पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे.' म्हणालो, 'कमळे, तुला तो योग्य नवरा मिळेल, पण व्यासांचं काय होईल?' हशाच हशा. विरूपाक्ष म्हणाले, 'व्यास म्हणजे राख फासलेला, कित्येक महिने अंघोळ न केलेला, जटा न विंचरलेला असणार....' परत हशा. उमा- विरूपाक्ष संकोची. ते त्यांची थट्टा करायला मागे राहत. ती तर कसले बंधन नसलेली, पण तेही हळूहळू या कल्लोळात, थट्टा करण्यात, करून घेण्यात सामील होऊ लागले. 'क्या बोला!' म्हणून कमळी टाळीही देत असे. उमाताईंची कादंबरी मोठी असली, की दोन दोन दिवस वाचन चालायचं. त्यांच्याकडे दुपारचं जेवण झोप. परत वाचायला बसायचे. भैरप्पांनी महाभारतावर लिहिलेली 'पर्व' कादंबरी तिला अजिबात आवडली नाही. त्याला महाभारत कशाशी खातात, ते समजलं नाही. त्यानं लिहिताच कामा नये.' त्यांच्या संतापाला मी पंक्चर केलं. म्हणालो, 'तुझ्या व्यासाचं महाभारत म्हणून तुझी परवानगी घ्यायला हवी होती का?' त्यावर तसंच हसत सुटणं, एकदा त्यांच्याकडून आम्ही अस्तित्ववाद ऐकला होता. असेच दोन दिवस सलग. तेव्हा बोलणारी कमळी नेहमीची नव्हती. वेगळंच माणूस बोलतंय जसं. पुढे सांगलीहून त्या पुण्याला 'निळावंती' बंगल्यात राहायला आल्या. भावाचं निधन झालेलं. भाचा दिलीप आणि भाचेसून नंदू त्या घरात आणि भावाची पत्नी, त्यांना आम्ही वहिनी म्हणायचो. त्या कमळीपेक्षा वयानं थोड्या मोठ्या. त्या घराची आठवण जास्त करून माझ्या गाणं म्हणण्याची 'केव्हा तरी पहाटे दरवेळी म्हणवून घ्यायच्याच त्यांच्या वहिनीही येऊन बसायच्या. वहिनी शेवटच्या आजारी पडल्या, तेव्हाही खूण करून मला हेच गाणे म्हणायला लावलं. कमळीला गझल आवडायच्या. त्यात 'आवारगी' ची गझल फार आवडायची. 'इस दश्त मे इक शहर था, वो क्या हुआ, आवारगी ही ओळ त्यातली जास्त आवडती. या वाळवंटात एक शहर होतं, ते कुठं गेलं? म्हणायची, 'फार गूढ अर्थ आहे त्यात.' कधी 'अब के हम बिछडे..' ची फर्माईश... तर कधी 'रंजिशी' ची. मला म्हणायची, 'तू गाण्याकडे जास्त लक्ष पुरवायला हवं होतंस. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आमच्यावर अन्याय केला आहेस.' मी म्हटलं, 'बरोबर, मी एक गायक झालो असतो. मग मी लिहिलं नसतं, ते चाललं असतं?' ती निरुत्तर, पण परत पुढच्या वेळी तेच वाक्य. एकदा तिने एक गझल कशी म्हणायची असते, त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. कुठल्या शब्दावर भर पाहिजे, कुठं गॅप घेतली पाहिजे, वगैरे, मी अलीकडे शास्त्रीय रागांच्या चिजा शिकत होतो. मग काय, शिकलो की, पहिलं प्रात्यक्षिक कमळीपुढं. कमळी माझी दोस्त कशी झाली? तिचा तिरपागडेपणा माझ्यात नावालाही नाही. मी सरळ सगळ्यांसारखा विचार करणारा, सगळ्यांच्या भाषेत सगळ्यांना समजेल असं बोलणारा, लिहिणारा, ती ज्या प्रकारची लेखिका, त्यातला मी नव्हतो. ती गावांशी, घरांशी, घरातल्या वस्तूंशी बोलणारी. मला तो वेडपटपणा वाटायचा. तिला म्हणायचो, 'तुला सायकियाट्रिस्टकडे नेलं पाहिजे, पण नको, तोही वेडा होईल. म्हणायला लागेल, हा पेन आत्ताच म्हणत होता, पण तेवढ्यात हा स्टेथो मधेच बडबडला. ' कमळी हसून बेजार उत्सुकतेने म्हणाली, 'मग पुढं ? स्टेथोला काय म्हणायचं होतं?' थट्टा करता करता मला त्याची कधी बाधा झाली कळलंच नाही. फिरायला जायचो, तिथली झाडं बोलू लागली. जंगलातल्या वाटा बोलू लागल्या. एवढंच काय, डोक्यावरचा पंखा, दारापासच्या चपला बोलू लागल्या. मग त्यातनं गोष्टी लिहू लागलो. काही वेळा तर असं झालं, लेख लिहायला घेतला असह्य परिस्थितीतून ज्या व्यक्तीला पुढं जायला वाटच नाही, अशी अशक्य परिस्थिती तिथं लगेच ही कमळीची फँटसी आली. तिनं एक काय, अनेक रस्ते दाखवले. मी आनंद (नाडकर्णी) ला म्हणालो, 'हे सगळे माझ्याशी बोलतात, हे जेव्हा खरं वाटू लागेल, तेव्हा मी तुझ्याकडे ट्रीटमेंटला येईन.' कमळीच्या रस्त्याने जाऊ लागलो, तसं मला या विविध वस्तूंना, जीवांना काही अस्तित्व आहे, असं जाणवू लागलं. •आपल्यासाठी झिजणाऱ्या चपला, या जुन्या झाल्या की नव्या घ्यायच्या, या फेकून द्यायच्या, हाच माझा खाक्या. आता मला चपलांविषयी अगत्य वाटू लागलं, कृतज्ञतेने मन भरून आलं. कमळीच्या पागलपणात सामील झाल्याने हे मला मिळालेलं धन, 'थ्रो अवे' संस्कृतीपासून दूर होतोच. पण आता याच पागलपणाने वेगळी मजा आणली, तसंच लालित्यही. अगदी रास्ता पेठेतल्या घरात तिचा माझा एक करार ठरला होता. दोघांनी एकमेकांवर जिवंत असेतो लिहायचं नाही. मी आधी गेलो, तर तिनं लिहायचं, आणि ती आधी गेली, तर मी तरी करार मोडून ती यावर कादंबरी लिहिणार होती, ते मागं पडलं, मग लेख लिहिणार होती. आता सगळंच संपलं. मी अगदी जिवावर आल्यासारखं लिहायला घेतलं. दोन तीन पानं लिहिली. ते जमेना म्हणून पानं फेकून दिली. परत एकदा तस्संच झालं. मग मी कमळीला म्हणालो, 'तू आता 'गेली' आहेस ना, मग मला ठरल्याप्रमाणे लिहू का देत नाहीस? आता गडचिरोलीला आलो. निवांत घर, शांत वातावरण, सगळे आपापल्या कामावर गेलेले. तेव्हा कमळी पेनातून आली आणि पेपरावर उतरतच गेली. कमळे, मी करार पूर्ण केला आहे आता मी जाईन, तेव्हा तू लिहायचं कशावर लिहिशील? आभाळावर ढगांच्या पेनने? की समुद्रावर वाऱ्याच्या लेखणीने ? की कुरणांवर झाडाच्या पेन्सिलीने ? आणि म्हणू नकोस, की हा निरोप 'कळ्ळाच' नाही! (दिवाळी २०११) निवडक अंतर्नाद २०१