पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लगोलग २७ नोव्हेंबरला रीडर्स डायजेस्टचं तिसरं पत्र ( नव्या १२ प्रश्नांचं ) आलं. त्यातले काही प्रश्न जरा वेगळ्या शब्दांत पुनः विचारले होते. यांची मी सविस्तर उत्तरं आधीच पाठविली होती. फोनवरतीही बरीच माहिती त्यांना दिली होती. मी म्हटलं, "पुन्हा पुन्हा तेच तेच काय विचारतायत ही माणसं ?” त्यावर खुलासा करणारं त्यांचं पत्र आलं. "जरी प्रश्न repeat झाले असले तरी आपण पुन्हा माहिती द्यावी. हे सगळं आमच्या पद्धतीप्रमाणेच आहे. पाठवलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं सविस्तर पाठवावी... “How Tupe struggled despite adverse circumstances and what he had done to help others... Many thanks for your efforts so far...' " कुठेतरी वाचल्याचं आठवलं, What makes Reader's Digest the most successful magazine in publishing history? उत्तर होतं, Beneath the fun and excitement that fill our pages, we are above all else, a serious magazine. Our readers are serious people. मी पुन्हा एकदा कंबर कसली. पुन्हा तुपेंकडे, त्यांच्या प्रकाशकांकडे, मित्रमंडळींकडे, ऑफिसात वरिष्ठ ऑफिसर्सकडे आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकारी वर्गाकडे माझ्या चकरा नव्याने सुरू झाल्या. आता तुपे स्वतःच मला जरा कंटाळलेले वाटले. त्यांनाही वाटलं असावं की एकाच लेखासाठी हा माणूस पुन्हा पुन्हा का एवढा त्रास देतो. मी त्यांना समजावून सांगितलं की हे रीडर्स डायजेस्टसारख्या प्रख्यात मासिकाकरिता आहे. आपण आपल्या परीने सहकार्य द्यावं, कसंबसं मी तुपेंचं मन वळवलं. तुपेंच्या पुरालेखागार ऑफिसातल्या एक सहकारी स्त्रीने तर चिडून मला प्रश्न केला, "तुपेंवर लेख लिहिण्याकरिता ही सगळी माहिती पाहिजे, की ही C.B.I. ची enquiry आहे?" याच सुमारास माझा मुलगा अभय सुट्टीत दिल्लीहून पुण्याला आला. (आता तो तिकडे दिलिप पाडगावकरांबरोबर काम करत होता.) मी रीडर्स डायजेस्टकरिता Research Material गोळा करीत असल्याचं त्याला कळलं. तो मला सावध करीत म्हणाला, "बाबा, जरा जपून, रीडर्स डायजेस्टची assignment म्हणजे भल्या भल्यांची कसोटी असते. तुम्ही पाठवलेली सर्व माहिती ते डोळ्यांत तेल घालून वाचतील. एकदा नाही, अनेकदा. मग Para by Para वाचतील. आणि मग Word by Word. कुठेही शंकेला जागा राहू देणार नाहीत. मग त्यांच्या दुसऱ्या Sources नी पुन्हा तुम्ही लिहिलेला मजकूर Counter Check करतील. लेखात एका शब्दाचा वापर ते शक्यतो दोन वेळा करत नाहीत! शिवाय लेखातला प्रत्येक अनावश्यक शब्द ते गाळत जातात. आणि समजा, हे सगळं केल्यानंतरही त्यांना थोडी जरी शंका आली, लेख छापण्याजोगा झालेला नाही असं किंचित जरी वाटलं २६२ निवडक अंतर्नाद आपल्या झोपडपट्टीतील एका खोलीच्या घरात मध्यरात्र उलटून गेल्यावर लेखनाला बसलेले तुपे तरी ते संपूर्ण लेख नाकारतील, तरी एक गोष्ट खरी, It is worth working for Reader's Digest. आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं त्यांच्यासाठी काम करताना " रीडर्स डायजेस्टसाठी काम करायचा अभयला स्वतःला पूर्वी अनुभव होता. खूप मेहनत घेऊन त्याने पाठवलेला लेख त्यांनी त्याच्याकडून पुन्हा पुन्हा लिहून घेतला. त्यांनी स्वतःही त्या लेखावर भरपूर मेहनत घेतली, पण एवढं सगळं करून त्यांनी अभयचा लेख छापला नाही तो नाहीच. (लेखाचं मानधन मात्र अभयला दिलं गेलं!) मला त्यांचं एक विधान आठवलं. "The Digest never loses sight of the fact that each day all of us confront a tough, challenging world. To millions who know our record of viewing this world, we are not a luxury; we are a necessity." आता मीही जिद्द धरली. प्रामाणिकपणाने मी आपलं पुनर्लेखन पुढे चालू ठेवलं. तुपे सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत ऑफिसात असतात. घरी येण्यास साडेसहा वाजतात. मग ते लिहितात तरी केव्हा? आणि कुठे? हा माझ्यासमोर मोठाच प्रश्न होता. रीडर्स डायजेस्टच्या प्रश्नावलीतही तो होता, लेखनाचं कार्य सुट्टीच्या दिवशीसुद्धा त्यांच्या झोपडपट्टीतल्या त्या खोलीत करणं रहदारीमुळे शक्य नव्हतं. ऑफिसमध्ये तर लेखन शक्यच नव्हतं. कारण