पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फार पार्श्वभूमीवर निश्चितच हे यश त्यांना कुठेतरी सुखावणारं होतं. तथापि यादवांच्या आयुष्यातील हा कालखंड मनस्तापजनक आणि दुःखद असा होता. त्यांच्या मागे लागलेलं हे दुष्टचक्र केवळ एवढ्यावरच थांबलं नव्हतं. त्यांना त्याच्या झळा लागतच होत्या. तुकारामाच्या संदर्भातली त्यांच्याविरुद्धची फिर्याद वारकऱ्यांनी हायकोर्टात सादर केली होती. कोर्टाचा निकाल लेखक आनंद यादव आणि प्रकाशक अनिल मेहता यांच्या विरोधात लागला. बाजारात असलेल्या सर्व प्रती मागे बोलावून त्या नष्ट करण्याचे आदेश देऊन आणि वैयक्तिक दंड आकारून हा वाद कोर्टानेच कायमचा मिटवला. गंमत म्हणजे याबद्दल मराठी साहित्यविश्वात कुठल्याही प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. एखाद्या माणसाच्यामागे त्याचे वैरी किती अमानुषपणे लागू शकतात, त्याचं अख्खं जगणंच कसं उद्ध्वस्त करून टाकतात, आपल्या छोट्या छोट्या स्वार्थासाठी अकारण कोण कुणाचा वैरी होऊ शकतो, हे यादवांच्या या उदाहरणावरून पाहिलं, की माणुसकीवरील विश्वासच उडून जातो. वैचारिक मतभेदही किती वैयक्तिक पातळीवर जाऊ शकतात आणि ते माणसाच्या जगण्याशी जोडून किती निर्दयपणे माणसांचे मुडदे पाडू शकतात, हे पाहिल्यानंतर भूमिका घेऊन लिहिणाऱ्या लेखकाने कुणाच्या आधाराने उभे राहावे हा प्रश्न पडतोच. मराठीत भूमिका घेऊन लिहिणाऱ्या लेखकांची वानवा आहे अशी मल्लीनाथी करणाऱ्यांनी हा विचार करायचीही गरज आहे असं यावरून वाटतं. न्यायालयाच्या निर्णयाने यादव अक्षरशः खचल्यासारखे झाले होते. त्यांची लेखनाची उमेद जवळजवळ संपली होती. साहित्यक्षेत्रापासून त्यांनी स्वतःला तोडून घेतलं होतं. या अशा कटु (पान २३८ वरून) आप्पांच्या शेवटच्या काही दिवसांच्या आठवणी फार क्लेशदायक आहेत. त्यांचा देह फार थकला होता. डोळ्यांना सतत गॉगल लावावा लागे. एकेकाळी तेजस्वी, दिमाखदार दिसणारा चेहरा आता अशक्त खंगलेला दिसत होता. ताई सतत त्यांच्यासोबत असायची. पण त्यांचं बाहेर जाणं जवळजवळ थांबलंच होतं. लेखन मात्र जिवाचा आटापिय करून चालू होतं. तो तर त्यांचा श्वासच होता. पण आपल्या मागे ताईचं कसं होईल ही काळजी त्यांना मागे ओढत होती. आपल्याला कोणी किती पैसे देणं आहे आणि ताईला किती पैसे चरितार्थसाठी लागतील ह्याची अनेक गणितं त्यांच्या दैनंदिनीत मांडलेली मी पाहिली आहेत. वाईट ह्याचं वाटतं, की त्यांच्या ह्या संधिप्रकाशातल्या प्रवासात मी त्यांच्याबरोबर नव्हते, तीन मुली वाढवताना आणि नवऱ्याबरोबर गृहकर्तव्यं सांभाळताना त्यांच्यापासून खूप दूर राहावं लागलं होतं. माझी काळजी आणि प्रेम पत्राद्वारे त्यांच्यापर्यंत पोचवणं एवढंच माझ्या हातात होतं.... १९७८च्या एप्रिल महिन्यात विजयला मुलगा झाला. त्याचं बारसं थाटामाटात साजरं अनुभवांनी माणूस आणखी कुठल्या निर्णयाला येणार ? मधली चार-पाच वर्षं आमच्या भेटीविनाच गेली. पुण्याला तसं माझं वारंवार जाणं व्हायचं. पण त्यांच्याकडे जाणं होत नव्हतं. त्यातलं एक प्रमुख कारण त्यांचं शहरापासून दूर असलेलं वास्तव्य. पण मधूनमधून फोन व्हायचे. तेव्हा ते आवर्जून 'घरी या म्हणून निमंत्रण द्यायचे. लेखनाविषयीची चौकशी करायचे. 'तुमचं सध्या छान चाललं आहे म्हणून समाधानही व्यक्त करायचे. अशातच त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी उद्भवू लागल्या. मधूनमधून त्यांच्या कीर्ती या धाकट्या लेकीशी बोलणं व्हायचं. तिच्याकडूनही त्यांच्याविषयीची हालहवाल कळायची. 'अक्षरपेरणी' चे संपादक बाळासाहेब धोंगडे मध्यंतरी भेटले, तेव्हा त्यांच्याकडूनही समाचार कळला. तो हाच की अलीकडे यादवांची प्रकृती बरी नसते. त्यांच्या निधनाच्या तीन दिवस आधीच मी पुण्याला जाऊन आलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे जायचाही विचार मनात आला. पण कुठल्या तरी कारणाने तेव्हाही जाणं टळलंच. आणि अचानक व्हॉट्सअपवर त्यांच्या निधनाची वार्ता आली. आपल्या वाढदिवसाच्या तीन दिवस आधी, २७ नोव्हेंबरला, ते या जगातून निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी मी कीर्तीला फोन लावला, तेव्हा तिच्याकडून सगळं कळलं. त्यांची माझी भेट झाली नाही याचं शल्य मनात कायमच घर करून राहणार आहे. आणि त्याहीपेक्षा आपली ही तथाकथित व्यवस्था एखाद्या प्रतिभावंताला कशी संपवणारी आहे हे पाहिल्यावर होणारं दुःख यादवांच्या जाण्यापेक्षाही खूप मोठं आहे. (दिवाळी २०१७) झालं. तेव्हा आम्ही महिनाभराच्या रजेवर घरी आलो होतो, तेव्हा मी आप्पा ताईंबरोबर मनसोक्त राहिले. रोज संध्याकाळी आम्ही गच्चीवर खुर्च्या यकून बसत असू. ते थोडसं चालत आणि मग गुलमोहराच्या बहराच्या लाल हिरव्या छायेत ठेवलेल्या आरामखुर्चीवर बसून कसलासा विचार करीत राहात. मी आणि ताई जिवाभावाच्या गप्पा करीत असू. त्यांना ऐकू येत नसे. त्यामुळे त्यांच्याशी शाब्दिक संभाषण कमी होत असे. पण कधीकधी माझा हात हातात घेऊन ते गप्प बसून राहात. काही न बोलता त्यांचा तो स्पर्श त्यांची माया माझ्यापर्यंत पोचवीत असे. पती-पत्नीचं नातं असो, दोन मित्रांमधलं मैत्र असो किंवा वडील मुलीचं आयुष्यभराचं प्रेम असो, ते परिपक्व झालं, की संवादही निःशब्द होतो. आता तर आप्पा देहरूपानं ह्या जगात नाहीत. पण जेव्हा मला त्यांच्याशी बोलावसं वाटतं, त्यांना काही सांगावं विचारावं अशी हुरहुर लागते तेव्हा काळाची सगळी बंधनं ओलांडून मी त्यांच्याशी असाच निःशब्द संवाद साधते. (दिवाळी २०१७) निवडक अंतर्नाद २४५