पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आठवणींचा पायरव अंजली कीर्तने मुंबईचे पॉप्युलर प्रकाशन ही साहित्यक्षेत्रातील एक नामांकित संस्था. आपल्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला १९८१ ते १९८६ अशी पाच वर्षे लेखिकेने त्या संस्थेत काम केले. त्या दिवसांच्या या आंबटगोड आठवणी. पीएच. डी. चा अभ्यास पूर्ण झाला होता. त्यापूर्वी मी म. वा. धोंड आणि वा. ल. कुलकर्णी या दिग्गज समीक्षकांच्या हाताखाली मराठी वाङ्मयकोशाच्या समीक्षाखंडाचं काम केलं होतं. त्या दोघांच्या 'विद्यापीठा'त अभ्यासाची पायाभरणी झाली होती. त्या ज्ञानाचा साहित्याच्या परिसरात उपयोग करण्याची वेळ येऊन ठेपली होती. मला प्राध्यापकी पेशात अजिबात रस नव्हता. अशावेळी माझं लक्ष पॉप्युलर प्रकाशन या संस्थेकडे वळलं. राम कोलारकरांनी माझी ही इच्छा रामदास भटकळांच्या कानावर घातली, पॉप्युलरच्या मराठी विभागाचं काम मृदुला जोशी पाहत. त्यांची साहाय्यक म्हणून मी पॉप्युलरमध्ये रुजू झाले. ते साल होतं १९८१ ! माझी बसायची व्यवस्था एका मोठ्या दालनात होती. माझ्यासमोर टायपिस्ट मंगला कलबाग, तिच्यामागे टेबलांच्या तीन ओळी. तिथे सगळा कर्मचारी वर्ग माझ्या डावीकडे मृदुला जोशी. त्यांच्या मागच्या भिंतीवर माझे गुरुजी वा. ल. कुलकर्णी यांची मोठीथोरली, हसरी तसबीर माझ्या पाठीमागे आमचे जनरल मॅनेजर रघुनाथ गोकर्ण, त्यांची सर्वांवर करडी नजर या दालनाला खूप खिडक्या होत्या. खिडकीतून मागचं गोल्फचं गर्द हिरवं मैदान दिसे. वातावरण प्रसन्न व चिंतनाला, वाचनाला अनुकूल. पहिला दिवस आजही आठवतो. वेळ दुपारी दीडची, जेवणाची सुट्टी नुकतीच संपली होती. मृदुलाबाई मला माझ्या टेबलाकडे घेऊन गेल्या. त्यांच्या टेबलावरचा एक मोठ्ठा ढीग त्यांनी माझ्या टेबलावर ठेवला. त्या म्हणाल्या, "आपल्याकडे ही हस्तलिखितं आली आहेत. ती वाचा आणि अभिप्राय द्या." मी कामाला लागले. प्रत्येक पुस्तक वाचून माझा अभिप्राय तयार केला. तीन-चार दिवसांत तो ढीग संपला. मृदुलाबाई आश्चर्यानं म्हणाल्या, "झाली सगळी? तुम्ही अगदी रोडरोलर फिरवून रस्ता सपाट करून टाकलात!” त्या मला रामदासांच्या केबिनमध्ये घेऊन गेल्या. मी ती सगळी हस्तलिखितं नाकारली होती. त्यामागची कारणंही मी रामदासांना स्पष्ट केली. रामदास समाधानानं हसले आणि म्हणाले, "चला! डोक्यावरचं ओझं गेलं!" २९८ निवडक अंतर्नाद आज ते सारं किती दूरचं वाटतं आहे १९८१ ते १९८६ ही पाच वर्षं मी पॉप्युलरमध्ये होते. पॉप्युलर सोडून आता २७ वर्षं झाली. पॉप्युलरमध्ये काम करता करता 'पुस्तक' या वस्तूच्या विविधांगांचं दर्शन घडलं निर्मितीचा अनुभव मिळाला. पुस्तक हे आधी 'हस्तलिखित' असतं. प्रत्येक हस्तलिखिताला त्या त्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा गंध असतो. लेखक जेव्हा आपलं हस्तलिखित प्रकाशकाच्या घरी 'सोडून जातो, तेव्हा त्याचं मन हुरहुरत असतं. त्यानं ते सुवाच्य अक्षरात लिहून, नीटनेटकं बांधून आणलेलं असतं, सोबत प्रतिसादाच्या अपेक्षेत असलेलं पत्र असतं. दिल्या क्षणापासून तो होकाराची वाट पाहत असतो. प्रकाशकाच्या दृष्टीनं मात्र हस्तलिखित वाचणं हे अनेक कामांपैकी एक काम लेखक- असतं. त्यामुळे हस्तलिखिताकडे पाहण्याच्या प्रकाशकांच्या दृष्टिकोनात नेहमीच फरक पडतो, प्रकाशकांचा संपादक हा प्रथम हस्तलिखित संपादित संस्कारित करतो. त्यातून मुद्रणप्रत तयार होते. त्यानंतर वेळापत्रक बनवून योग्य तो छापखाना शोधला जातो. तो लेटर प्रेसचा जमाना होता. खिळे कसे जुळवतात ते मला पाहायचं होतं. म्हणून मी एकदा पुण्याच्या कल्पना मुद्रणालयातील खिले जुलाऱ्यांना भेटले होते. छापखान्यातून येणारी गॅली प्रुफांची भेंडोळी म्हणजे पुस्तकाचं 'गर्भरूप', त्याची नंतर पानं पाडून, त्यांना पृष्ठ क्रमांक देऊन पेजप्रुफं तयार झाली, की पुस्तकाला 'बाळरूप' येतं. चुका सुधारून आलेलं तिसरं स्वच्छ प्रूफ पाहायला मला फार आवडे मृदुलाबाईंनी मला पुस्तकाच्या प्रारंभी येणारी उपशीर्षक, शीर्षक, इंप्रिंट, अर्पणपत्रिका, अनुक्रमणिका ही प्रिलिम्सची पानं करायला शिकवलं पुस्तकाची मुखपृष्ठं घेऊन चित्रकार येत. त्यांनी दोन-तीन रफ स्केचेस आणलेली असत. त्यावर रामदास, मृदुलाबाई आणि मी यांची चर्चा होई, पुस्तकांच्या या दुनियेत माझं जीवन बहुमुखी झालं. मी रुजू झाल्यानंतर काही महिन्यांनी मृदुलाबाईंची प्रकृती बिघडली. त्यांचं येणं अनियमित झालं; आणि नंतर तर त्यांनी नोकरीच सोडली. आता जबाबदारी वाढली. हस्तलिखितं निवडण्यापासून