पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गिरीश कार्नाड : एक विलक्षण स्वप्न उमा वि. कुलकर्णी भारतीय साहित्यिकाला दिला जाणारा, सर्वोच्च मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार आठ कन्नड साहित्यिकांना मिळालेला आहे. अन्य कुठल्याही भाषेपेक्षा जास्त. कुवेम्पू, द. रा. बेन्द्रे, शिवराम कारंथ, मस्ती वेंकटेश अय्यंगार, व्ही. कृ. गोकाक, गिरीश कार्नाड, यू. आर. अनंतमूर्ती आणि चंद्रशेखर कंबार, त्यातील एकाचे, कार्नाड यांचे ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र. मी आ गिरीश कार्नाडांचं साहित्य अनुवादित करण्यासाठी, त्यांच्याशी पत्रव्यवहार करायला गेलेच नसते. भेट घेणं तर दूरच राहिलं! पण हे घडलं! माझ्या दृष्टीनं तर ही कधीही न पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता! अनुवाद करायला सुरुवात करण्याआधीच मी कार्नाडांचं नाव विविध संदर्भात ऐकत होते, त्यांचे 'स्वामी', 'निशांत', 'रत्नदीप', 'सूरसंगम', यांसारखे अनेक चित्रपट आम्ही थिएटरला जाऊन मनापासून पाहिले होते. 'उंबरठा' ही त्याच उत्कंठेनं पाहिला होता. 'स्वामी' मधला साधा संयमी आणि सहनशील नायक भलताच आवडला होता. 'उंबरठा' मधला नायक तर त्यातल्या नायिकेपेक्षाही आमच्या मनात सहानुभूती मिळवून गेला होता! त्यांची 'एफटीआयआय' मधली कारकीर्द वेगवेगळ्या कारणांनी गाजत होती. त्याच्या बातम्याही पुण्यातल्या वृत्तपत्रांमध्ये गाजत होत्या. कार्नाडांचं 'हयवदन' हे विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक बालगंधर्व रंगमंदिरात अत्यंत भारावून जाऊन पाहिलं होतं. तसंच तेव्हा 'तुघलख' हे नाटकही गाजत होतं. ही नाटकं अनुवादित करण्यासाठी ख्यातनाम मराठी लेखक कवी चिं. त्र्यं. खानोलकरांनी आणि 'तुघलख साठी कार्नाडांइतकेच गाजत असलेले मराठीचे नाटककार विजय तेंडुलकर यांनी आपापल्या लेखण्या झिजवल्या होत्या! कार्नाड स्वतःच्या नाटकांचे स्वतःच इंग्लिश अनुवाद करत असल्यामुळे त्यांना आमच्यासारख्या अनुवादकांची गरजच नाही, अशी माझी भावना होती. त्यांच्या चित्रपटसृष्टीशी असलेल्या संपर्कामुळे त्यांची नाटकं सहजच भारतभर पोचत होती. अशा वेळी त्यांच्याशी संपर्क साधण्याचं धैर्य दाखवलं तरी आपल्या पदरात काहीच पडणार नाही, याची मला खात्रीच होती. ००० इतर कन्नड लेखकांच्या लेखनाचे अनुवाद करत असतानाच हैदराबादच्या द. पं. जोशींची ओळख झाली. दक्षिणेकडच्या 'पंच- द्रविड' (तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम् आणि मराठी) भाषांचा परामर्श घेत त्यांनी 'पंचधारा' हे त्रैमासिक चालवलं होतं. डॉ. द. दि. पुंडेंमुळे त्याची आम्हांला कल्पना होती. एका भेटीत जोशींनी २४६ निवडक अंतर्नाद प्रस्ताव मांडला. त्यांना एका अंकात गिरीश कार्नाडांचं एक भाषण अनुवादित करून घ्यायचं होतं. त्याच्याबरोबर त्या वेळी नव्यानं प्रकाशित झालेल्या 'नागमंडल' या नाटकाचा एक अंकही द्यावा असा त्यांचा मानस होता. ते काम त्यांनी माझ्याकडे सोपवलं. सगळं आपोआप घडलं होतं. त्या आधी मी कथा-कादंबऱ्या लेख अनुवादित केले असले तरी नाटक अनुवादित केलं नव्हतं. या नाटकाच्या अनुवादाला सुरुवात करत असतानाच एक दिवस एका उत्कृष्ट लखोट्यातून उत्तम कागदावर बोरूनं लिहिलं असावं अशा लफ्फेदार अक्षरात लिहिलेलं एक पत्र आमच्या पत्त्यावर आलं. नाव बघताच मी उडालेच ! स्वतः गिरीश कार्नाडांनी लिहिलेलं ते पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, ... तुम्ही माझ्या नाटकाचा अनुवाद करता आहात असं समजलं... मला मराठी येतं... त्यामुळे अनुवाद झाला की मला पाठवून द्या...' हेही माझ्या दृष्टीनं नवं होतं. लेखकानं आपण होऊन संपर्क साधला होता. तोही कार्नाडांसारख्या विविध क्षेत्रांत प्रसिद्धी पावलेल्या! दुसरं म्हणजे, त्याआधी मी अनुवादित केलेल्या कुठल्याही कन्नड लेखकाला मराठी येत नव्हतं. त्यामुळे अशी मागणी व्हायचा प्रश्नच नव्हता. (डॉ. शिवराम कारंतांच्या पत्नींना मराठी येत असल्यामुळे अनुवादाची परवानगी देताना त्यांनी दोन प्रकरणे मागून । घेतली होती, तेवढंच.) त्यामुळे मला एकाच वेळी दडपण आलं आणि त्याचबरोबर अनुवाद प्रक्रियेत आमच्याबरोबर कुणीतरी असल्याची भावनाही जाणवली. मी त्यांना खर्डा पाठवला. इतर मराठी माणसांप्रमाणे मी त्यांचं नाव 'कर्नाड' असं लिहिलं होतं. त्यांनी दुरुस्ती केली, 'मी माझ्या नावाचं स्पेलिंग कार्नाड असं करतो...' त्यानंतर मी त्यांची चार नाटकं, आत्मकथनं आणि इतर काही लेख अनुवादित केले. प्रत्येक वेळी हीच पद्धत राहिली. त्यांच्या सूचना या केवळ 'सूचना' च असत. त्यांनी स्वतःही अनुवाद केले असल्यामुळे (पु. ल. देशपांडे यांचं 'तुझे आहे तुजपाशी', 'रंगाटनी बेगने बारो..' या नावानं केलं. महेश एलकुंचवारांची दोन नाटकेही कन्नडमध्ये केली.) त्यांना अनुवादातल्या खुबी आणि