'कंयळा जाईल. दिवस पालटू शकतात. तब्येत सुधारू शकते. पण त्यावर म्हणाली, 'आता जगावर भार देऊन कशाला जगायचं?' शेवटी विरूपाक्षांनी (कमळी त्यांना बिरुदा म्हणायची) त्यांना सांगितलं, 'आपण काही चॉइसनं या जगात आलो नव्हतो. जेव्हा निसर्गतः मृत्यू येईल, तेव्हा येऊ द्यावा. आपण त्यात ढवळाढवळ कशाला करायची?' त्यानंतर मग तिनं मरणाचा विषय काढला नाही. उलट जगण्याचा आनंद ती घेऊ लागली. सुमित्रा - सुनीलने 'कमलताई, एका सिनेमात काम करता का?" विचारलं, तर ती खो खो हसू लागली. सुमित्रा म्हणाली, 'या हसण्यासाठीच तुम्ही आमच्या फिल्ममध्ये यावं,' कमळी कोकणातल्या त्या गावी गेली आणि त्या तणावमुक्त घरात एक छान रमणारी, हसणारी म्हातारी तिनं रंगवली, रंगवली तरी कशाला म्हणा, ती आहे तश्शीच होती, अगदी कॅमेऱ्यासमोरही. तिच्या गोतावळ्यात द. ग. गोडसे होते. ते गेल्या पिढीचे मोठे चित्रकार, माझी काही वेळा गाठभेट झालेली. त्यांनी 'माणदेशी माणसं या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा अशा काही काढल्यात की बस्स. त्यांचं कमळीकडे जाणंयेणं, दोघं म्हातारे छान गप्पा मारत. मीही ऐकण्यासाठी सामील व्हायचो. एकदा मी कमळीला विचारलं, 'काय म्हणतोय तुझा बॉयफ्रेंड?' ती आश्चर्याने बघू लागताच मी म्हटलं, 'गोडसे.' तर ती जी हसत सुटली, की थांबेचना. एक प्रसंग आठवतोय. एकदा जी. एं, वर भरपूर टीका केली. पण जी. ए. गेले. पुण्यात गेले. मी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन आलो आणि कमळीकडे गेलो. ही बातमी सांगताच त्या अस्वस्थ झाल्या. आणि नंतर तर ओक्साबोक्सी रडू लागल्या. मला खूप आश्चर्य वाटलं. पुढे श्री. पु. भागवत पुण्यात आले. तेव्हा माझ्या स्कूटरवर मागे बसवून त्यांना कमळीकडे घेऊन गेलो. नंतर बाईंचा मूड पालटला. पहिल्यांदा माझ्याकडे आली, तेव्हा हॉलमध्ये तक्क्याला टेकून बसली. काही वेळानं म्हणाली, 'तुझ्या घरानं मला निवडक अंतर्नाद १९९