पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घरचा प्रेस असला तरी व्यावहारिक गणित उत्तरोत्तर अवघडच होणार हे स्पष्ट होतं. निरनिराळ्या बिलांचे तगादे, पुस्तकाच्या मानधनासाठी लेखकांचे तगादे लेखक प्रकाशकाला बहुधा दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी पत्र पाठवीत नसावेत; पुस्तकविक्रेत्यांकडून पैसे येण्याला लागणारा वेळ, थकलेली बिलं वसूल करण्याची धावपळ, वेळ / शक्तीचा अपव्यय यांनी तुम्ही कायमच घेरलेले असायचा. मला अजूनही एक अंदाज करावासा वाटतो. सतत नवीन विषय आणि लेखकांच्या शोधात असल्यामुळे तुमचा जुन्या लेखकांशी- ज्यांची एकदोन पुस्तकं मार्गी लागलेली असत - फारसा संवाद उरत नसे. त्यांच्या पुस्तकांची विक्री, प्रतींची संख्या, इतर खर्च वजा जाता उरणारं निव्वळ मानधन हे सगळं त्यांनी ऑफिसमधल्या कारकुनांशी बोलावं अशी तुमची अपेक्षा होती, पण लेखकांना ती रणनीती वाटत असावी. ते तुमचा पिच्छा सोडत नसत. नावडत्या बायकोच्या बिमारीने (abused wife syndrome) पछाडलेल्या काही लेखकांची पत्रं तुम्ही मला वाचायला दिली होती. शिवाय एक पुस्तक यशस्वी झालं की लगेच दुसरंही लिहायचं आणि प्रकाशकाने ते पहिल्याइतक्याच उत्साहानं काढावं अशी अपेक्षा नसणारे लेखक (मराठीत तरी) दुर्मिळच होते. मी त्यांच्यापैकी नव्हतो - एक पुस्तक लिहिलं हेच माझ्यासाठी आश्चर्य होतं. 'जनांचा प्रवाहो' च्या पहिल्या आवृत्तीचे हिशोब करताना आपल्यातही तणाव निर्माण झाला होता. कारण "तुझ्या नव्या पुस्तकाची घोषणा करू, प्रकाशनपूर्व सवलतही देऊ आणि त्याच योजनेमध्ये 'जनांचा प्रवाहो' ची दुसरी आवृत्ती काढू अशी तुमची ऑफर होती. मला ते शक्य नव्हतं आणि जे काही मानधन असेल ते लगेच मिळण्याची निकड होती. आणि मी तुम्हाला फसवलं नाही. माझं दुसरं पुस्तक १९ वर्षांनी तुम्ही गेल्यावर १९९७ मध्ये प्रकाशित झालं! मात्र मला मुळातच तुम्ही माझ्यासाठी निश्चित केलेली भूमिका पटत नव्हती. मला सामाजिक जाणीव असलेला अस्वस्थ बुद्धिजीवी व्हायचं नव्हतं; आणीबाणीच्या विरोधात संघर्ष करून खरा उतरल्यामुळे माझ्या स्वतःविषयीच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परिवर्तनाच्या गोष्टी सांगेन युक्तीच्या चार मध्ये मला स्वारस्य उरलं नव्हतं. 'गड्या, आपल्याला दादही मिळाली होती. मग पुढचे काही दिवस 'माणूस'चं हस्तांतरण करता येईल का, या चर्चा झाल्या. संभाव्य संपादकांमध्ये माझं नाव होतंच. तेव्हा मी इंडियन एक्सप्रेसमध्ये होतो. पुन्हा एकदा अरुण साधूंप्रमाणे एक्सप्रेस सोडून कुणीतरी 'माणूस' मध्ये यायची शक्यता मोहक होती; पण मी पक्का जमिनीवर चालणारा असल्यामुळे आर्थिक जबाबदारीचं गणित सुटेना; माझं नाव मागे पडलं! त्यातच तुमचा स्वप्नज्वर पुन्हा उफाळून आला. डोळे चमकायला लागले आणि तुम्ही नवं स्वप्न मांडलंत - 'गड्या, 'माणूस हा विषयच तुझ्या माझ्यात नको, पंचवीस वर्षे झालीत; मलाही आता कंटाळा आला आहे तू आता इंग्रजीत चांगला स्थिरावला आहेस आणि तुझ्यासारखा मोहरा मराठीत खर्ची घालावा हे मला पटत नाही. आपण दोघे सातपुड्यामधला आदिवासी पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गीय घरांच्या टीपॉयवरती नेऊन ठेवायचा आहे,' हे तुमचं आमंत्रण म्हणजे मला मोठी संधी वाटली नव्हती. तुम्ही मला पूर्णपणे ओळखलं नव्हतं अशी शंका आली होती. - हे सगळं घडत होतं त्याच्याही आधीच तुम्ही 'माणूस' चा पसारा आवरता घ्यावा या विचारात होता हे दिलीपरावांनी तुमच्यावर लिहिलं (समांतर : महाराष्ट्र टाइम्स वार्षिक १९९७) तेव्हा कळलं. जर आधी माहीत असतं तर मी तगादा लावला नसता. अर्थात आपण दोघेही ते ताणतणाव विसरून गेलो आणि 'माणूस'च्या रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमात पुन्हा सगळे एकत्र आलो. माझ्या भाषणात मी 'माणूस' चं वर्णन 'आमचं वैचारिक दंगामस्ती करण्याचं क्रीडांगण' असं केलं. त्याला २१६ • निवडक अंतर्नाद मिळून एक इंग्रजी बुलेटिन काढू स्वबळावर! जे काम 'माणूस' ने महाराष्ट्र पातळीवर केलं ते आता देशपातळीवर करू या! एवढे पंधरा दिवस जाऊ देत. सध्याची माझी गडबड संपली की भेटू या!' त्या मी सावध होतो प्रोजेक्टबद्दल मी कधीच तुम्हांला भेटलो नाही. इथून पुढे 'माणूस' च्या युवक- युवती विशेषांकासाठी एक लेख लिहिला तेवढाच ! आपण हट्टीपणा करून इंग्रजी बुलेटिन काढलं असतं तर ते इंग्रजीमधल्या बेदरकार स्पर्धेसमोर टिकलंच नसतं आणि ए. डी, गोरवालांच्या 'ओपिनियन पेक्षाही त्याची अवस्था केविलवाणी झाली असती. मात्र मला मुळातच तुम्ही माझ्यासाठी निश्चित केलेली भूमिका पटत नव्हती. मला सामाजिक जाणीव असलेला अस्वस्थ बुद्धिजीवी व्हायचं नव्हतं; आणीबाणीच्या विरोधात संघर्ष करून उतरल्यामुळे माझ्या स्वतः विषयीच्या अपेक्षा वाढल्या होत्या. खरा - परिवर्तनाच्या गोष्टी सांगेन युक्तीच्या चार मध्ये मला स्वारस्य उरलं नव्हतं. 'गड्या, आपल्याला सातपुड्यामधला आदिवासी पुण्या-मुंबईच्या मध्यमवर्गीय घरांच्या टीपॉयवरती नेऊन ठेवायचा आहे,' हे तुमचं आमंत्रण म्हणजे मला मोठी संधी वाटली नव्हती. तुम्ही मला पूर्णपणे ओळखलं नव्हतं अशी शंका आली होती. ज्ञानप्रबोधिनीच्या 'अभ्यास देशस्थितीचा समतोल चालो मधून पडून त्या मैदानात उतरल्यावरही तुम्ही मला परत एकदा जनआंदोलनाच्या वार्तांकनाचं काम सांगत होता. खरं म्हणजे शेतकरी संघटनेकडे तुम्हीच माझं लक्ष वेधलं होतं. मात्र तुमची इंग्रजीची ऑफर नाकारून मी संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झालो तेव्हा तुम्ही एका शब्दानेदेखील प्रतिक्रिया दिली नव्हती. 'शरद जोशी नुसता रान पेटवत जाणारा माणूस आहे त्याच्या ह्यतून