पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहावे.) हे ध्यानात येते आणि मग या साऱ्यातील नैसर्गिक सहजपणा संशयास्पद वाटू लागतो. वाचकांना तसे वाटणे हे काही लेखकाचे यश म्हणता येणार नाही. आणि शेवटी ही कादंबरी साचेबंद झाल्यासारखी वाटते त्यासंबंधी, बोकीलांची या अगोदरची 'रण' ही कादंबरी वाचली, की तिचेही स्वरूप असेच असल्याचे जाणवते. गुजराथच्या भूकंपाच्यावेळी कच्छच्या रणात एन. जी. ओ. च्या माध्यमातून सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी आलेले विस्फोटित पतिपत्नी, त्यांची अकल्पित भेट, मुलाच्या निमित्ताने त्यांचे जवळ येणे, रात्रभर एकांतातल्या अतिथिगृहात त्यांचा झालेला मुक्काम, असोशीने झालेले त्यांचे मिलन आणि पुनः एकदा सहजीवन जगण्याचा पतीने ठेवलेला प्रस्ताव आणि पत्नीने 'तू माझ्याकडे येऊ शकतोस, आपल्या मुलाचा बाप म्हणून, अगदी माझा माजी जी. ए. कुलकर्णी हे एक विलक्षण लेखक होते. त्यांच्या लेखणीनं मराठी रसिकाला अनेक अर्थांनी समृद्ध केलं. त्यांचं एकंदरच लेखन चिरेबंद होतं. सशक्त कथासृष्टी उभी करणाऱ्या जीएंनी अनेक अनुवाद केले. मात्र या साऱ्या लेखनातून जीए, एक व्यक्ती म्हणून, कधीच दिसत नाहीत. ते दिसतात, ते त्यांनी केलेल्या पत्रलेखनातून! त्यांना प्रदीर्घ पत्र लिहिण्याची सवय होती. या पत्रांचीही पुस्तकं निघाली. या पत्रांतून मात्र जीए कसे असावेत, त्याचा अंदाज करता येतो. प्रस्तुतचं पुस्तक हे जीएंनी अनंत अंतरकर आणि आनंद अंतरकर यांना लिहिलेल्या पत्रांचं आहे. मात्र त्यामध्ये जीएंची पत्रच नाहीत तर त्या पत्रांवर आनंद अंतरकर यांचं भाष्य आहे. ते भाष्य म्हणजे जीएंच्या पत्रातून त्यांच्या एरवी अबोध राहिलेल्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध आहे. जीए आणि हंस मासिक यांचं फार जवळचं नातं होतं आणि ते अनंत अंतरकर यांच्या काळापासूनच निर्माण झालेलं होतं. इतके प्रदीर्घ काळचे संबंध असूनसुद्धा जीए ना कधी थोरल्या अंतरकरांना भेटले, ना धाकट्या! आनंद अंतरकरांशी निदान त्यांचं फोनवरून तरी बोलणं झालं. पण तेही हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्यावेळाच. नवरा म्हणूनही, पण मला आता पत्नीपणात ( बायको म्हणून) अडकणे शक्य नाही.' या शब्दांत त्याला नकार देणे आणि दोघांनी आपापल्या वेगळ्या मार्गांनी जाणे. हे सारे अत्यंत रमणीय स्वरूपात चित्रित होणे, या सर्वांचे स्वरूप 'मार्ग' शी मिळतेजुळते असेच नाही का? एक धारवाडी कहाणी : जीए समजून घेताना आमवा अस्कर हे जर बरोबर असेल (आणि माझ्या मते ते तसे आहेच) तर बोकीलांनी पुढील कादंबरी लिहिताना अधिक गंभीरपणे विचार करणेच इष्ट ठरेल. अशा लेखकाची पत्रं हा अंतरकरांकडचा मोठा ठेवा आहे. त्याचा विशेष असा की एरवी कुलुपबंद असणारं जीएंचं व्यक्तिमत्त्व त्यातून डोकावत राहतं. काही आटोपशीर तर काही सविस्तर असणाऱ्या या पत्रांवरचं आनंद अंतरकर यांचं भाष्य "धारवाडी कहाणी (मार्ग, मिलिंद बोकील, मौज प्रकाशनगृह पृष्ठे ११९, मूल्य रुपये १२० ) (फेब्रुवारी २०१६) परीक्षण : बाळकृष्ण कवठेकर जीएंच्या गूढरम्य व्यक्तिमत्त्वावरचा पडदा अलगद हातानं दूर करणारं आहे त्यांचं भाष्य वाचताना जाणवतं की जीएंप्रमाणेच आनंद अंतरकरांचं पाश्चात्त्य वाड्मयाचं वाचन अफाट आहेच, पण पाश्चात्त्य समीक्षाग्रंथही त्यांनी वाचून पचवले आहेत आणि मराठी साहित्याचा तर त्यांचा व्यासंग चकित व्हावं असाच आहे. या साच्या साहित्याभ्यासातूनच असावी, पण कायम दृष्टीआड असणान्या साहित्यिकाच्या अंतरंगाचा वेध घेण्याची हातोटी त्यांनी कमावली आहे. त्याचंच प्रत्यंतर प्रस्तुतच्या पुस्तकाच्या वाचनातून येतं. नवख्या लेखकातीलही ठिणगी अचूकपणे हेरणारे अनंत अंतरकर हे रोखठोक वृत्तीचे होते. त्यांच्याबद्दल आनंद अंतरकर लिहितात, 'त्यांची संपादकीय भूमी ही नुसतीच कोरडवाहू नव्हती. तिच्या गर्भात लेखकाविषयीचा नि लेखनाविषयीचा ओलावा असायचा. आस्था असायची. ' आपल्याला आपल्या कर्तृत्ववान पित्याकडूनच संपादनाचे धडे गिरविणाऱ्या आनंद अंतरकर यांनी आपल्या वडिलांचा वारसा अधिक समृद्ध केला, अनिल रघुनाथ कुलकर्णी, प्र. ल. मयेकर यांच्यासारखे अनेक नवीन लेखक हुडकले. या साऱ्याची जाणीव जीएंना होती, असं त्यांच्या पत्रांवरून दिसतं. अंतरकर कुटुंबीयांशीच त्यांचं गहिरं नातं जडलं होतं. मात्र पुण्यात येऊनही जीए अंतरकरांना कधीच भेटले नाहीत. त्यांनी स्वतःभोवती एक वारूळ तयार केलं होतं आणि ते अधिकाधिक पवकं होईल असं वर्तन सामान्यतः ठेवलं होतं. निवडक अंतर्नाद ३०९