पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानं मांडते." सौ. जिजाबाईंनी हात जोडून बिजलानींना आग्रह केला. सतत चार तास ज्या वेळेस आमचं संभाषण चाललं होतं त्यावेळी सौ. जिजाबाई जेवण करीत असाव्यात, पण आम्हाला तसं काही त्यांनी जाणवू दिलं नव्हतं! जेवण गरमागरम, साधं पण स्वादिष्ट, आणि गोड खिरीसकट होतं. परत येताना वाटेत बिजलानींनी रीडर्स डायजेस्टबद्दल थोडी माहिती मला दिली. "लिखाण, लिखाणाचे विषय आणि व्यक्ती यांचा समतोल विचार करूनच आम्ही आमची सगळी माहिती, लेखांसह युनायटेड स्टेट्समधील Head Officeला पुरवतो. त्यांच्या OK शिवाय आम्ही काहीही छापत नाही. " What is Reader's Digest? मधील एक वाक्य मला आठवलं. “Readers depend upon us for truth and accuracy, logic and common sense. Our stories come from the grit of human experience - the tough, the tender, the funny." माझ्या माहितीत बरीच भर पडत गेली. २१ मार्च १९९५ ला मला रीडर्स डायजेस्टचं दोन ओळींचं पत्र आलं... “We will need Tupe's colour photograph." पण दोन ओळींच्या पत्राने मला केवढा आनंद झाला असेल याची कल्पनाच करावी! तुपेंचे रंगीत फोटो मी लगेच कुरीयरमार्फत पाठवून दिले. सांस्कृतिक साठी अतनाद जुलै २०१६ ४०२ जुलै २०१६ (चित्रकार अब्दुलरहीम आलमेलकर) २२ जून १९९५ला रीडर्स डायजेस्टच्या Research Editor श्रीमती द्यपणे डिसोजांचं पत्र आलं : "Tupe's article has been cleared by our Pleasantville, New York, Office and will appear in our August 1995 issue.” "भगवान भला करे सभी रीडर्स डायजेस्टवालोंका !" माझ्या तोंडून उत्स्फूर्तपणे उद्गार निघाले. माझी दोन वर्षांची मेहनत फळाला आली होती. शेवटी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. कारण माझी खात्री आहे की अनेकांना त्याबद्दल कुतूहल असेल. ती म्हणजे, या लेखाबद्दल मला किती पैसे मिळाले? मानधनाचा आकडा सांगणं अनुचित ठरेल. प्रत्यक्ष लेखाचं मानधन म्हणून, संशोधन करून गोळा केलेल्या माहितीबद्दल म्हणून प्रवास - पोस्टेज वगैरे आनुषंगिक खर्चासाठी म्हणून आणि मी दिलेल्या फोटोंसाठी म्हणून अशा एकूण चार हेडिंग्जखाली मला मानधन दिलं गेलं. घेतलेल्या श्रमांच्या मानाने हे मानधन फार प्रचंड वगैरे नक्कीच नव्हतं, पण मानधनाच्या रकमेपेक्षा रीडर्स डायजेस्टबरोबर काम करताना मला जे शिकता आलं, professional excellence म्हणजे काय हे जे पदोपदी जाणवलं, त्यामुळेच हा अनुभव लक्षात राहण्याजोगा ठरला. (छायाचित्रे प्रेम वैद्य) (सप्टेंबर १९९६) संस्कृति रामजीडी अंतनाद ५०१७ रुपये ऑक्टोबर २०१७, काव्यवाचन करताना विंदा करंदीकर (छायाचित्र ल. म. कडू) निवडक अंतर्नाद २६५