पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्येष्ठ क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा वर्षा काळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य लोकांनी अपरिमित कष्ट घेतले, हालअपेष्टा भोगल्या, पण त्या मानाने त्यांतील बरीच मंडळी दुर्लक्षितच राहिली. अनेकांची नावेही आपल्याला ठाऊक नसतात. मूळ गुजरातमधले पण पुढे युरोपात वास्तव्य केलेले कायदेपंडित श्यामजी कृष्ण वर्मा त्यांच्यातलेच एक. गेली काही वर्षं कच्छमधल्या रणोत्सवला जायचं म्हणून घोकत होते. शेवटी एकदाचा तो योग यंदाच्या जानेवारीत आला, रणोत्सवाला जोडून अहमदाबादचा पतंगोत्सव बघायचा बेत आखला. पुण्याहून जाणारा आमचा पंधरा जणांचा गट होता. पुणे ते अहमदाबाद विमानप्रवास, मग अहमदाबाद ते भूज आगगाडीचा सहा तासांचा प्रवास व त्यापुढे कच्छच्या रणात जाण्यासाठी आणखी दोन तासांचा बसप्रवास, २००५ सालापासून गुजरात सरकारने कच्छच्या रणाला प्रवासी ठिकाण बनवलं उत्तम जाहिराती केल्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा हा रणोत्सव असतो. आता तर 'रणोत्सव सिटी' म्हणून एक शहरच या कालावधीपुरतं सरकारतर्फे वसवलं जातं. तंबूंचं शहर. पण आधुनिक सोयींसह अगदी कमोडसकट, शिवाय खासगी हॉटेल मालकांचा धंदासुद्धा अगदी तेजीत असतो. कच्छचं रण हा एक डोळे दिपवणारा चमत्कार आहे. संपूर्ण घट्ट मिठाचं अफाट वाळवंट अगदी आपल्या खडे मिठासारखं मीठ सर्वत्र पसरलेलं. पांढऱ्या रंगाचं, ह्या रणाचा विस्तार तब्बल साडेसात हजार चौरस किलोमीटर इतका आहे. दोन दिवस रणात घालवून भूजकडे निघालो. वाटेत मांडवी नावाचं एक गाव लागलं. तिथल्या 'क्रांतितीर्थ' नावाच्या ठिकाणाला भेट द्यायचं सहल नियोजकाने ठरवलं होतं. 'इथे बघण्यासारखं काय आहे?' अशी चौकशी केल्यावर 'इथे श्यामजी कृष्ण वर्मा नावाच्या क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिकाचं स्मारक आहे,' असं सांगितलं गेलं. आता 'हे कोण वर्मा ?' हा प्रश्न आमच्यापैकी सगळ्यांच्याच डोक्यात भणभणायला लागला. तेवढ्यात बस क्रांतितीर्थच्या आवारात शिरलीसुद्धा हा ५२ एकरांचा स्वच्छ, सुंदर परिसर आहे २०१० साली ही वास्तू उभारली गेली. लंडनमधील इंडिया हाउस या प्रख्यात वास्तूची प्रतिकृती इथे बांधली आहे. मांडवी हे वर्मांचं मूळ गाव. त्यांचा आणि त्यांच्या पत्नी भानुमती यांचा अस्थिकलश इथे ठेवलेला आहे. त्या दोघांचे पुतळेही आहेत. आत शिरताच आमचं आपुलकीनं स्वागत केलं गेलं. सगळ्यांना एका सभागृहात बसवून एक साधारण अर्ध्या तासाचा अनुबोधपट दाखवला गेला. नंतर सगळा परिसरही फिरून बघितला. त्यावरून श्यामजी कृष्ण वर्मा ह्या आद्य क्रांतिकारकाची थोरवी आम्हांला पटली व भावली. ह्या एवढ्या थोर व्यक्तीचं नावसुद्धा आपल्याला माहीत नसावं ह्याचा विषाद वाटला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य लोकांनी अपरिमित कष्ट घेतले, हालअपेष्टा भोगल्या, पण त्या मानाने त्यांतील बरीच मंडळी दुर्लक्षितच राहिली. अनेकांची नावंही आपल्याला ठाऊक नसतात. श्यामजी कृष्ण वर्मा त्यांच्यातलेच एक. त्यांचा जन्म मांडवीमध्ये ४ ऑक्टोबर १८५७ रोजी झाला. माध्यमिक शिक्षण भूजमध्ये झालं व पुढील शिक्षण मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये झालं. १८७५ मध्ये त्यांचं लान भानुमती यांच्याशी झालं. यानंतर ते आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांच्या संपर्कात आले. त्यांचा फार मोठा प्रभाव वर्मांवर पडला, वैदिक तत्त्वज्ञान व धर्म यांवर ते व्याख्यानंही देऊ लागले. ती इतकी लोकप्रिय झाली, की १८७७मध्ये काशीच्या पंडितांनी त्यांना 'पंडित' ही उपाधी बहाल केली. ही उपाधी मिळवणारे ते पहिले अब्राहमण ठरले. त्यांनी संस्कृतवर खूप प्रभुत्व मिळवलं व त्यामुळेच त्यांचा मोनीएर विलियम्स या ऑक्सफर्डमधील संस्कृतच्या प्राध्यापकांशी संबंध आला. प्रोफेसर विलियम्स यांनी त्यांना आपला मदतनीस म्हणून बोलावलं व त्यानुसार श्यामजी इंग्लंडला गेले. त्यांचं पदवीपर्यंतचं व पुढील वकिलीचं शिक्षण ऑक्सफर्ड येथील बालीमोल (Ballimol) कॉलेज इथे झालं. इंग्लंडचे दोन भूतपूर्व पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन आणि एडवर्ड हीथ हे याच कॉलेजचे विद्यार्थी बॅरिस्टर बनल्यानंतर श्यामजी भारतात परतले व इथे वकिली करू लागले. जुनागढसारख्या कच्छमधील काही संस्थानांचे दिवाण म्हणूनही त्यांनी काम केलं. पण भारतीय स्वातंत्र्यासाठी इंग्लंडमध्ये जाऊन प्रयत्न करायला हवा, कारण निवडक अंतर्नाद २२९