पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुलंबद्दलचा दुसरा किस्सा ! 'तीन पैशाचा तमाशा' या सर्वार्थाने धेडगुजरी प्रहसनावर शिरीष सहस्रबुद्धेने त्याचा पार धुव्वा उडवणारा लेख लिहिला. ('निवडक माणूस मध्ये आहे.) तेव्हाही पुलंचा तुम्हांला फोन आला आणि पुन्हा एकदा 'हा कोण आहे, त्याला काही गोष्टी समजल्या नाहीत, मला फोन करायला सांग असा पुलंनी तुमच्याकडे फोन केला. शिरीषला असा निरोप देऊन काही उपयोग नव्हताच, म्हणून तुम्ही त्याला 'माणूस'मध्ये युक्तीप्रयुक्तीने धरून आणलंत, शिऱ्याने फोन केला. लँडलाइनवर बराच काळ फोन चालला. आपण सगळे ऐकत होतो. शिरीष पुलंचा एकही मुद्दा मान्य करीत नाही हे कळतच होतं. शेवटी रदबदलीच्या सुरात पुल त्याला म्हणाले, 'पण या मुद्द्यांचा विचार करून तू पुन्हा एकदा प्रयोग पाहा'. शिऱ्याने बेधडक सांगितलं, 'हे नाटक पुन्हा पाहणं केवळ अशक्य आहे आणि फोन कट केला. आता तुम्ही काय म्हणणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. तुम्ही म्हणालात, 'तुम्ही पोरं मला आयुष्यातनं उठवणार आहात. आता त्या पुलची समजूत घालणं आलंच!' पण एका अक्षराने शिरीषला रागावला नाहीत! व्वा! अस्वस्थ, तरुण, टवटवीत लेखकाचा ताजेपणा, उत्साह जपला पाहिजे हे तुमचं ब्रीदच होतं. अशा लेखकाने स्वतः विषय निवडला आणि त्याच्या लिहिण्यात वाचनीयता असली, की त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं, ही एक पद्धत; तर लेखनगुण असलेल्याला विषय शोधून लिहायला सांगणं, दौऱ्यावर पाठवून त्याच्याकडून वार्तापत्र / वृत्तांत लिहून घेणं ही दुसरी मी या दोन्हींमधून गेलो. मन्सूर, मर्ढेकर हे विषय मी स्वत: निवडलेले होते पण केरळचा दौरा करून (सतीश कामतबरोबर) 'कुरुक्षेत्र केरळ' ही तिथल्या रा. स्व. संघ आणि कम्युनिस्ट यांच्या हिंसक संघर्षावरची लेखमाला लिहिली ती तुमच्या सांगण्यावरून! 'जनांचा प्रवाहो ची जन्मकथा अजून वेगळी आहे. जानेवारी ७७मध्ये आणीबाणी शिथिल करून लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. फेब्रुवारीमध्ये आपण 'माणूस' चा जनविराट अंक काढून जनता पक्ष या राजकीय प्रयोगाला काही तात्त्विक खाद्य पुरवायचा प्रयत्न केला, या अंकातला सगळ्यात मोठा लेख राम बापट यांचा संघावरचा तो मिळवण्याचं सगळ्यात दुष्कर कर्म माझ्या वाट्याला आलं होतं! या अंकात मी माझ्या तुरुंगवासावर एक बऱ्यापैकी मोठा लेख लिहिला होता. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस भुईसपाट होऊन राजकीय भूकंप होणार याचा अंदाज लेख लिहिताना आला नव्हता. त्यामुळे 'आपली खरी जागा कुठे आहे, बाहेर की आत? असं त्या लेखाचं संभ्रम व्यक्त करणारं नाव ह्येतं 'जनांचा प्रवाहो' अजून 'चालिला' नव्हता. त्या लेखाचं स्वागत झालं. प्रा. स. शि. भाव्यांनी खूप कौतुक केलं व पुस्तकाची रूपरेषा त्यांच्या माझ्या बोलण्यातून तयार झाली. यातलं काहीच तुम्हाला माहीत नव्हतं. १९७७च्या १५ ऑगस्टला एक विशेषांक काढावा आणि जनता पक्षातल्या उतावळ्या, अर्ध्या- कच्च्या मडक्यांना त्यांच्यावरच्या ऐतिहासिक जबाबदारीची जाणीव करून द्यावी - कारण एव्हापर्यंत अंतर्गत लाथाळ्यांना सुरुवात झाली होती अशी कल्पना सुचल्यावर 'तू या २१४ निवडक अंतर्नाद अंकासाठी काय लिहिणार?' असं तुम्ही विचारलंत, मी लिहायला बसलो ते प्रा. भाव्यांची रूपरेषा डोक्यात ठेवून, आणि पुस्तकच तयार झालं! ४ - विषय आणि लेखक यांची पत्रिका जुळते आहे अशी खात्री वाटली, की तुम्ही त्या लेखकाला फारशा अटी घालत नव्हता, सल्लामसलतही त्याला हवी असेल तरच होत असे. पहिला खर्डा - मग चर्चा - मग पुनर्लेखन असा घोळ घालण्यात तुम्हांला स्वारस्य नसे. त्यामुळे कायम एक दीर्घ अभ्यासपूर्ण लेखमाला चालू आणि त्याचवेळी समकालीन विषयांवरचा अभ्यासपूर्ण वृत्तांतवजा ताजा मजकूर हे 'माणूस' च्या कोणत्याही अंकाचे दोन हे मुख्य वादी - संवादी असत. लेखकाच्या कामात फार ढवळाढवळ न केल्यामुळे काही लेखमाला जरा लांबल्या, काही जडजंबालही झाल्या पण त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं नव्हतं; त्यांची पुस्तकं झाली होती व निदान एक आवृत्ती संपली होती. एकदा मात्र तुम्ही चांगलेच कात्रीत सापडला होता. कॉम्रेड शरद पाटील यांची 'दासशूद्रांची गुलामगिरी' ही लेखमाला 'माणूस' मध्ये येत होती. विषय महत्त्वाचा, मोठ्या आवाक्याचा, लेखक भरपूर अभ्यास करून लिहिणारा, शिवाय प्रत्यक्ष कार्यकर्ता, सत्यशोधक मार्क्सवादी पक्षाचा संस्थापक. त्यामुळे लेखमाला 'माणूस' मध्ये येण्यात अनेक प्रकारचं औचित्य साधलं जात होतं. पण कॉ पाटलांच्या जडजंबाल शैलीमुळे वाचक दमले. कॉ. पाटील यांचं भाषण/व्याख्यान असो की लेख/पुस्तक असो; भाषा पूर्णपणे जड, ग्रांथिक, पारिभाषिक; वाक्ये मोठमोठी पल्लेदार आणि एकूणच विस्तारावर त्यांचा भर; त्यामुळे श्रोते/वाचक एकीकडे अचंबित व्हायचे तर दुसरीकडे बधिरही होऊन जायचे. एकदा मी 'माणूस' मध्ये आलो तर तुम्ही कपाळाला हात लावून बसला होता. १० / १२ पत्रं तुमच्यासमोर होती आणि सगळ्या पत्रांतून एकच धोशा होता – 'कॉ. पाटलांचा अभ्यास आणि अधिकार आम्हांला मान्य आहे; पण त्यांनी जरा सोप्या शब्दांत लिहिलं तर आम्हांला ते कळेल!' 'पाटलाच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची' ही तुमची विवंचना! मी म्हटलं, 'तुम्ही ही सगळी पत्रं त्यांच्याकडे पाठवून द्या, स्वतः मध्ये पडूच नका.' तुम्हांला जरा हायसं वाटलं, मग ते सगळं बाड रजिस्टर्ड पोस्टाने धुळे मुक्कामी पाठवण्यात आलं; त्या काळात कुरिअर्स नव्हते, फोनही जेमतेम चालू असत. महिनाभर शांततेत गेला. मधल्या काळात लेखमाला चालूच होती. एक दिवस तुमचा SOS आला. 'ताबडतोब भेट!' मी दुपारी चार वाजताच हजर झालो. 'तुझं ऐकलं आणि बघ काय झालं!' म्हणत तुम्ही माझ्या हातात कॉ. पाटलांचं पत्र ठेवलंत, त्यांनी बाणेदारपणे लिहिलं होतं, 'महत्त्वाच्या आणि गहन विषयावर सोप्या भाषेत लिहिता येतं या भ्रमात कोणी राहू नये... खरं म्हणजे मी अजून या विषयाच्या गहन भागात शिरलेलोच नाही. शिरेन तेव्हा वाचकांची खरी कसोटी लागेल!' आपले डावपेच असे उलटतील याची मुळीच अटकळ नव्हती. पण अजून एक मार्ग होताच. आता ही सगळी पत्रं आणि कॉ. पाटलांचं उत्तर दोन्ही एका अंकात छापून यकू आणि शेवटी