पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

What need fear who knows it, when no one can call our power to account? Yet who would have thought that the old man can have had so much blood in him? (नरक आहे काळा धूसर.... छी:, महाराज छी:, शिपाईगडी आणि घाबरता? कुणाला कळले तरी भ्यायचं काय कारण? आपल्या सत्तेला कोण जाब विचारणार ? ...तरी म्हाताऱ्याच्या शरीरात एवढं रक्त असेल ह्याची कुणी कल्पना केली असती!) आणि ती पुढे म्हणते

Here is the smell of the blood still; all the perfumes of Arabia will not sweeten this hand. Oh! Oh! Oh! (अजून हा रक्ताचा वास, अरेबियाची सारी अत्तरं ह्या हाताला सुगंधी करू शकणार नाहीत...) लेडी मॅकबेथ मध्यरात्री झोपेत चालत येते ती एक मशाल घेऊन, खुनानंतर तिच्याजवळ सतत उजेड असला पाहिजे अशी तिची आज्ञा होती. ती येते हात पुसत कारण डंकनच्या रक्ताचे हातावर डाग आहेत असा तिला भास होत असतो. झोपेत नेणिवेत दडपलेली पिशाच्चे जागी होतात आणि तिला चालवतात, बोलते करतात. झोपेने जागृतीवर मात केली आहे आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या थडग्यात कोंबलेली पिशाच्चे नाचू लागली आहेत. सारेच भेसूर, भयंकर! शेक्सपीअरचे जग म्हणजे स्थिर चित्रण नाही आणि त्यातील माणसे केवळ सद्गुणांचे किंवा केवळ दुर्गुणांचे ढोबळ पुतळे नाहीत. येथे माणसे जन्माला येतात, वाढतात, जगतात, कधी एकमेकांना आधार देतात तर कधी एकमेकांचा नाश करतात. कुणी प्रेमाने तर कुणी द्वेषाने भारलेले आहेत, कुणी स्वार्थी तर कुणी त्यागी. सगळे एकमेकांत अडकलेले. साऱ्या जीवनाला कधी सुखाच्या स्वार्थाकडे नेणारे तर कधी संपूर्ण विनाशाकडे यात्रेचा शेवट होतो कधी प्रेमपूर्तीत तर कधी मृत्यूत ! त्याच्या काव्यात. शेक्सपीअरची कथानके, त्याची संविधानके, नाटकातील स्वभावरेखन ह्या आणि इतर अनेक कलात्मक घटकांनी त्याचे नाट्यवैभव सिद्ध झाले आहे. पण ह्या सर्वांना सामावून घेणारी एक विलक्षण शक्ती म्हणजे त्याची कविता मला वाटते शेक्सपीअरचे अंतिम सामर्थ्य आहे ते नाटक आपण पाहातो, नाट्यगृहात तीन चार तास मुग्ध होऊन बसतो, पण नंतर... नंतर काय स्मरणात राहाते? पाच अंकांचे आणि हजारो ओळींचे नाटक नाही. कथानक अस्पष्ट होते, संविधानकांची चतुराई विसरून जाते, पात्रे आणि प्रसंगही स्मृतिपटलावर पुसट होतात. शेक्सपीअर लक्षावधी लोकांच्या मनात घर करून बसला आहे तो त्याच्या अद्वितीय कवितेमुळे आणि ही कवितारती त्याच्या नाट्यवैभवाचा मुकुट आहे. रंगमंदिरातून आपण बाहेर पडतो आणि आपल्या आयुष्यात परततो, आपल्या जगण्यात परततो. नाटक रंगमंदिरात राहते, किंवा पुस्तकात राहते, पण जगता जगता जी मनात घुमत राह्यते ती त्याची कविता ह्या नाटकातल्या दोन ओळी, त्या नाटकातील चार ओळी, ज्युलिएटचा प्रेमालाप, अँटनीचे भाषण, हॅम्लेटचे स्वगत, लिअरची शापवाणी, प्रॉस्पेरोचे भाष्य... जीवनात ठेचा खाल्ल्या किंवा आनंद झाला म्हणजे, सतारीच्या तारांवर आघात होताच त्या झंकारून उठतात, तशा ह्या ओळी आपल्या मनात झंकारतात. आयुष्याचा प्रवास शेवटी एकाकी असतो, अगदी एकाकी. पण ह्या एकाकी प्रवासातही कधीकधी अदृश्य सोबत मिळते कवितेची, ती छायेसारखी आपल्याबरोबर राह्यते आणि आपल्याला सोबत करते, आपल्याशी बोलते, आपल्याला दिलासा देते. आयुष्याच्या अंधारात आपल्या प्रकाशाने चमकणाऱ्या ह्या तारका त्यांच्याकडून प्रकाश मिळो न मिळो, आधार मिळतो. शेक्सपीअरचे योगदान ह्या दृष्टीने मोठे आहे. त्याच्या काव्यातील झपाटणाऱ्या ( haunting ) काव्यपंक्तींच्या मोजदाद करणे अशक्य आहे. बर्नार्ड शॉच्या मते * शेक्सपीअरची श्रेष्ठता त्याच्या शब्दांतील संगीतामध्ये ( word music) आहे आपणा भारतीयांना हे पटणार नाही, कारण शब्दातील संगीतमयता सर्रासपणे आपल्याला कळणार नाही. तरीपण आपणा ह्या कवितेने मोहित होतो, ह्या कवितेत यथार्थ संगीत रिघत असते हे मात्र नि:संशय, ते पाहिजे तेव्हा मधुर होते, पाहिजे तेव्हा गूढ अथवा भयप्रद मर्चन्ट ऑफ व्हेनिसमधील लॉरेन्झच्या पुढील ओळी सुखद आणि मधुर वाटतात : How sweet the moonlight sleeps on the bank! Here will we sit and let the sounds of music Creep in our ears, soft stillness and the night Become the touches of sweet harmony उलट लेडी मॅकबेथ नवऱ्याला राजाचा खून करण्यासाठी प्रवृत्त करताना सांगते की अशा वेळी मी तर काहीही केले असते, अगदी निर्भयपणे, निर्दयपणे : I have give suck and know How tender it is to love the babe that milks me; I would, while it was smiling in my face Have plucked my nipple from his boneless gums, And dashed the braine out. आणि हे वाचताना मातृत्वाच्या पवित्र भावनेची होळी करणाऱ्या भयंकर उद्गारांनी धक्काच बसतो - कधीही न विसरणारा,

  • शॉला अभिप्रेत असलेले शब्दांतील संगीत आणि नाटकात सरळपणे संगीत आणणारी गाणी ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. शेक्सपीअरच्या

नाटकांतील गाणी हा विवेचनाचा स्वतंत्र विषय आहे. एवढे मात्र नमूद करण्यास हरकत नाही की ही गाणी नाटकातल्या एकूण भाववृत्तीशी इतकी समरस झालेली असतात की त्यामधून नाटकाचा किंवा त्यामधील महत्त्वाच्या भागाचा सारांशच प्रतिध्वनित होतो. निवडक अंतर्नाद २६९