पान:निवडक अंतर्नाद.pdf/२५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचं 'लेखक' पण झाकोळलं नाही हे विशेष! कवी म्हणून घ्यायचं मोठं स्वप्न उराशी बाळगणारे कार्नाड नाटककार म्हणून एकूणच भारतीय नाट्यक्षेत्रात मान्यता मिळवून आहेत. एक साहित्यिक म्हणून मान्यता मिळवताना त्यांनी 'तलेदंड' साठी साहित्य अकादमी आणि भारताच्या साहित्यक्षेत्रात मानाच्या मानल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराला गवसणी घातली आहे. इंग्लिश कवी म्हणवून घेण्याची कॉलेजपासूनची इच्छा असणाऱ्या कार्नाडांना आपली पहिली महत्त्वाची कलाकृती कन्नड नाटक म्हणून जन्माला आली याचं मनोमन दुःख होऊन रडू आलं होतं, असं त्यांनी मुलाखतीतून व्यक्तही केलं. शिवाय त्या वेळी त्यांची कन्नड भाषाही वाईट असल्याचं त्यांचे जवळचे मित्र अशोक कुलकर्णी म्हणायचे, हेही त्यांनी आपल्या आत्मकथनात लिहिलं आहे. पण त्यांचे प्रकाशक 'मनोहर ग्रंथमाले चे जी. बी. जोशी आणि तेव्हाचे मोठे समीक्षक कीर्तिनाथ कुलकर्णी यांनी कार्नाडांमधला नाटककार हेरला होता. त्यांच्या नाटकांची स्थूल मानानं पौराणि कथां आधार ( ययाती, आग्नी आणि पाऊस, बळी), इतिहासावर आधारित (तलेदंड, तुघलख, टिपू सुलतानचं स्वप्न), लोककथांवर आधारित ( हयवदन, नागमंडल) आणि सद्यः परिस्थितीवर आधारित ( वेडींग अल्बम, काटेसावरी, उणेपुरे शहर एक) अशी विभागणी केली गेली तरी इतिहास, पुराण आणि लोककथांना नाट्यरूप देताना ते सद्य परिस्थितीशी सहजच जोडून घेतात असा वाचकाला- प्रेक्षकाला अनुभव येतो. त्यामुळे यांतील पात्रांच्या जीवनातले प्रश्न आणि त्यांचा ऊहापोह आजच्या काळातही तितकाच लागू पडणारा असतो. त्यामुळेच भाषा, प्रदेश आणि संस्कृतीचा अडसर ओलांडून त्यांची नाटके सर्वदूर पोचू शकतात. उलट अनुभव- क्षितिज विस्तारलेल्या कार्नाडांच्या दृष्टिकोनामुळे त्यांना वैश्विक मूल्य प्राप्त होतं, असाच रसिकांचा अनुभव आहे एकूणच भारतीय रंगभूमीवर कार्नाडांची ऐतिहासिक नाटकं येण्याआधी ऐतिहासिक नाटकं ह्य केवळ पोषाखी अभिव्यक्तीचा प्रकार होता. जेव्हा 'तुघलख' आलं तेव्हा प्रथमच वाटलं, केवळ गौरव गाथा सांगणाऱ्या ऐतिहासिक नाटकांपेक्षा ही पात्रं स्वतंत्रपणे विचार करतात, चुकाही करतात. कारण ती जिवंत माणसं आहेत. हेच पौराणिक नाटकाच्या बाबतीतही झालेलं दिसतं. 'ययाती' प्रकाशित होताच एका कन्नड समीक्षकानं म्हटलं, 'यातला पुरू जुन्या लेखकांच्या नायकांप्रमाणे धीरोदात्त तर आहेच, शिवाय तो स्वतंत्रपणे विचारही करतो.' कन्नड रंगभूमीलाही ही कार्नाडांच्या नाटकांनी दिलेली देणगीच म्हणावी लागेल. याशिवाय 'पुष्पसाज' आणि 'बिखरे बिंब' या दोन 'स्वगतां' मध्ये कार्नाडांनी लेखक म्हणून प्रयोग केला आहे. 'पुष्पसाज'ची पार्श्वभूमी काहीशी ऐतिहासिक पौराणिक म्हणावी तशी आहे. ही दोन्ही नाटके एकपात्री आहेत. 'बिखरे बिंब' मध्ये त्यांनी तांत्रिक गोष्टींचाही अभिनव पद्धतीनं वापर केला आहे. यातील एकमेव पात्र प्रत्यक्ष स्टेजवर तर आहेच, शिवाय टीव्हीवरही आहे! अशा प्रयोगांत लेखकाबरोबरच दिग्दर्शक आणि कलाकारालाही वेगळी 'आव्हाने' स्वीकारणं भाग पडतं. २५० निवडक अंतर्नाद कार्नाड स्वत: लेखक दिग्दर्शक-कलाकार असल्यामुळे त्यांचं नाटक उत्तम प्रकारे बांधलेलं असतंच, त्याचबरोबर त्यात एक प्रकारची लवचिकता असते. त्यातही लोककथांवर आधारित नाटकांमध्ये आम्ही पाहिलेल्या 'हयवदन' मध्ये लोकांमधूनच पालखी येते. 'नागमंडल' मधली पहिली, पडक्या देवळात अंधाऱ्या रात्री जमून गावगप्पा करणाऱ्या ज्योतींची गोष्ट तर इतकी तरल आहे की प्रत्येक दिग्दर्शक ती वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो. 'नागमंडल' चा शेवट करताना लेखकानं स्वत: दोन शेवट दिलेच आहेत. कर्नाटकातल्या बी. जयश्री यांच्यासारख्या दिग्दर्शिका तिसराच शेवट दाखवायचं स्वातंत्र्य घेऊ शकतात! कार्नाडांच्या मृत्यूनंतर डॉ. चंद्रशेखर कंबार या कर्नाटकातील ज्ञानपीठ पुरस्कृत लेखकानंही त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला, हे दोघेही समकालीन, एकमेकाला एकेरी हाक मारणारे मित्र, प्रकाशक जी. बी. जोशी हे संवेदनशील नाटककार असल्यामुळे त्यांनी या दोन्ही लेखकांमधला नाटककार हेरून त्याचं नीट पोषण केलं. गिरीश कार्नाडांची चित्रकला हाही या दोन मित्रांमधला आस्थेचा विषय. त्यामुळे कंबारांच्या 'ऋष्यशृंग' नाटकाच्या मुखपृष्ठासाठी कार्नाडांनी चित्रही काढून दिलं होतं. हे दोघं घनिष्ठ मित्र असले तरी साहित्यिक दृष्टीनं दोघंही स्पर्धेच्या मानसिकतेत होते, असा कंबारांनी उल्लेख केला आहे दोघांनाही ए. के. रानानुजन या लोकसाहित्याच्या अभ्यासकानं एक लोककथा सांगावी आणि दोघांनीही ईष्येनं त्यावर नाटक लिहावं असं अनेकदा घडलं आहे. एका कथेवर कंबारांनी 'सिरीसंपिगे' ( मराठी अनुवाद - 'श्रीचाफा') हे नाटक लिहिलं, ते एका नियतकालिकात प्रकाशित झालं. त्या आधी कार्नाडांचं 'हयवदन' आलं होतं. 'सिरीसंपिगे वाचताच कार्नाड म्हणाले, 'या कथेवर मीही नाटक लिहिन,' त्यानंतर 'नागमंडल' लिहिलं गेलं, नंतर कार्नाडांनी 'तलेदंड' लिहिलं तर लगेच कंबारांनी त्याच विषयावर 'शिवरात्री' लिहिलं, (कंबारांच्या 'सिरीसंपिगे' या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. नंतर त्यांना ज्ञानपीठही मिळाला आहे) कंबार म्हणतात, 'प्रत्येक सर्जनात्मक लेखकाची बस्नं आविष्काराची पद्धत आणि त्यामुळे होणारी अभिव्यक्ती वेगवेगळी असते. त्यामुळे कथावस्तू एकच असली तरी कलाकृती वेगवेगळ्या बनतात, कथा एकच किंवा जवळपासची असली तरी गिरीशच्या नाटकात प्रखर वैचारिकता अग्रभागी असते आणि माझ्या कलाकृतीत काव्यात्मक क्रिया उठून दिसते!' अशा प्रकारच्या साहित्यिक स्पर्धेतून कन्नड साहित्याला मात्र दोन चांगली नाटके मिळाली आणि दोन ज्ञानपीठपुरस्कृत लेखक! कार्नाडांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा कर्नाटकातही त्यांच्या विरोधात वाद उमटले. (हे मोठ्या पुरस्कारानंतर सगळ्याच प्रदेशांत घडते!) याचा सूर असा होता, 'गिरीश कार्नाडांनी नवी पात्रं निर्माण केली नाहीत, की नवं अवकाश निर्माण केलं नाही. नवी निर्मिती न करता जुन्याच पात्रांचा आणि कथांचा वापर करून त्यांना संदर्भ नवा दिला, एवढंच! हे तर प्रत्येक काळात घडत राहील. मागील फळीचे टी. पी. कैलासम, श्रीरंग या कन्नड नाटककारांनीही हेच काम तितक्याच प्रभावीपणे केलं आहे. '