पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दरमहा शेकडो पुस्तके प्रकाशित होत असतात. काहींचे विस्तृत परीक्षण अंतर्नादमध्ये येतच असे; पण काही महत्त्वाच्या नव्या पुस्तकांचा थोडातरी परिचय वाचकांना होणे त्यांच्या पुस्तकनिवडीसाठी खूप उपयुक्त असते. या भूमिकेतून दरमहा तीन- चार पुस्तकांचा नेमक्या शब्दांत परिचय करून देणारे स्वागत हे सदर प्रसिद्ध होत असे. त्याची ही एक झलक. आर्त : अपेक्षा वाढवणाऱ्या सकस कथा आर्त या नव्या कथासंग्रहातल्या 'श्रद्धा' आणि 'जन्म' या आदिअंताच्या कथा मोनिका गजेंद्रगडकरच्या 'आत कथासंग्रहात नव्हे तर एकूणच तिच्या आजवरच्या कथालेखनात उत्कर्षबिंदू ठराव्या अशा आहेत. सुरुवातीला 'साप्ताहिक सकाळ' च्या कथास्पर्धांच्या निमित्ताने सुरू झालेला मोनिकाचा कथाप्रवास आज महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहल्याचे या दोन कथा निदर्शक आहेत. गंमत म्हणजे अगदी सुरुवातीची, म्हणजे १९९६ सालची, साप्ताहिक सकाळमधली 'नातं' ही कथासुद्धा याच संग्रह्मत आहे, त्यामुळे मोनिकाचा एकंदर लेखनप्रवास इथे ठळकपणे समोर येतो. स्त्री लेखकांतल्या आधीच्या पिढीतल्या 'आयकॉन्स' म्हणाव्या अशा गौरी, सानिया, कमल देसाई वगैरे लेखिकांच्या आणि मेघना, कविता वगैरे समकालीनांच्या वाटेहून निराळी आणि आपली स्वत:ची अशी वाट चोखाळणाऱ्या मोनिकाच्या कथाप्रवासाने इतर लेखिकांप्रमाणेच आपल्या पित्याच्याही (कै. विद्याधर पुंडलिक) कथालेखनाचा ठसा नाकारलेला दिसतो. माणसामाणसांतली नाती आणि त्यांतला संवाद, असंवाद आणि विसंवाद हा मोनिकाच्या कथांचा शोधविषय आहे. त्यात तर्ककर्कश वाद मात्र नाही आणि नात्यातले सुसंवादही क्वचितच आहेत. आहे तो अभिनिवेशनहीन कुतूहलाने घेतलेला असंवादाचा अन् विसंवादाचा शोध. तिच्या कथा रीतसर तिहाई वगैरे घेऊन सीमेवरच संपतात, तरी त्यात दोबळ निर्णायकता नाही. मला तिच्या कथालेखनात खालील वैशिष्ट्ये आढळली आहेत : १. बऱ्याचदा मोनिकाची कथा लेखिकेच्या दोन पावले पुढे जाते आणि कदाचित लेखिकेला अभिप्रेत नसलेला एखादा मौलिक पेच वाचकाच्या ओंजळीत टाकते, वाचकाला स्तिमित करते. २. मोनिकाची कथा बऱ्याचदा शेवटी 'अति-अभिव्यक्ती' करते. ३. मोनिकाची कथा स्त्रीवादी अभिनिवेश आणि पुरुषद्वेष्टा पूर्वग्रह टाळते. ४. अनिर्णायक अभिव्यक्तीमुळे मोनिकाची कथा वाचकाला सर्जनात सामील करून घेते व त्यामुळे श्रेष्ठतेच्या शक्यता बाळगते. मुख्य म्हणजे वाचकाला सहभागाचा आनंद देते. ५. मोनिकाची कथा बहुतेक वेळा कादंबरीच्या शक्यता बाळगते. 'भूपे संग्रहातली 'नाळ' ही कथा वाचताना मला पहिल्यांदा मोनिकाचे कथालेखन लक्षवेधक वाटले. कथेने लेखिकेच्या दोन पावले पुढे जाण्याचा सुखद अनुभव तिथेच पहिल्यांदा आला. 'आत' मधल्या 'जन्म' कथेत हा अनुभव ठळकपणे येतो, 'जन्म' कथेची पार्श्वभूमी मोनिकाचे 'होम पीच' म्हणावे असे संगीताचे क्षेत्र आहे. त्यामुळे संगीतातल्या शैलीच्या रूपकाद्वारे ती मानवी स्वभावाच्या दोन परस्परविरुद्ध प्रकारांमधले द्वंद्व परिणामकारकरीत्या मांडते. कथेच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संगीतक्षेत्राचे मोनिकाचे ज्ञान अस्सल आणि सखोल असल्याने हे रूपक विलक्षण ताकदीने समोर येते. सत्यजित या नायकाच्या आई अन् वडिलांच्या संगीतविषयक परस्परविरुद्ध भूमिकांद्वारा मुळात मोनिका श्रेय आणि प्रेय या सनातन द्वंद्दावरच भाष्य करते आणि तिच्या पद्धतीने सुरेख तिहाई घेऊन कथा संपवते. सत्यजितचे दादा आणि अम्मा. दोघेही सरोदवादनात आपले स्वत्व शोधताहेत. पण अम्मा त्यातून आत्मशोध घेत श्रेयाच्या दिशेने आत शिरते तर वडील त्याद्वारे आत्यंतिक प्रेय अशा प्रसिद्धीच्या मागे लागतात. पण हे मांडता मांडता मोनिका मधेच सत्यजितच्या मनात वडिलांच्या मैत्रिणीबद्दल मालविकाबद्दल, कोवळे प्रेम जागृत झाल्याचे सूचित करते. तिच्या अर्धवस्त्र दर्शनाने त्याच्या मनात निराळेच वादळ जागे झाल्याचे दाखवते. आणि मग एकदम आपल्या मूळ आशयाकडे येऊन कथा संपवते. कथेच्या मूळ आशयाच्या दृष्टीने सुसंगत असा हा समाधानकारक शेवट पण नायकाच्या मनात मालविकेबद्दल जे आकर्षण निर्माण झाले त्याचे काय ? एखाद्या स्त्रीचे प्रेम सर्जनाला जन्म देऊ शकते या विचाराचे काय ? मोनिका त्यावर भाष्य करत नाही. कारण मोनिकाच्या कथेच्या अवकाशात त्याला स्थान नाही. वाचक मात्र त्यावर विचार करतच राहातो. आत मोनिका गजेंद्रगडकर याच 'जन्म' कथेत दुसरे एक वैशिष्ट्य दिसते ते म्हणजे कथान्ताची मोनिकाची काहीशी 'अतिअभिव्यक्ती कथेच्या आशयातून, घटनाक्रमातून कथेचा अन्वयार्थ लावायला वाचक समर्थ आहे यावर विश्वास नसल्यामुळे की काय, पण शेवटी मोनिका बाळबोध भाषेत तो सांगू पाहते, 'जन्म' कथेत शेवटी मोनिका शेवटच्या पानावरच किमान आठ वेळा कथेचे शीर्षक निवडक अंतर्नाद ३०५