पान:निवडक अंतर्नाद.pdf/२५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बरेच लेखक प्रभावीपणे घेताना दिसतात. पण त्या प्रमाणात नागरी संवेदना तितक्या प्रभावीपणे व्यक्त होताना दिसत नाहीत, अशी माझी भावना आहे तुम्हाला काय वाटतं?' ते म्हणाले, 'बरोबर आहे. कारण कर्नाटकात नगरं आहेतच कुठं? अगदी बेंगळूरही मोठं गाव आहे. नगर म्हणता येणार नाही. त्या गावाचे प्रॉब्लेम्सही मुंबई - कलकत्त्यासारख्या नगरापेक्षा वेगळे आहेत!' एव्हाना कार्नाडांचं दडपण वाटणं कमी झालं होतं. त्यामुळे त्या आधी टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या मालिका, दिग्दर्शित होणारे चित्रपट, त्यांच्या भूमिका यांचं दडपण येणं कमी झालं होतं. त्यांचं लेखकपण अधिक प्रभावीपणे समोर येत होतं. ००० त्यांची सगळी नाटकं पुन्हा एकदा नव्या स्वरूपात मराठीत येण्याच्या दृष्टीनं ह्यलचाली सुरू झाल्या. त्यावेळी मी अनुवादित केलेली 'नागमंडल' आणि 'तलेदंड' घेण्याचं ठरलं. तसंच काही अनुवाद नव्यानं करून घ्यायचं ठरत होतं. तेव्हा 'टिपू सुलतानचं स्वप्न' या नाटकाचा अनुवाद करायचं काम माझ्याकडे आलं. ते मी मोठ्या आनंदानं करून दिलं. तसंच 'ययाती'चंही झालं. तो अनुवाद आधी श्री. र. भिडे या आमच्या ज्येष्ठ स्नेह्यांनी केला होता. त्याचा पुन्हा अनुवाद करायचं काम माझ्याकडे आलं. त्या पुस्तकाबरोबरच माझ्याकडे काही कार्नाडांच्या हातानं लिहिलेली पानंही आली पुस्तकं आणि हस्तलिखितात काही खुणा होत्या. मी फोन करून चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं, 'होय. मी नाटकात काही ठिकाणी थोडाफार बदल केला आहे तोही अनुवादात समाविष्ट करायचा आहे' पुढे ते म्हणाले, 'हे नाटक लिहिलं तेव्हा मी एकवीस वर्षांचा होतो. आता बहात्तर वर्षांचा आहे. त्यामुळे तेवढा बदल तर होणारच ना! लेखनात पुन्हा पुन्हा बदल करणारा लेखक आहे मी!' आणखीही काही नाटकं मराठीत करायची होती. प्रकाशकांना विशिष्ट तारखेला ती प्रकाशित करायची होती. त्या दृष्टीनं त्यांनी कामाला सुरुवात केली होती. त्या वेळी मी 'सोनियाचा उंबरा' या डेलीसोप सिरीयलच्या लेखनात गुंतले होते. त्यामुळे तारखा जमण्यासारख्या नव्हत्या. (अर्थात ठरलेल्या तारखांना प्रकाशन झालं नाही, ती गोष्ट वेगळी!) त्यामुळे मी ठरलेल्या अवधीत अनुवाद करून द्यायला असमर्थता दाखवली. या घटनेमुळे कार्नाडांचा गैरसमज झाला की काय हे मला तेव्हा कळलं नाही. मला तशी शक्यता वाटली नव्हती. कारण कार्नाड त्या क्षेत्रात वावरत असल्यामुळे डेलीसोपच्या लिखाणाचं दडपण ते समजू शकतील, अशी माझी भावना होती, पण त्यानंतर घडलेली गोष्ट. आमचे एक नातेवाईक त्यांना विमानतळावर भेटले. नातेवाइकांनी उत्साहानं माझा संदर्भ सांगून त्यांच्याशी ओळख करून घेतली आणि मला फोन लावून दिला. फोनवर कार्नाड म्हणाले, 'तुम्ही अनुवाद करणार नाही, म्हणालात!' मी तत्परतेनं खुलासा केला. त्यानंतर मात्र गैरसमज दूर होऊन आत्मकथनाच्या वेळी पुन्हा माझं नाव पुढं आलं आणि मी तो अनुवाद मोठ्या आनंदानं केला. माझ्या महत्त्वाच्या अनुवादांमध्ये त्याचा समावेश होतो, कार्नाडाच्या नाटकांचा अन्य भारताबरोबर महाराष्ट्रातही चांगलाच परिचय आहे. मराठी साहित्य आणि नाट्यक्षेत्रानं ज्यांना आपलं मानलं आहे, अशा काही भारतीय लेखकांपैकी कार्नाड आहेत. अनेक विद्यार्थी त्यांच्यावर पीएच. डी. करतात. काही जणांनी त्यांच्या नाटकांवर (विशेषत: मिथकांवर आधारीत) स्वतंत्र पुस्तकंही लिहिली आहेत. चित्रपट - नाटकासारख्या 'ग्लॅमरस' क्षेत्रात कार्यरत असताना कार्नाड यांची गोमांसभक्षणाविषयीची आणि आपण 'अर्बन नक्षलवादी' असण्याबद्दलची विधाने देशभर वादग्रस्त ठरली. कार्नाड यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त राजहंस प्रकाशनाने आयोजित केलेल्या समारंभात (डावीकडून) विजया मेहता, गिरीश कार्नाड आणि उमा कुलकर्णी. निवडक अंतर्नाद २४९