पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोडणे आणि पुन्हा आधीच्या अक्षरसंख्येची ओळ टाकून मोडलेली लय पुन्हा प्रस्थापित करणे, भिन्न अक्षरसंख्येच्या ओळींनंतर विशिष्ट अक्षरसंख्येची ओळ पुनरुक्त करीत राहून त्यातून एक लय प्रस्थापित करणे, अशा आणि अशा प्रकारच्या विविध चरणरचना करून एक लवचीक लय प्रस्थापित करीत जाणे, या पद्धतीने ही गाणी लिहिली गेली आहेत. उच्चारणातील विशिष्ट काळाच्या अंतराने पुनरावृत्त होणारी यमके, विशिष्ट कालिक अंतराने ध्रुवपदासारख्या पुनरुक्त होणाऱ्या ओळी अशा प्रकारांतूनही एक सैल लय प्रस्थापित केली जाते. ही लय लवचीक, सैल ठेवून या गाण्यात गद्याचे सामर्थ्यही टिकवले गेले आहे. येथे 'गद्य' ही संज्ञा 'काव्यविहीन या अर्थाने योजिलेली नसून ती विशिष्ट प्रकारचे अभिव्यक्तिसामर्थ्य असणारा भाषाप्रकार, या अर्थाने योजली आहे. 'गाणी' हे नामाभिधान प्राप्त झालेल्या या कवितेत पद्य आणि गद्य या भाषारूपांचे अभिव्यक्तिसामर्थ्य एकवटलेले आहे या बोलगाण्यातल्या लयीमध्ये श्रोत्यांना वक्त्याच्या बोलण्यात सहभागी करून घेण्याचे सामर्थ्य आहे. वक्ता ही गाणी सादर करताना श्रोते केवळ तटस्थ राहून ती ऐकत नाहीत तर तेही या गाण्यात सहभागी होऊ लागतात. त्यांच्या या सहभागामुळे ही गाणी श्रोत्यांवर जो परिणाम करू पाहतात तो विनासायास होत जातो. ही गाणी ज्या उद्देशातून लिहिली गेली आहेत तो सफल करणारी लय या गाण्यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे मराठी भाषकांत ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली असून गेल्या दोन तपांपासून ही लोकप्रियता तशीच कायम राहिली आहे. वाचक जेव्हा ही गाणी वाचतो तेव्हाही ती ऐकत असताना श्रोत्यांना येणाऱ्या अनुभवासारखाच अनुभव त्यालाही येतो. या गाण्याची लय अशी आहे की ती वाचत असताना आपण ती जणू ऐकत आहोत, असा अनुभव वाचकाला येतो. त्यामुळे ही बोलगाणी श्रोत्यांप्रमाणेच वाचकांनाही प्रिय झाली आहेत. त्यामुळेच 'बोलगाणी' या संग्रहाने पुस्तकविक्रीची सर्व प्रमाणके तोडली आहेत. ११९० पासून ते २०१२ पर्यंत, म्हणजे बावीस वर्षांत या संग्रहाच्या वीस आवृत्या निघाल्या आहेत. काव्यसंग्रहाच्या विक्रीचा हा नवा मानदंड आहे. बोलण्याच्या क्रियेत बोलणारा आणि ऐकणारा असे दोन घटक असल्याचा निर्देश या पूर्वीच केला गेला आहे. बोलण्याच्या क्रियेला हे दोन्ही घटक अर्थपूर्णता देत असतात. बोलण्याच्या क्रियेत बोलणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व प्रत्यक्षपणे प्रकट होत असते आणि बोलणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याच्या बोलण्याला विशिष्ट भावनिक अर्थ प्राप्त होत असतो. श्रोत्याने हे बोलणे कसे स्वीकारायचे हे बोलणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याच्या बोलण्याला प्राप्त होणारा भावनिक अर्थ निश्चित करत असतो. बोलण्याच्या क्रियेत ऐकणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व मात्र अप्रत्यक्षपणे सूचित होत असते. बोलगाण्यात कथनकर्ता आणि ते ऐकणारा श्रोता असे दोन घटक असतात. या बोलगाण्यात बोलणाऱ्याला - ३१२ निवडक अंतर्नाद कथनकर्त्याला लोभस, आकर्षक व्यक्तिमत्त्व लाभले आहे. ऐकणाऱ्यांपेक्षा तो वयाने ज्येष्ठ असून अनुभवांनी समृद्ध आहे या उलट या गाण्यात गृहीत धरण्यात आलेला त्याचा श्रोता त्याच्यापेक्षा वयाने लहान, तरुण आहे अशा श्रोत्यांशी तो वडीलधाऱ्याच्या पातळीवरून, उपदेशकाच्या भूमिकेतून बोलत नाही. तर तो ज्येष्ठ, अनुभवी मित्राच्या भूमिकेतून श्रोत्याला विश्वासात घेत, त्याची समजूत घालत बोलतो, तो मिस्किल आहे, अधूनमधून श्रोत्याला गुदगुल्या होतील असे नर्म विनोद करतो. आपले म्हणणे मांडताना तो श्रोत्याला सहज पटतील असे युक्तिवाद करतो. ही कविता ऐकताना किंवा वाचताना आपण सतत एका प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात असतो. ही 'बोलगाणी' ही जशी विशिष्ट आशयाची अभिव्यक्ती आहे तशीच ती एका वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय घडवणारा आविष्कारही आहेत. बोलगाणी मंगेश पाडगावकर - 'बोलगाण्या'त श्रोत्याचे व्यक्तिमत्त्व हे वक्त्याच्या बोलण्यातूनच सूचित होते. येथे ऐकणारा हा केवळ श्रोता आहे; तो वक्त्याच्या भूमिकेत जात नाही. त्यामुळे या गाण्यांना एकव्यक्तीय संभाषणाचे रूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या गाण्यांत श्रोत्याचे व्यक्तिमत्त्व प्रत्यक्षपणे व्यक्त होत नाही. श्रोत्याभोवतीचे सामाजिक वास्तव, जगत असताना श्रोत्यापुढे उभ्या राहणाऱ्या समस्या, जगताना जागृत होणाऱ्या त्याच्या प्रेरणा, या प्रेरणांच्या तृप्तीत येणारे अडथळे या सर्वांमुळे अस्तित्वात आलेली त्याची मानसिक भावनिक अवस्था हे सर्व लक्षात घेऊन बोलणाऱ्याने त्याला सुचविलेले मार्ग या सर्वांतून ऐकणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व सूचित होत असते. या कवितेत ऐकणारी विशिष्ट अशी एखादी व्यक्ती नाही; ती तारुण्यात पदार्पण केलेली नवी मध्यमवर्गीय पिढी आहे. या कवितेत ऐकणाऱ्याचे प्रकट होणारे व्यक्तिमत्त्व हे विशिष्ट व्यक्तीचे नसून एका पिढीचे ते सामूहिक व्यक्तिमत्त्व आहे. आधीच्या पिढीतीलच एक समजदार, अनुभवी आणि या तरुण पिढीला ओळखणारा समजून घेणारा असा वक्ता आणि आधीच्या पिढीपेक्षा वेगळ्या सामाजिक प्रश्नांना सामोरा जात आपल्या वेगळ्या प्रकारच्या गरजा भागवू पाहणारा, आपल्या तारुण्यसुलभ प्रेरणांची तृप्ती साधू इच्छिणारा तरुण, यांच्यातले बोलणे या कवितेत साकार केले गेले आहे स्वरूप आता आपण या संग्रहातील कवितेमागील जाणीवव्यूहाचे जाणून घेऊ. पाडगावकरांच्या या कवितेतील जाणीवव्यूहाला दोन केंद्रे आहेत. त्यांपैकी एक केंद्र आजच्या प्रस्थापित वास्तवाचे आहे. आजच्या प्रस्थापित राजकीय आर्थिक अवस्था प्रस्थापित सामाजिक समजुती, श्रद्धा, आग्रह आणि मूल्यव्यवस्था हे आजच्या वास्तवाचे घटक पाडगावकरांच्या या कवितेचे लक्ष्यविषय आहेत. व्यक्तीचे केवळ व्यक्ती म्हणून असलेले अस्तित्व हे या जाणीवव्यूहाचे दुसरे केंद्र आहे. व्यक्तीचे व्यक्ती म्हणून असलेले अस्तित्व, त्याचे जगणे पाडगावकरांना