पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लक्षात येण्यासारखी आहे. ती अशी, की गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना संकुचित मराठी मनाच्या कोंदणातून बाहेर काढून रवींद्रनाथांनी त्यांना भारतवर्षाच्या दिव्यभव्य सिंहासनावर, जनगणमनाच्या हृदयसिंहासनावर नेऊन बसवले आहे, यात मुळीच शंका नाही. पाच गद्य लेख महाराष्ट्राचा इतिहास, मराठी माणूस व महाराष्ट्र देश (भूमी) यांच्याविषयी रवींद्रनाथांनी पहिल्यापासूनच एक अद्भुत आकर्षण वाटत असावे. ही गोष्ट जशी त्यांच्या उपरोक्त कवितांवरून लक्षात येते, तशीच ती त्यांच्या काही गद्य लेखांतूनही प्रकर्षाने दिसून येते. त्यांचे असे पाच लेख मला त्यांच्या साहित्यात सापडले. ते असे : १) झान्सीर राणी, २) शिवाजि ओ माराठा जाति, ३) शिवाजि ओ गुरुगोविंदसिंग, ४) बोम्बाई शहर, व ५) कारवार, यांपैकी 'झान्सीर राणी' हा लेख इ.स. १८७७ साली 'भारती' या नियतकालिकात त्यांनी वयाच्या केवळ सतराव्या वर्षी 'भानुसिंह' या टोपणनावाने लिहिलेला असून त्यांच्या 'इतिहास' या लेखसंग्रहात (पृ. १०३ ते ११३) समाविष्ट आहे. तसा हा लेख मुळात मोठा आहे. परंतु अल्पवयात लिहिला असल्यामुळे त्यात काही त्रुटी राहिल्या आहेत. म्हणून त्या लेखाच्या शेवटी रवींद्रनाथ लिहितात, "इंग्रजी इतिहासातून राणीची एवढीच माहिती आम्हांला मिळाली आहे. आम्ही स्वतः तिचा जो काही इतिहास जमवला आहे, तो पुढे-मागे प्रसिद्ध करण्याची आमची इच्छा आहे " परंतु पुन्हा त्यांनी लक्ष्मीबाईंविषयी कोठे लिहिल्याचे दिसत नाही. या लेखातील तात्या टोपे, कुमारसिंह व लक्ष्मीबाई यांची माहिती तशी सर्वज्ञात आहे. परंतु लेखाच्या प्रारंभी रवींद्रनाथांनी जे मनोगत व्यक्त केले आहे, ते त्यांच्या ज्वलज्जहाल देशभक्तीवर प्रकाश टाकणारे आहे. त्यात ते म्हणतात, "आम्हांला एकदा असे वाटले होते, की हजार वर्षांच्या गुलामगिरीच्या भाराखाली दबला गेल्यामुळे राजपुतांचा वीर्यवन्ही विझून गेला असावा आणि मराठ्यांना त्यांच्या देशप्रेमाचा व रणकौशल्याचा विसर पडला असावा. पण मग बंडाच्या वावटळीमध्ये किती वीर पुरुष उत्साहाने पेटून आपल्या कार्यसिद्धीसाठी भारताच्या प्रांताप्रांतांत लढाया करीत फिरले ते आम्ही पाहिले, तेव्हा आमच्या लक्षात आले की विशिष्ट जातींमध्ये जे गुण सुप्तावस्थेत पडून असतात, ते सारे एखाद्या बंडाच्या वेळी, आणीबाणीच्या प्रसंगी खडबडून जागे होतात. शिपाई युद्धाच्या वेळी अनेक राजपूत व महाराष्ट्रीय वीरांनी आपले शौर्य चुकीच्या मार्गाने वापरले, ही गोष्ट स्वीकार करूनही ते सच्चे वीर होते, हे मान्य करावे लागेल. " तात्या टोपे यांच्या शौर्याचे वर्णन केल्यावर ते लिहितात, "असा हा असामान्य वीर पारणच्या जंगलात झोपला असता मानसिंहाने विश्वासघात करून त्याला पकडून शत्रूच्या हवाली केले. जाडजूड शृंखलांनी जखडून त्यांना लष्करी न्यायालयासमोर उभे करण्यात आले. आणि मग त्यांनी फाशीच्या फळीवर आरोहण केले. शेवटपर्यंत ते निर्भय व आनंदी राहिले. त्यांनी दयेची याचना केली नाही. ते एवढेच म्हणाले की, ब्रिटिश सरकारच्या हातून मी दुसरी कसलीच आशा (अपेक्षा) बाळगलेली नाही. माझी एवढीच विनंती आहे, की माझी फाशीची शिक्षा ताबडतोब अमलात आणली जावी; आणि माझ्यासाठी माझ्या निरपराध बंदी परिवाराला यातना भोगाव्या लागू नयेत. " यानंतर त्यांनी जे लिहिले आहे ते, त्या काळच्या निर्घृण गोया सरकारच्या संशयी व खुनशी वृत्तीचा विचार करता खूपच निधडेपणाचे आहे, हे आजच्या सामान्य वाचकाच्या कदाचित लक्षातही येणार नाही. ते लिहितात, "इंग्रज लोक स्वार्थी, बनिये नसते, शौर्याविषयी त्यांच्या मनात निष्कपट भक्ती असती, तर त्या दुर्दैवी वीराला अशा प्रकारे कैदी बनून गुन्हेगाराप्रमाणे अपमानित होऊन मरावे लागले नसते, तसे झाले असते तर एव्हाना तात्या टोपे यांचा दगडी पुतळा इंग्लंडातील संग्रहालयामध्ये श्रद्धापूर्वक जपून ठेवण्यात आला असता. ज्या औदार्याने सिकंदराने पुरुराजाचे क्षत्रियोचित धाष्ट्र्य मानले, त्याच औदार्यांने तात्या टोपे यांना क्षमा करण्यात आली असती तर संस्कृति अभिमानी इंग्रज जातीच्या बाबतीत ती अधिक गौरवाची गोष्ट झाली नसती काय ? या असामान्य भारतीय वीराच्या बाबतीत इंग्रजांनी रक्ताचा बदला रक्ताने घेऊन आपली पाशवी वृत्तीच सिद्ध केली, यात शंका नाही." राणी लक्ष्मीबाईंसंबंधी ते लिहितात, "या सर्व वीरांमध्ये झांशीची राणी वीरांगना लक्ष्मीबाई यांना आम्ही विशेष भक्तिपूर्वक नमस्कार करतो. त्यांचा खरा व विस्तृत इतिहास मिळणे कठीण आहे शोध केल्यानंतर जो काही इतिहास मिळाला तोच शब्दबद्ध करून आम्ही वाचकांना सादर करीत आहोत..." शिवाजीविषयक दोन लेख रवींद्रनाथांनी १९०८ साली लिहिलेला शिवाजी ओ माराठा जाति आणि १९१० साली लिहिलेला शिवाजि ओ गुरु गोविंदसिंह हे दोन लेख रवींद्रनाथांनी शिवाजी महाराज व महाराष्ट्रीय लोक (ओ = व) यांच्याविषयी वाटणाऱ्या आदरयुक्त कौतुकाची उत्कृष्ट अभिव्यक्ती करणारे आहेत. या लहानशा लेखात या दोन लेखांतील आवश्यक तेवढी उद्धरणे देणे शक्य नसल्यामुळे वानगीदाखल काही निवडक उद्गार उधृत करणे भाग आहे यापैकी पहिला लेख ही शांतिनिकेतनातील ब्रह्मचर्याश्रमाचे भूतपूर्व प्राध्यापक कै. शरत कुमार राय यांच्या शिवाजि ओ मराठा जाति' या ग्रंथाची प्रस्तावना असून दुसरा लेख ही त्याच लेखकाच्या शिखगुरू ओ शिखजाति या ग्रंथाची प्रस्तावना आहे. या लेखाचे इंग्रजी भाषांतर श्री. यदुनाथ सरकार यांनी केले होते, ते 'मॉडर्न रिव्ह्यू' मासिकाच्या एप्रिल १९११च्या अंकात The Rise and Fall of the Sikh Power या शीर्षकाने प्रसिद्ध झाले होते. या लेखावर शीख लोक खूप नाराज झाले होते, असे वाचल्याचे स्मरते, यापैकी पहिल्या लेखात रवींद्रनाथ म्हणतात, "आधुनिक भारतातील एखाद्या प्रदेशाला जर इतिहास असेल आणि त्या इतिहासातून जर काही ऐतिहासिक तत्त्व शिकता येत असेल तर तो मराठ्यांचाच इतिहास होय... मराठ्यांच्या इतिहासात आपल्याला निवडक अंतर्नाद २८१